मेष – अभ्यासातील रस वाढेल
आज विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील रस वाढणार आहे. उत्पन्नाची नवीन साधने मिळणार आहेत. हरवलेला आत्मविश्वास पुन्हा मिळेल. वाहन चालवताना सावध राहा. मनोरंजनाची नवीन साधने मिळतील. आरोग्याची काळजी घ्या.
कुंभ – अॅलर्जी होण्याची शक्यता
आज एखादी अॅलर्जी होण्याची शक्यता आहे. एखाद्या चांगल्या बातमीने मन प्रसन्न होईल. रखडलेली कामे पूर्ण होतील. खर्चावर नियंत्रण ठेवा. जोडीदारासोबत नाते सुधारेल.
मीन- नवीन सुरूवात चांगली होईल
नात्यात चांगली सुरूवात होण्याचा संकेत आहे. जोडीदारासोबत भावनिक ओढ वाढेल. सामाजिक कार्यात रस वाढेल. व्यवसायात भागीदार मिळेल.
वृषभ – व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता
आज विनाकारण खर्च वाढवू नका. व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता आहे. उधारी घेणे टाळा. कौटुंबिक तणाव वाढण्याची शक्यता आहे. विनाकारण वाद घालू नका. आत्मविश्वास कमी असेल.
मिथुन – आरोग्याची चांगले राहील
आज तुमचे आरोग्य चांगले राहणार आहे. रोजगारात यश मिळण्याची शक्यता आहे. नवीन रखडलेली कामे पुन्हा पूर्ववत होतील. नवीन व्यवसायात फायदा होईल. विद्यार्थ्यांना खुशखबर मिळेल.
कर्क – गैरसमज होण्याची शक्यता
आज तुमच्या कुटुंबात एखादा गैरसमज होण्याची शक्यता आहे. जोडीदाराची काळजी घ्या. रागावर नियंत्रण ठेवा. आर्थिक वृद्धी करण्याचा प्रयत्न यशस्वी होईल. विद्यार्थ्यांना परिक्षेत यश मिळेल.
सिंह – नवीन भेटवस्तू मिळेल
व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. मित्रांकडून भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी पगारवाढ होण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत प्रवास करण्याची संधी मिळेल. आरोग्याची काळजी घ्या.
कन्या – दुखणे वाढण्याची शक्यता आहे
आज तुमचे खांदा आणि मानेचे दुखणे वाढण्याची शक्यता आहे. जोडीदाराची भावनिक साथ मिळेल. मित्रांकडून चांगली बातमी मिळेल. व्यवहारात सावध राहा. धार्मिक कार्यात रस वाढणार आहे.
तूळ – मित्रांसोबत मतभेद होण्याची शक्यता
आज तुमचे मित्रमंडळींसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. राजकारणातील भेटीगाठींचा व्यवसायात फायदा होईल. सामाजिक कार्यात जोडीदारासोबत फिरण्याची संधी मिळेल. मुलांकडून एखादी आनंदवार्ता कानी पडेल.
वृश्चिक – अभ्यासात विद्यार्थ्यांचे मन रमणार नाही
विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात रमणार नाही. व्यवसायात अडचणी येण्याची शक्यता आहे. कुटुंबात खुशखबर मिळण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या भावनांचा आदर राखा. वाहन चालवताना सावध राहा.
धनु – नवीन व्यवसायाची सुरूवात कराल
आज तुम्ही नवीन व्यवसायाला सुरूवात कराल. उत्पन्नांची साधने वाढतील. रखडलेली कामे पूर्ण होतील. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढणार आहेत. जोडीदारासोबत प्रवासाला जाण्याची योजना आखाल.
मकर – कामाच्या ठिकाणी समस्या निर्माण होतील
आज कामाच्या ठिकाणी विनाकारण वाद होण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत जोखिम घेऊ नका. व्यवसायानिमित्त प्रवास करावा लागेल मात्र प्रवासात सावध राहा. जोडीदाराची साध मिळेल.