मेष – अविवाहितांसाठी लग्नाचा योग
आज अविवाहांना लग्नाचा योग आहे. प्रभावशाली व्यक्तीसोबत झालेली भेट लाभदायक ठरेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. आत्मविश्वासात वाढ होण्याची शक्यता आहे. नवीन वाहन खरेदी कराल.
कुंभ – कामाच्या ठिकाणी सावध राहा
आज कामाच्या ठिकाणी सावध राहण्याची गरज आहे. एखादी नवीन जबाबदारी वाढल्याने मन निराश होण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास कमी होण्याची शक्यता आहे. वैचारिक मतभेदामुळे त्रास जाणवेल. वादविवाद घालू नका. कोर्टकचेरीतून सावध राहा.
मीन – जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या
आज तुम्हाला जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. कामाच्या ठिकाणी कठीण मेहनत घ्यावी लागेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. सामाजिक मानसन्मान वाढेल. वाहन चालवताना सावध राहा. राजकारणातील रस वाढणार आहे.
वृषभ – नवीन नोकरी मिळण्याची शक्यता
आज नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना नोकरी मिळेल. उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याची संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. आरोग्य चांगले राहील. जोखिम घेणे टाळा. सामाजिक कार्यात रस वाढेल.
मिथुन – व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता
आज तुमच्या मित्रांच्या वैरामुळे तुमचे व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता आहे. व्यवसायासाठी पैसे गुंतवावे लागतील. एखादा कौटुंबिक प्रवास आज टाळलेलाच बरा आहे. धार्मिक कार्यात रस वाढणार आहे. रचनात्मक कार्यात प्रगती होण्याची शक्यता आहे.
कर्क – आरोग्य सुधारण्याची शक्यता
आज भाग्योदयाचा दिवस आहे. आरोग्याची काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी वातावरण आनंदाचे असेल. राजकारणातील रस वाढणार आहे. बिघडलेली कामे मित्रांच्या मदतीने पूर्ण होतील. उत्पन्नाची साधने वाढतील. जोडीदाराशी नाते मजबूत होईल.
सिंह – जोडीदाराशी मतभेद होण्याची शक्यता
आज तुमचे तुमच्या जोडीदारासोबत मतभेद होऊ शकतात. मुलांची चिंता सतावण्याची शक्यता आहे. धुर्त लोकांपासून सावध राहा. धार्मिक कार्यातील श्रद्धा वाढणार आहे. व्यापारात नफा आणि नोकरीत पदोन्नती होण्याची शक्यता आहे. रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे.
कन्या – आरोग्याची काळजी घ्या
आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला सावध राहण्याची शक्यता आहे. प्रवासाला जाण्याची योजना टाळावी लागेल. कामाच्या ठिकाणी वाद होण्याची शक्यता आहे. घाईघाईत निर्णय घेणे टाळा. आर्थिक स्थिती मजबूत होईल.
तूळ – धनसंपत्तीबाबत आनंदवार्ता मिळेल
आज सगळीकडून तुम्हाला आनंदवार्ता मिळण्याची शक्यता आहे. धनसंपत्तीबाबत चांगली बातमी मिळेल. पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. रखडलेली कामे पूर्ण होतील. विद्यार्थ्यांचा साहित्य आणि संगीतात रस वाढण्याची शक्यता
वृश्चिक – घरात कौतुक होण्याची शक्यता
आज तुमच्या घरातून तुमच्या जबाबदारीने वागण्याचे कौतुक होणार आहे. सकारात्मक विचारसरणी वाढेल. मुलांकडून एखादी आनंदवार्ता मिळेल. व्यावसायिक संबंधात प्रगती वाढेल. नोकरीतून आनंद मिळेल.
धनु – कामाच्या ठिकाणी तणाव वाढेल
आज कामाच्या ठिकाणी तणाव वाढण्याची शक्यता आहे. मेहनतीतून पूर्ण लाभ मिळण्याची शक्यता आहे. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढणार आहेत. वादविवाद दूर करणे हितकारक ठरेल. वाहन चालवताना सावध राहा.
मकर – नवीन प्रॉपर्टी खरेदी कराल
आज तुम्ही एखादी नवीन प्रॉपर्टी खरेदी कराल. कामाच्या ठिकाणी पदोन्नतीची शक्यता आहे. व्यवसायातील कामे वाढणार आहेत. मित्रांकडून भेटवस्तू मिळेल. प्रवासात वाहन चालवण्यासाठी सावध राहा.
अधिक वाचा
राशीनुसार जाणून घ्या तुमच्या जोडीदाराचा स्वभाव
तुमच्या राशीनुसार जाणून घ्या तुम्ही कशा ‘आई’ आहात
जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात ‘प्रेम’