मेष – शब्दांवर नियंत्रण ठेवा
आज फुकटच्या गप्पा-टप्पा नको. नाही तर बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी अशी तुमची अवस्था होऊ शकते. म्हणून शब्दांवर नियंत्रण ठेवा. अमर्याद सहनशीलता व उत्साह या दोन्ही गोष्टींनी तुम्ही परिपूर्ण राहाल. आज तुम्ही जोड व्यवसायाचा विचार करु शकता. मात्र हे करीत असतांना हाते सोडून पळत्याच्या मागे लागणे योग्य होणार नाही. आज तुम्ही कुटुंबात एखाद्या प्रश्नावर धैर्याने निर्णय घ्याल. त्याचे स्वागतही होऊ शकते.
कुंभ – संधीवाताचा त्रास वाढेल
तुम्हाला जर संधीवाताचा त्रास असेल तर तो आज वाढू शकतो. म्हणून आरोग्याची काळजी घ्यावी. भविष्यात एखादा मोठा फायदा होणार असेल तर आज लहान नुकसान झालेले चालेल. त्याला गुंतवणूक समजावी. चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे ही सत्यता लक्षात घेऊन आज कुठलाच अट्टहास नको. तुमच्यावर आज जोडीदाराचा प्रभाव राहिल. त्यामुळे घरात आनंदी आनंद असेल.
मीन – नुकसान नव्हे गुंतवणूक
आपला फायदा नेहमी बघितलाच पाहिजे. मात्र आज होण्या-या छोट्या नुकसानामुळे भविष्यात मोठा फायदा होणार असेल तर हात मोकळा सोडावा. त्या नुकसानाला गुंतवणूक समजावी. सांधेदुखीचा त्रास वाढू शकतो. म्हणून आरोग्याची काळजी घ्यावी. आज सल्ले देणारे अनेक भेटतील. त्यामुळे ऐकावे जनाचे करावे मनाचे हे धोरण ठेवा. आज जोडीदारासोबत प्रवासाचा आनंद तुम्ही उपभोगू शकता. मात्र तुमचे आरोग्याकडे संपूर्ण लक्ष असलेच पाहिजे.
वृषभ – अती हव्यास नको
कुठल्याही गोष्टीचा हव्यास हा कधीही वाईट असतो. झटपट पैसे मिळविण्याचा हव्यास धरु नका. नुकसान होऊ शकतं. आज तुमचा आत्मविश्वास कमी राहिल. जोड व्यवसायाचाही विचार आज तुम्ही करु शकता. मात्र तो विचारपूर्वकच करायला हवा. हातचे सोडून पळत्याच्या मागे लागू नका. लहान भावंडांची काळजी घ्या. कदाचित तुमच्या मदतीची त्यांना आवश्यकता असू शकते.
मिथुन – वाद नको, संवाद हवा
संवाद व्यवस्थित न झाल्यास वाद उद्भवतो. म्हणून आज अचुक संवाद साधा. कुठलाच वाद होणार नाही याची काळजी घ्या. आज तुमचा कार्यात व्यस्त राहण्याचा दिवस आहे. त्यामुळे त्यात मन अडकवून ठेवा. म्हणजे वाद होण्याची शक्यता कमी होते. व्यावसायिकांनी आज नफ्याकडे लक्ष ठेवावे. संतती सामाजिक कार्यात सहभागी होईल. त्यामुळे त्यांचा अभिमान वाटेल.
कर्क – संगीत ऐका
संगीत हे तणाव घालविण्याचे सर्वात चांगले माध्यम आहे. त्यामुळे आज तुम्ही कुठल्याही तणावात असाल तर संगीत ऐका. तणावाचा त्रास करुन घेऊ नका. अनोळखी लोकांच्या विरोधाचा सामना आज करावा लागू शकतो. त्यामुळे विचलित होऊ नका. खर्च जास्त होण्याची शक्यता आहे. उत्पन्न व खर्च यांच्यात नियंत्रण कसे ठेवता येईल याची काळजी घ्या. संतती यश मिळवेल. त्यामुळे त्यांचे कौतुक करुन प्रोत्साहन द्यायला विसरु नका.
