ADVERTISEMENT
home / भविष्य
31, मे 2019 चं राशीफळ, मेष राशीच्या व्यक्तींना नोकरीत मिळणार बढती

31, मे 2019 चं राशीफळ, मेष राशीच्या व्यक्तींना नोकरीत मिळणार बढती

मेष – नोकरीमध्ये पदोन्नती होण्याची शक्यता

आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी करण्यात आलेले सर्व प्रयत्न यशस्वी होतील. विद्यार्थ्यांना यश प्राप्त होईल. रखडलेली कामं मार्गी लागतील. नोकरीमध्ये बढती मिळू शकते. सुखसमाधानात वृद्धी होईल. भावनात्मक पातळीत वाढ होईल. अध्यात्मामध्ये आवड निर्माण होईल.

कुंभ – सांधेदुखीने त्रस्त होण्याची शक्यता

सांधेदुखीने त्रस्त होण्याची शक्यता आहे. आपल्या खाण्यापिण्याची नीट काळजी घ्या. रखडलेली कामं मार्गी लागण्याचे संकेत. सामाजिक प्रतिष्ठा आणि मानसन्मान वाढेल. जोडीदारासह संबंधात मधुरता राहील. व्यवसायात नवा प्रोजेक्ट मिळू शकतो. भेटीगाठी होतील.

मीन – कुटुंबात आनंद वाढेल

आज तुमच्या चारही बाजूला आनंदाचं वातावरण राहील. कुटुंबामध्येही आनंद वाढेल. संततीकडून सुखद वार्ता येतील. विरोधक तुमची प्रशंसा करतील. व्यवसायात तुम्हाला लाभ होण्याची शक्यता. आरोग्याची काळजी घ्या. रचनात्मक कार्यात प्रगती होईल.

वृषभ – मूल्यवान वस्तू हरवण्याची भीती

कोणतीतरी मूल्यवान वस्तू हरवण्याची भीती आहे. वाहनावरही जास्त खर्च होण्याची शक्यता आहे. जोडीदारासह कोणत्यातरी कार्यक्रमात जाण्याचा योग. रखडलेली कामं मार्गी लागतील. नावडत्या लोकांची भेट होईल. आर्थिक स्थिती मजबूत राहील.

ADVERTISEMENT

मिथुन – गंभीर आजाराचा चांगला रिपोर्ट येईल

कुटुंबामध्ये कोणाला गंभीर आजार असल्यास, त्याचा रिपोर्ट चांगला येईल. पूर्ण दिवस उत्साहात राहाल. कुटुंबासह आनंद साजरा करण्याचा दिवस. कोणत्यातरी सामाजिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. धार्मिक कार्यात मन रमेल.

कर्क – कुटुंबामध्ये होऊ शकतो गैरसमज

मित्रपरिवाराशी वाद घालू नका. उगीच गैरसमज होतील. तसंच तुमच्या बोलण्याने कुटुंबातही गैरसमज होण्याची शक्यता आहे. कार्यकुशलतेने पदोन्नती होऊ शकते. रचनात्मक कार्यात प्रगती होईल. वाहन चालवताना सावधानता बाळगा. रखडलेली कामं मार्गी लागतील.

सिंह – मानसिक अशांतता राहील

आज तुमचं मन अतिशय अशांत राहील. कोणती तरी गोष्ट तुम्हाला मनात त्रास देत राहील. आत्मविश्वासात कमतरता जाणवेल. रखडलेली कामं मार्गी लागतील. आकस्मिक धनलाभ होऊ शकतो. विरोधकांपासून सावध राहा. जोडीदाराची साथ मिळेल. धार्मिक कार्यात मन रमेल.

कन्या – संपत्तीसंदर्भात आनंदाची बातमी मिळू शकते

आज संपत्तीसंबंधी चांगली बातमी मिळू शकते. तुम्हाला तुमच्या संपत्तीत वाटाही मिळू शकतो. रचनात्मक कार्यात प्रगती होईल. व्यवसायातील योजनांना यश मिळेल आणि काही नवीन शिकायला मिळेल. सन्मानात प्रगती होईल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला सकारात्मक बातम्या मिळतील.

ADVERTISEMENT

तूळ – कोणाशीतरी खास भेट होण्याची शक्यता

अचानक कोणाशीतरी खास भेट होऊ शकते. प्रेमसंबंध फुलतील. जोडीदाराबरोबर आलेला कटूपणा दूर होईल. कुटुंबामध्ये आनंद येईल. नोकरीमध्येही पदोन्नती मिळू शकते. व्यावसायिक प्रवास फायदेशीर ठरतील. आरोग्याची काळजी घ्या.

वृश्चिक – नवं काम सुरू करू नका

आज कोणतंही नवं काम सुरू करू नका. त्रास होऊ शकतो. जोखीम असणाऱ्या कामांपासून दूरच राहा.  व्यावसायिक त्रास होण्याची शंका आहे. जोडीदाराबरोबर संबंध चांगले राहतील. मित्रांपासून दुरावा आला असल्यास, पुन्हा मन जोडले जाईल. राजकारणात जबाबदारी वाढेल.

धनु – आईकडून धनप्राप्ती होण्याची शक्यता

आईकडून धनप्राप्ती होण्याची शक्यता. उत्पन्नाचे नवे मार्ग बनवाल. कोर्टकेस जिंकू शकता. देण्याघेण्याची मोठी समस्या सुटू शकते. रखडलेले पैसे मिळतील. नोकरीमध्ये  पदोन्नती मिळेल. जोडीदारासह संबंधात मजबूती येईल. रचनात्मक कार्यात प्रगती होईल.

मकर – बेजाबदारीमुळे चांगल्या संधी गमवाल

आज तुम्ही तुमच्या बेजबाबदारपणामुळे चांगली संधी गमावू शकता. कार्यालयात अधिकाऱ्यांबरोबर मतभेद होऊ शकतात. आर्थिक नुकसान होईल. आत्मविश्वासात कमतरता जाणवेल. मित्रांचे सहयोग मिळेल. कोणत्याही चांगल्या कार्यामुळे तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि धनवृद्धी होईल.  

ADVERTISEMENT
27 May 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT