मेष : आरोग्याकडे लक्ष द्या
आपल्या राशीला चंद्र आहे. त्यामुळे तब्येत नरम-गरम राहू शकते. म्हणून आपण आरोग्याकडे लक्ष ठेवायला हवं. वास्तुतून लाभ मिळू शकतो. म्हणून त्यादृष्टीने प्रयत्न करायला हरकत नाही. व्यापार-व्यसायासाठीही आजचा दिवस सुखद असा आहे. त्याचा योग्य तो लाभ घेऊन स्वत:ची प्रगती साधुन घ्या.
कुंभ : शत्रू नामोहरम होतील
आपल्या विचारांचे समर्थक व विरोधक अशी दोन्ही प्रकारची माणसे आपल्या आयुष्यात असतात. विरोधक असणा-या शत्रूंना आज तुम्ही नामोहरम करु शकाल. म्हणून प्रयत्न करायला चुकू नका. परिश्रम करीत राहा. त्यानंतरच भाग्याची साथ मिळेल. व्यायामासाठी वेळ काढा. आरोग्याच्या दृष्टीने ते फायदेशीर राहिल. स्वत:वर विश्वास ठेवा.
मीन : गैरसमज होईल
एखादी गोष्ट समजण्यात आपण कमी पडलो तर गैरसमज होतात. आज आपला गैरसमज होऊ नये म्हणून काळजी घ्या. कुणाविषयी मत बनविण्याआधी विचार करा. म्हणजे मग गैरसमज होणार नाहीत. उचलली जीभ लावली टाळ्याला असे आज करु नका. बोलण्याआधी विचार करा किंवा सांभाळून बोला. तुमच्या बोलण्याने कुणी दुखावले जाणार नाही, याची काळजी घ्या.
वृषभ : संधी प्राप्त होतील
आयुष्यात मिळणा-या वेगवेगळ्या संधी वेळीच ओळखून त्यांचा योग्य लाभ जो व्यक्ती घेतो तो यशस्वी होऊ शकतो. आज तुम्हाला नोकरी व व्यवसायामध्येही संधी प्राप्त होतील. तिचा योग्य उपयोग करुन घेतल्यास आपली योग्यता उंची गाठणार आहे. म्हणून आज संधी ओळखा. रक्तदाबाचा त्रास असलेल्यांनी आज आपल्या प्रकृतीला जपायला हवं.
मिथुन : कामे टाळाल
कधी कधी मन लागत असल्याने कामे टाळ्याचा प्रयत्न केला जातो. आज आपल्यासाठी तसा दिवस असल्यामुळे किमान अत्यावश्यक कामे टाळू नका. त्यात तुमचेच नुकसान होऊ शकते किंवा आज टाळ्याचा प्रयत्न केला तरी पुढे ते तुम्हालाच करावे लागू शकते. आहाराची पथ्य पाळण्यात कंटाळा करु नका. अन्नबाधेचा त्रास होऊ शकतो. आज तुम्ही शत्रुला नामोहरम करु शकाल.
कर्क : संकट दूर होईल.
आज तुमच्यासाठी गोंधळाचा दिवस आहे. विशेषत: व्यवसायात आज गोंधळ उडू शकतो. त्यामुळे सावध राहा. योग्य प्रयत्न केले तर आलेले संकट दूरही होऊ शकतं. “देव तारी त्याला कोण मारी’ याचा प्रत्यय तुम्हाला मिळू शकतो. आज तुम्ही शत्रू वरचढ होणार आहात. त्यामुळे आज प्रयत्नांची पराकाष्टा करण्यात कमी पडू नका.
सिंह : कौटुंबिक सौख्य लाभेल
आज तुम्ही जोडीदारासोबत वेळ घालविला किंवा जोडीदाराच्या मर्जी प्रमाणे वागलात तर वैवाहिक आयुष्यात विविध रंग आज तुम्हाला बघायला मिळू शकतात. परिणामी कौटुंबिक सौख्य लाभेल. काही प्रसंगांमध्ये शत्रु तुमच्या वरचढ होण्याचा प्रयत्न करतील. ते टाळण्यासाठी कर्मामध्ये किंवा प्रयत्नांमध्ये बदल करा. भाग्य बदलून त्याची साथ तुम्हाला लाभेल.
कन्या : श्रमानंतरच भाग्योदय
यश मिळविण्यासाठी प्रयत्नांच्या जोडीला भाग्याचीही साथ असावी लागते. परिश्रमानंतरच फळ मिळत असतं. श्रम करीत राहा त्यानंतरच भाग्याचीही साथ मिळेल. स्वत:वर वि·ाास ठेवा. कुठल्याच गोष्टीवर अतिविचार आज तरी करु नका. नाही तर भित्यापोटी ब्रम्हराक्षस अशी तुमची अवस्था होईल. आज मनोरंजासाठी वेळ काढा. त्याने विचार थांबण्यास मदत होईल.
तूळ – आरोग्याला जपा
आज तुमची प्रकृती थोडी नरम राहिल. छोटी छोटी दुखणी डोके वर काढू शकतात. म्हणून आरोग्याला जपा. शक्य तेवढे मुद्देसुद बोला. उचलली जीभ लावली टाळ्याला असं करु नका. त्यात नुकसान तुमचेच होईल. स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांसाठी आज दिवस उत्तम आहे. सासरच्यां मंडळींशी वाद होण्याची शक्यता आहे.
वृश्चिक : गुरुंचे आशीर्वाद मिळवा.
जीवनात एखादा गुरु हवाच व सोबतच त्यांचे आशीर्वादही हवे. आज आशीर्वाद मिळविण्यासाठी प्रयत्न करा. त्याची तुम्हाला नितांत आवश्यकता आहे. आहाराची पथ्य पाळा. कारण अन्नबाधा होऊ प्रकृती बिघडू शकते. वाहन हळू चालवून स्वत:ची काळजी घ्या. घाई करु नका. कुठे जायचे असेल तर वेळेच्या आधी निघा. म्हणजे घाई होणार नाही.
धनु : विरोध होईल
प्रत्येक गोष्ट प्रत्येक वेळी आपल्या मनासारखी होणे गरजेचे नसते. कधी कधी विरोधाचाही सामना करणे अत्यावश्यक असतं. आज तुम्हाला अनोळखी लोकांकडून विरोध होऊ शकतो. अपचनाचा त्रास होऊन प्रकृती बिघडू शकते. म्हणून स्वत:ची काळजी घ्या. प्रयत्न करुनही यश मिळत नसेल तर कर्मामध्ये बदल करुन बघा. भाग्याची साथ मिळू शकते.
मकर : शत्रूंचा पराभव
कधी कधी स्वत: जिंकण्यापेक्षा शत्रू पराभूत झाल्याचा आनंद मोठा असतो. आज तुम्हाला तो आनंद मिळू शकतो. म्हणून एखादी संधी चालुन आली तर तिचा लाभ घ्यायला विसरु नका. नाही तर नंतर पश्चातापाची वेळ येईल. शरीरासाठी जंक फूड वाईटच असतात. त्यामुळे आज तुम्ही ते टाळायला हवेत. नाही तर अन्नबाधा होऊ शकते. स्वत:ची काळजी घ्या.
लेखिकेचा संपर्क करा : श्री ज्योतिष संशोधन केंद