सिंह – महत्त्वाकांक्षा पूर्ण होईल
तुम्ही कुठली महत्त्वाकांक्षा मनी धरुन प्रयत्न करीत असाल तर त्या आज पूर्ण होऊ शकतात. म्हणून प्रयत्न वाढवायला हवेत. अधिकारी वर्गाच्या हातात एखादे काम अडकलेले असेल तर अजुन प्रयत्न करा. आज यश मिळू शकतं. नाही तर हत्ती गेला नी शेपूट राहिले अशी स्थिती होईल. खर्चाकडे लक्ष ठेवावे. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होता कामा नये. अंथरुन पाहूनच पाय पसरावे. मुलं तुमच्या आवडीनुसार वागणार नाहीत. त्यामुळे आज ती अपेक्षा करायला नको.
कन्या – पथ्य पाळा
डॉक्टरांनी तुम्हाला आहार विहाराची पथ्य पाळायला सांगितलेले असतील तर आज ती तंतोतंत पाळा. अन्नबाधा होण्याची आज शक्यता आहे. आज तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण राहणार आहात. त्यामुळे हाती असलेले काम पूर्ण करण्यावर भर द्या किंवा नवीन कामाची सुरुवात करा. व्यापार व्यवसायासाठी आजचा दिवस सुखद असा आहे. आज रक्तदाबाचा त्रास असलेल्यांनी विशेष काळजी घ्यावी. त्रास होऊ शकतो.
तुळ – अर्थलाभाची शक्यता
तुम्ही कुटुंबाचे काळजी वाहक, कुटुंबवत्सल असाल तर आज तुम्हाला अर्थलाभ होऊ शकतो. त्यामुळे त्या दृष्टीकोनातून प्रयत्न करायला हरकत नाही. आज एखाद्या गोष्टीवर विनाकारण संताप येईल. म्हणून शांत राहण्याचा प्रयत्न करा. जोडीदाराबद्दल गैरसमज होऊ शकतो. घरोघरी मातीच्या चुली, ही सत्यता लक्षात घ्यावी. अन्नबाधा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वत:ची काळजी घ्या.
वृश्चिक – विसंबुन राहू नका
जीवनात कुणावर विसंबुन राहणे हे चुकीचे आहे. आज तर अजिबातच नको. नुकसान होऊ शकतं. आयुष्याबद्दल विचार करण्यासाठी आज तुम्हाला एकांताची आवश्यकता भासेल. त्यात चिंतनातून नवीन मार्ग शोधण्याचा प्रयत्न करा. जोडीदाराशी मनमुटाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे घरात शांत राहून घराची शातंता टिकविण्याचा प्रयत्न करा. अपचनाचा त्रासही होऊ शकतो. म्हणून स्वत:ची काळजी घ्या.
धनु – मनोरंजनासाठी वेळ काढा
काम अधिक चांगल्या प्रकारे करण्यासाठी मनोरंजनही आवश्यक असते. आज तुम्हाला कामाचा कंटाळा येऊ शकतो. त्यामळे आज मनोरंजनासाठी वेळ काढा. एखादे महत्त्वपूर्ण काम अपूर्ण असेल तर ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न वाढवा. यश मिळण्याची शक्यता आहे. प्रेयसीशी संपर्क होण्याची शक्यता. त्यामुळे मनाला आनंद वाटेल. जंक फूड टाळावे. अन्नबाधा होऊ शकते.
मकर – लक्ष विचलित होईल
काही अनपेक्षित घडणा-या गोष्टींमुळे आज लक्ष विचलित होत असते. आज तुम्हाला अनोळखी लोकांचा विरोध होऊ शकतो. जो अनपेक्षित असेल. त्यामुळे लक्ष विचलित होईल. एखादे काम पूर्ण होण्यामध्ये अडचणी येतील. आज तुम्हाला जोडीदाराचे सहकार्य लाभणार आहे. जोडीदाराच्या मर्जीप्रमाणेही तुम्ही आज वागणार आहात. त्यामुळे खर्चही होऊ शकतो. वेळोवेळी व्यायाम करण्याची सवय लावून घ्या.
लेखिकेचा संपर्क करा : श्री ज्योतिष संशोधन केंद