मेष : कल्पकतेला वाव
आपल्या कल्पक व सर्जनशील कार्याला आज प्रगती मिळू शकते. त्यामुळे कल्पनांना मूर्त स्वरुप देण्यासाठी आज प्रयत्न वाढवायला हवेत. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही. त्यामुळे काही मिळवायचे असेल तर तुम्हाला सहन करावेच लागेल. तणावमुक्त राहून मनसोक्त जगण्याची संधी आज मिळत आहे, तेव्हा जगून घ्या.
कुंभ : मुद्देसुद बोला
कोणाशीही बोलातांना मुद्देसुदच बोलणे आज तुमच्या हिताचे राहिल. तोल मोल के बोल हे धोरण आज स्विकारा. लहान फायद्यासाठी जर मोठं नुकसान होणार असेल तर तो लहान फायदाही नको. कुणाच्या बोलण्यात येऊ नका. ऐकावे जनाचे करावे मनाचे, हे लक्षात ठेवा. भाग्याची तुम्हाला साथ आहे. यश मिळविण्यासाठी प्रयत्न वाढवा.
मीन : आत्मविश्वास कमी
आज तुमच्यात आत्मविश्वासाची कमतरता राहणार आहे. त्यामुळे कोणतेही निर्णय आज घेऊ नका. उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एकाच साधनावर अवलंबून राहू नका. पर्यायी साधन तयार करा. प्रयत्न सोडू नका. होऊ शकतं आज तुमच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होण्यासाठी नवीन मार्ग तुम्हाला सापडतील.
वृषभ : आकस्मिक आनंद
आज सायंकाळपर्यंत तुम्हाला आकस्मिकरीत्या एखाद्या गोष्टीने आनंद प्राप्त होऊ शकतो. त्याचा पुरेपुर आनंद प्राप्त करण्यासाठी सज्ज राहा. कारण तो अविस्मरणीयही असू शकतो. जीवनामध्ये धोका न पत्करणे हाच सर्वात मोठा धोका असतो. म्हणून स्वत:च्या प्रयत्नांवर विश्वास ठेवून तुम्ही धोका,जोखिम पत्करायला हवी.
मिथुन : कामे टाळाल
आज आळस जाणवेल. त्यामुळे कामे टाळण्याकडे कल राहिल. विशेषत: विद्यार्थी आज अभ्यास टाळण्याचा प्रयत्न करतील. आपल्या संततीला आज यश मिळणार आहे. त्याचं कौतुक करुन प्रोत्साहन द्यायला विसरु नका. भावंडांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. टाळी एका हाताने वाजत नाही. म्हणून वाद वाढवू नका. सामंजस्याची भूमिका घ्या.
कर्क : मुद्देसुद बोला
आज तुम्हाला आपल्या शब्दांवर नियंत्रण ठेवाव लागेल. कोणाशीही बोलतांना आवश्यक तेवढेच व मुद्देसुद बोला. उचलली जीभ लावली टाळ्याला असं करु नका. जीवन जगतांना सुखाचा गुणाकार व दु:खांचा भागाकार करायचा असतो, हे लक्षात घ्या. महत्वाची कागदपत्रे सुरक्षित आहेत की नाही, हे तपास व सांभाळून ठेवा.
सिंह : वैरभावना त्यागा
तुमच्या मनात जर एखाद्याविषयी वैरभावना असेल तर तिचा त्याग करा. जळात राहून माशाशी वैर करणे योग्य नाही. भविष्यात मोठा फायदा होणार असेल आज होणारे लहान नुकसान चालेल. त्याला भविष्यासाठी केलेली गुंतवणूक समजा. सत्याची बाजु सोडू नका. काही मिळवायचे असेल तर प्रयत्नांशिवाय पर्याय नाही, हे लक्षात घ्या.
कन्या : आत्मविश्वास वाढेल
अमर्याद सहनशिलता व उत्साह या दोन्ही गोष्टींनी तुमचा आजचा दिवस परिपूर्ण राहणार आहे. त्यामुळे आज तुमचा आत्मविश्वासही वाढणार आहे. त्याच बळावर तुम्ही तुमच्या योग्यतेला उंची प्राप्त करुन देणार आहेत. आधी केलेल्या मुर्खपणाची फळे आज तुमच्या वाटेला येऊ शकतात. त्यामुळे आलीया भोगासी असावे सादर.
तूळ : आति आत्मविश्वास घातक
यश मिळविण्यासाठी आत्मविश्वास पोषक तर अतिआत्मविश्सास हा घातक असतो. उथळ पाण्याला खळखळाट फार असतो. या अनिश्चित जगामध्ये निश्चिता शोधणे म्हणजे वेळ व्यर्थ घालविणे आहे. सोशल मीडियाचा अतिवापर सर्वांसाठीच घातक आहे. विद्यार्थ्यांसाठी तर यापासून लांबच राहायला पाहिजे, ही बाब विद्यार्थांसह पालकांनीही लक्षात घ्यावी.
वृश्चिक : बेशिस्त नको
आज थोडीही बेशिस्त तुम्ही करता कामा नये. एक ना धड भराभरा चिंध्या यापासून लांब राहा. आज तुमचा गोधळाचा दिवस असल्यामुळे कुठल्याही महत्त्वपूर्ण गोष्टीवर निर्णय घेऊ नका. वरकरणी कठोर व आतून कनवाळू स्वभावाचे तुम्ही आहात. म्हणून सावध राहा. लोक आपला गैरफायदा घेणार नाही, याकडे लक्ष द्या.
धनु : शेरेबाजी नको
आज तुम्हाला आपल्या शब्दांवर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला देण्यात येत आहे. तडका-फडकी कोणावरही शेरेबाजी करु नका. आपल्या बोलण्याने संबंध बिघडणार नाहीत, याची काळजी घ्या. एखाद्या कामाला अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागू शकतो. यश प्राप्त करायचे असेल तर विद्यार्थांनी आपले संपूर्ण लक्ष अभ्यासात देणे गरजेचे आहे.
मकर : काळजी घ्या
आज तुमचे सासरच्या मंडळींशी वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग, अशी स्वत:ची अवस्था होणार नाही, याची काळजी घ्या. कल्पक व सर्जनशील कार्यात प्रगती आज होऊ शकते. म्हणून आपल्या कल्पनांना मूर्त स्वरुप देण्याचा प्रयत्न करा. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही, हे लक्षात ठेवा. नौकरी व व्यवसायात मिळणा-या संधीचा लाभ घ्या.
लेखिकेचा संपर्क करा : श्री ज्योतिष संशोधन केंद्र