मेष – रखडलेले पैसे परत मिळतील
रखडलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. जुनी गुंतवणूक अथवा व्यवहारात फायदा होईल. विद्यार्थ्यांना परदेशी जाण्याची संधी मिळेल. प्रेमयुगूलांसाठी चांगला काळ आहे. बिघडलेली कामे सुधाण्याची शक्यता आहे.
कुंभ – जुने वाद विसरून पुढाकार घ्या
आज तुम्हाला नातेसंबंधांमधील जुने वाद विसरून पुढाकार घ्यावा लागेल. महत्त्वाच्या लोकांशी संपर्क वाढेल. व्यावसायिक विस्तार होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. धार्मिक कार्यातील रूची वाढेल.
मीन- विद्यार्थ्यांचे मन अभ्सासात रमणार नाही
आज विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात लागणार नाही. कामाच्या पद्धतीमुळे अधिकारी नाराज होतील. जोडीदाराच्या साथीने सामाजिक कार्यात सहभाग घ्याल. राजकाराणातील जबाबदाऱ्या वाढतील.
वृषभ – करिअरमध्ये चांगला बदल होईल
आज तुमच्या अथवा तुमच्या जोडीदाराच्या करिअरमध्ये अचानक आणि चांगला बदल होणार आहे. मेहनतीचे फळ मिळेल. सकारात्मक निर्णय मिळाल्याने आनंदी व्हाल. रचनात्मक कार्यात रस वाढणार आहे. एखादी आनंदवार्ता मिळण्याची शक्यता आहे.
मिथुन – लहान सहान दुखणं डोकं वर काढेल
आज तुमचं एखादं लहान सहाण दुखणं परत येण्याची शक्यता आहे. स्वभावात चिडचिड जाणवेल. खर्च वाढू शकतो. जोडीदाराची साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी आनंदाचे वातावरण असेल. महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी वेळ चांगली आहे.
कर्क – जुनी मैत्री प्रेमात बदलण्याची शक्यता
आज तुमची एखादी जुनी मैत्री प्रेमात बदलू शकते. बिघडलेले काम पुन्हा दुरूस्त होईल. मुलांकडून आनंदवार्ता मिळू शकते. व्यवसायात वाढ होईल. कामाच्या ठिकाणी तुम्ही स्वतःची वेगळी ओळख निर्माण कराल. उत्पन्न वाढणार आहे.
सिंह – विद्यार्थ्यांना आनंदवार्ता मिळेल
आज विद्यार्थ्यांना एखादी आनंदवार्ता मिळण्याची शक्यता आहे. रचनात्मक कार्यात रस वाढणार आहे. प्रवासाचा योग आहे. मित्रांशी भेट होण्याची शक्यता आहे. प्रेमप्रकरणात आनंदाचे वातावरण असेल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल.
कन्या – कर्ज मिळणं कठीण आहे
आज तुम्ही कोणाकडूनही कर्ज अथवा उधारी घेऊ नका. एखादी मौल्यवान वस्तू तुटण्याची अथवा हरवण्याची शक्यता आहे. व्यावसायिक योजनेसाठी आयुष्यभराची पुंजी गुंतवावी लागेल. आर्थिक स्थिती बिघडण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या भावनांचा विचार करा.
तूळ – आरोग्यात सुधारणा होण्याची शक्यता
आज तुमच्या आरोग्यात सुधारणा होण्याची शक्यता आहे. थंड अथवा गरम खाद्यपदार्थ खाताना सावध रहा. मित्रांच्या मदतीने कामे पूर्ण होतील. उत्पन्नाचे नवे साधन मिळेल. रचनात्मक कार्यात प्रगती होईल. विरोधक नमतील.
वृश्चिक – सासरच्या मंडळींसोबत मतभेद वाढतील
सासरच्या लोकांसोबत आज तुमचे मतभेद वाढणार आहेत. बाहेरच्या लोकांना घरात ढवळाढवळ करू देऊ नका. अधिकाऱ्यांसोबत तुमचा तणाव वाढू शकतो. अचानक धनलाभ होणार आहे. वाहन चालवताना सावध रहा.
धनु – ताणतणाव वाढेल
आज अचानक प्रवास करावा लागल्याने तुमचा तणाव वाढणार आहे. जमा खर्चाचा समतोल साधा. वादविवादाच्या गोष्टींपासून दूर रहा. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या वाढतील. सामाजिक सन्मान आणि धनसंपत्तीत वाढ होईल.
मकर- कौटुंबिक संपत्ती मिळण्याची शक्यता
आज तुम्हाला कौटुंबिक संपत्तीचा हिस्सा मिळेल. जुने नुकसान आज फायद्यात बदलणार आहे. आत्मविश्वास वाढेल. कामाच्या ठिकाणी मनासारखे काम मिळाल्याने उत्साहित व्हाल.
अधिक वाचा
जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’
12 राशीमध्ये चार राशी असतात जास्त बलशाली