मेष – जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या
आज तुमच्या जोडीदाराला डोकेदुखी अथवा डोळ्याचा त्रास होऊ शकतो. खर्च वाढण्याची शक्यता आहे. आज तुमचा दिवस दगदगीचा असेल. आईवडीलांची मदत मिळेल. विनाकारण दिखावा करण्याचा प्रयत्न करू नका. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढतील. नोकरीत बदल होण्याचा योग आहे.
कुंभ – आरोग्य चांगले राहील
आज तुमचे भाग्य तुमची चांगली साथ देईल. आरोग्याची काळजी करू नका. तुमचे आरोग्य उत्तम राहील. कामाच्या ठिकाणी आनंदाचे वातावरण असेल. रचनात्मक कार्यात रस वाढेल. बिघडलेली कामे मित्रांच्या मदतीने पूर्ण होतील. उत्पन्नाचे साधन वाढेल. जोडीदाराशी नातेसंबंध सुधारतील.
मीन- मित्रांसोबत भांडण होईल
आज तुमचे मित्रांसोबत विनाकारण वाद होतील. रागावर नियंत्रण ठेवा. प्रिय व्यक्तीसाठी वेळ काढा. तणाव वाढण्याची शक्यता. कामाच्या ठिकाणी विरोधकांपासून दूर रहा. अचानक धनलाभ होऊ शकतो. व्यवसायासाठी प्रवासा करावा लागेल.
वृषभ – अचानक धनलाभ होईल
आज तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. दीर्घ काळापासून सुरू असलेल्या कोर्टकचेरीच्या कामात यश मिळेल. नवीन काम सुरू करण्यासाठी चांगला काळ आहे. जोडीदाराच्या व्यवहाराने मन दुःखी राहील. व्यवसायात प्रगती होईल. नवीन प्रोजेक्ट मिळू शकते. आधुनिक सुखसाधनांमध्ये वाढ होईल.
मिथुन – व्यवसायात भागिदारीचा फायदा होईल
व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे शिवाय भागिदारीचा चांगला फायदा होईल. मित्रांच्या मदतीने कामे पूर्ण होतील. घरात आनंदाचे वातावरण असेल. आईवडीलांचे भावनिक सहकार्य मिळेल. सामाजिक सन्मान आणि धनसंपत्तीत वाढ होईल.
कर्क – अधिकाऱ्यांशी मतभेद होतील
कामाच्या ठिकाणी आज तुमचे अधिकाऱ्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका. राजकारणातील कार्यात वाढ होऊ शकते. कौटुंबिक मानसन्मान वाढेल. जोडीदाराशी नाते मजबूत होईल. वाहन चालवताना सावध रहा. प्रवास करणे टाळा.
सिंह – सासरच्या मंडळींकडून महागड्या भेटवस्तू मिळतील
सासरच्या मंडळींकडून तुम्हाला आज एखादी महागडी वस्तू भेट मिळू शकते. व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. उत्पन्नामध्ये वाढ होईल. विद्यार्थ्यांना परिक्षेत यश मिळेल. घरात मंगल कार्य होण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत नाते मजबूत होईल. आईची तब्येत सुधारेल.
कन्या – कामाच्या ठिकाणी सावध रहा
आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी सावध राहण्याची गरज आहे. एकाच वेळी अनेक कामे करावी लागल्याने दगदग आणि कंटाळा येऊ शकतो. आत्मविश्वास कमी जाणवेल. वैचारिक मतभेद झाल्याने व्यवसायात समस्या येतील. आर्थिक स्थिती बिघडण्याची शक्यता आहे. वादविवाद करणे टाळा. कायदेशीर बाबतीतून आराम मिळेल. आरोग्याची काळजी घ्या.
तूळ – जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या
जोडीदाराची तब्येत बिघडल्यामुळे मन निराश होऊ शकते. कामाच्या ठिकाणी मेहनत घ्यावी लागेल. पदोन्नतीची संधी मिळेल. आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. कुटुंबातील वाद दूर होतील. रखडलेली कामे पूर्ण कराल. राजकारणात आणि सामाजिक कार्यात मानसन्मान मिळेल.
वृश्चिक – जुनी मैत्री प्रेमात बदलू शकते
आज तुमची तुमच्या प्रिय व्यक्तीशी अचानक भेट होईल. जुनी मैत्री प्रेमात बदलण्याची शक्यता आहे. आर्थिक जोखिम घेताना सावध रहा. विरोधक त्रास देण्याची शक्यता आहे. सामाजिक मानसन्मान आणि धनसंपत्तीत वाढ होईल. शेअर बाजारात लाभ होण्याची शक्यता आहे.
धनु – नोकरी मिळेल
आज तुम्हाला नवीन नोकरी मिळू शकते. सामाजिक कार्यात रस वाढेल. प्रभावशाली व्यक्तीशी भेट लाभदाक ठरेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. आत्मविश्वास वाढेल. जुने मित्र भेटण्याची शक्यता आहे. नवीन वाहन खरेदी कराल.
मकर- व्यवसायात तोटा होऊ शकतो
आज तुम्हाला व्यवसायात तोटा होण्याची शक्यता आहे. आर्थिक पुंजी खर्च करावी लागेल. प्रवासात अडचणी येतील. छोट्याशा गोष्टीवरून ताण जाणवेल. जोखिमेची कामे करू नका. धार्मिक कार्यात मन रमवाल.
अधिक वाचा
जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’
राशीनुसार जाणून घ्या तुमच्या जोडीदाराचा स्वभाव