मेष – मनात नकारात्मक विचार येतील
विद्यार्थ्यांचे आज मन नकारात्मक विचाराने भरलेले राहील. आळस आणि दुर्लक्षपणा करू नका. जोडीदाराचे प्रेम आणि सहकार्य मिळेल. कुटुंबातील गोडवा वाढेल. बिघडलेली कामे पूर्ण होतील. देणी-घेणी सावधपणे करा.
वृषभ – अचानक धनलाभ होण्याची शक्यता
अचानक एखाद्या व्यवहारामुळे तुम्हाला आर्थिक होईल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. शेती व्यवसाय करणाऱ्या लोकांना लाभ होण्याची शक्यता आहे. प्रेमयुगूलांच्या समस्या वाढतील. रचनात्मक कार्यात प्रगती होईल.
मिथुन – विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात रमणार नाही
आज विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात रमणार नाही. आळस आणि दुर्लक्षपणा करू नका. तुमच्यावर आज कामाचा दबाव राहील. संयमाने काम करा. व्यवसायातील व्यवहार करताना सावध रहा. विरोधक तुम्हाला त्रास देण्याची शक्यता आहे. जोडीदारापासून दूर राहिल्याने तणाव जाणवेल.
कर्क – दगदग जाणवेल
आज तुम्हाला विनाकारण दगदग करावी लागणार आहे. मानसिक समस्या वाढल्याने ताण जाणवेल. जोडीदारासोबत नातेसंबध गोड होतील. रखडलेली कामे पूर्ण होतील. सामाजिक मानसन्मान आणि धनसंपत्तीत वाढ होईल. वाहन चालवताना सावध रहा. धार्मिक कार्यात रस घ्याल.
सिंह – घरात आनंदाचे वातावरण
आज तुमच्या घरात आनंदाचे वातावरण असेल. प्रेमात यश मिळेल. जोडीदाराजवळ तुमच्या मनातील भावना व्यक्त करा. व्यवसायात नवीन ओळखी वाढतील. कामाच्या ठिकाणी विरोधक त्रास देतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
कन्या – विद्यार्थ्यांना अभ्यासात रूची वाढेल
आज तुमचा दिवस दगदगीचा असेल. विद्यार्थ्यांना मात्र अभ्यासातील रस वाढेल. मेहनतीचे फळ मिळेल. व्यावसायिक योजना फायदेशीर ठरतील. नोकरीशिवाय आणखी उत्पन्नाचे साधन वाढेल. जोडीदाराच्या भावना समजून घ्या. आरोग्याची काळजी घ्या.
तूळ – मौल्यवान वस्तू चोरीला जाण्याची शक्यता
आज तुम्हाला फसवणूकीला सामोरं जावं लागेल. एखाद्या धुर्त व्यक्तीमुळे तुमची मौल्यवान वस्तू चोरीला जावू शकते. रागावर नियंत्रण ठेवा. मित्रांकडून सहकार्य मिळेल. जोडीदारासोबत नाते दृढ होईल. धार्मिक कार्यात मन रमवाल.
वृश्चिक – आईची तब्येत सुधारेल
आईची तब्येत हळूहळू सुधारेल. इतरांकडून मदत मिळेल. व्यवसायात सहकार्य मिळेल. आत्मविश्वास वाढेल. कामातील अडचणी दूर होण्याची शक्यता आहे. सामाजिक मानसन्मान आणि धनसंपत्तीत वाढ होऊ शकेल. कोर्टकचेरीत यश मिळेल.
धनु – तणाव जाणवू शकेल
आज तुम्हाला जोडीदाराकडून तणाव जाणवेल. विनाकारण वाद घालू नका. कामाच्या ठिकाणी विरोधकांपासून सावध रहा. व्यवसायात धोका होण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभदेखील होण्याची शक्यता आहे. वाहन चालवताना सावध रहा. देणी-घेणी करताना सावध रहा.
मकर- आरोग्याची काळजी घ्या
आरोग्याची काळजी घ्या. आहाराबाबत सावध रहा. राजकारणात कामे वाढतील. अनुभवी व्यक्तीची साथ मिळेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. वादविवादांपासून दूर रहा. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील. जोडीदाराचे सहकार्य मिळेल.
कुंभ – उधारी परत मिळेल
आज तुम्ही उधार दिलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. त्यामुळे आर्थिक बाजू मजबूत होईल. नोकरी आणि व्यवसायात प्रगती आणि लाभ होईल. मानसिक शांतता मिळेल. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढण्याची शक्यता आहे. मित्रांशी भेट होईल.
मीन- घरातील वाद मिटण्याची शक्यता
आज तुम्ही तुमच्या व्यवहारामुळे एक चांगले मित्र सिद्ध व्हाल. घरातील वातावरण आनंदाचे राहील. घरातील कलह दूर होतील. मानसिक समाधान मिळेल. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांची मदत मिळेल. बिघडलेली कामे पूर्ण होतील. आरोग्य सुधारेल.