मेष – नवीन कार्यात व्यस्त व्हाल
राजकारणातील लोकांसाठी आज शुभ दिवस आहे. नवीन कार्यातील व्यस्तता वाढेल. आयात-निर्यातीचा व्यवसाय करणाऱ्या लोकांना लाभ मिळेल. रचनात्मक कार्यात प्रसिद्धी मिळेल. विद्यार्थ्यांना व्यवसायिक कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल.
कुंभ – घरातील वृद्धांच्या आरोग्याची काळजी घ्या
आज तुम्हाला घरातील वृद्धांची काळजी घ्यावी लागेल. अनावश्यक वादात फसण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी एखाद्या सहकाऱ्यांच्या वागण्याचा त्रास होऊ शकतो. खर्च वाढण्याची शक्यता आहे. जोडीदाराची भावनिक साथ नक्कीच मिळेल. प्रवास करणे टाळा.
मीन- कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील
मुलांचं लग्न ठरल्यामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. मित्रांकडून भेटवस्तू मिळेल. एखाद्या आदर्श व्यक्तीकडे मनातील भावना व्यक्त करा. राजकारणातील पकड मजबूत होईल. कोर्ट कचेरीतून सुटका होईल.
वृषभ – आज उधारी देऊ नका
आज कौटुंबिक संपत्तीबाबत समस्या वाढतील. कुणालाही उधारी देऊ नका. कारण ते पुन्हा मिळण्याची शक्यता कमी आहे. व्यावसायिक योजना पूर्ण करण्यासाठी आयुष्याची पूंजी खर्च करावी लागेल. कौटुंबिक साथ मिळाल्याने कठीण कामे पूर्ण होतील.
मिथुन – आरोग्य उत्तम राहील
आरोग्य उत्तम राहण्याची शक्यता आहे. व्यापारात विस्तार होण्याची शक्यता आहे मात्र आर्थिक तणाव वाढू शकतो. कामाच्या ठिकाणी तुमची स्तुती होईल. रचनात्मक कार्यात रूची वाढण्याची शक्यता आहे. मित्रांसोबत प्रवासाचा योग आहे. जोडीदारासोबत नाते मजबूत होईल.
कर्क – प्रेमात दुर्लक्ष करू नका
प्रेमात दुर्लक्ष केल्यामुळे समस्या येऊ शकतात. मनाच्या विरूद्ध काम करावे लागेल. मुलांची चिंता सतावेल. विरोधकांमुळे कामात समस्या वाढू निर्माण होतील. रचनात्मक कार्यात रूची वाढेल. देणी- घेणी सावधपणे करा. धार्मिक कार्यात रस वाढेल.
सिंह – वडीलांच्या आरोग्याच्या समस्या वाढू शकतात
वडीलांच्या आरोग्याच्या समस्या वाढू शकतात. आज तुम्हाला लाभाच्या अनेक संधी मिळू शकतात. व्यापारासाठी आजचा दिवस सुखाचा असेल. उत्पन्नाची साधने वाढतील. एखाद्या संस्थेकडून सन्मान मिळेल. मित्रांशी भेट होण्याची शक्यता आहे. विरोधक नमतील. वादविवाद करणे टाळा.
कन्या – रखडलेले पैसे मिळण्याची शक्यता
आज तुम्हाला रखडलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक संपत्तीचे वाद संपण्याची शक्यता आहे. वाहन खरेदी करण्याचा विचार कराल. व्यवसायात आर्थिक लाभाची संधी मिळेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. नवीन कामे मिळण्याची शक्यता आहे. रखडलेले एखादे काम आज सहज पूर्ण होईल.
तूळ – प्रेमात यश मिळण्याची शक्यता
आज तुम्हाला प्रेमात यश मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही अगदी प्रामाणिकपणे तुमच्या मनातील भावना व्यक्त केल्या तर सर्वांकडून सहकार्य नक्कीच मिळेल. विद्यार्थ्यांना यश मिळण्याची शक्यता आहे. घरच्या लोकांची चिंता सतावेल. नाती आणि काम यात समतोल राखा.
वृश्चिक – कामाच्या ठिकाणी समस्या येतील
कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या सांभाळण्यात आज तुम्हाला अपयश येईल. जोडीदारापासून दूर रहावे लागेल. कोर्ट-कचेरीत यश मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात चढ-उतार येण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास कमी होऊ शकतो. धार्मिक कार्यातील रस वाढण्याची शक्यता आहे.
धनु – नवीन प्रॉपर्टी खरेदी कराल
नवीन प्रॉपर्टी खरेदी करण्याची शक्यता आहे. मुलांकडून मिळालेल्या आनंदवार्तामुळे मन खुश राहील. धार्मिक कार्यात रस वाढण्याची शक्यता आहे. लाभाची संधी मिळेल. व्यावसायासाठी नवीन योजना आखाल. आई-वडीलांचे सहकार्य मिळेल.
मकर – व्यवसायात तोटा होण्याची शक्यता
आज तुम्हाला काम करताना सावध राहण्याची गरज आहे. व्यवसायात तोटा होण्याची शक्यता आहे. पैशांचे व्यवहार आणि गुंतवणूक करताना सावध रहा. विरोधक तुमच्या प्रतिष्ठेला धक्का लागू शकतो. शांत मनाने तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. कौटुंबिक वातावरण सुखाचे असेल.
अधिक वाचा
12 राशीमध्ये चार राशी असतात जास्त बलशाली
जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’
आळशी असतात ‘या’ राशीचे लोक, तुम्ही पण त्यातले एक आहात का