मेष – शारीरिक त्रासापासून मिळेल आराम
शारीरिक आजारांच्या त्रासापासून आराम मिळेल. तुमच्या व्यक्तीमत्वामुळे आज तुम्हाला काही चांगल्या गोष्टींचा लाभ होईल. सकारात्मक विचारांमुळेही तुम्हाला लाभ मिळेल. तुमच्या प्रियजनांबरोबर प्रवासात अडचण येण्याची शक्यता आहे. विरोधकांपासून सावधान राहा. नोकरीमध्ये काही अडचणी येण्याची शक्यता आहे. राजनैतिक लाभ मिळण्याची शक्यता आहे.
कुंभ – उच्च शिक्षणातील अडचणी दूर होतील
उच्च शिक्षणात अडचणी येत असतील तर त्या दूर होतील. वरीष्ठांशी असणारी तुमची मैत्री तुमच्या उन्नतीमध्ये सहाय्यक ठरेल. आपल्या व्यावहारिक कौशल्यामुळे बराच लाभ मिळेल. नैतिक कार्यांमध्ये कोणताही बेजबाबदारपणा दाखवू नका. रखडलेली कामं मार्गी लागतील. तुमच्या प्रेमळ व्यक्तीशी आज तुमची भेट होईल.
मीन – वेळ आणि पैसा दोन्ही फुकट जाण्याची शक्यता
आजच्या दिवशी वेळ आणि पैसे दोन्ही फुकट जाण्याची शक्यता आहे. पैसे अधिक खर्च झाल्यामुळे तुम्ही त्रासात राहाल. नोकरीमधील वातावरणामुळेदेखील तुम्ही आज चिडचिड करण्याची शक्यता आहे. जागा बदलण्याचा आज योग आहे. झालेल्या चुका सुधारण्याची चांगली संधी आहे. रचनात्मक कार्यात आज सन्मान मिळेल.
वृषभ – प्रेमसंबंधामध्ये आज दुरावा येण्याची शक्यता
कोणत्याही नातेवाईकांबरोबर तणावाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधामध्येही दुरावा येईल. खासगी गोष्टी टाळल्यामुळे समस्या अधिक वाढीला लागेल. आध्यात्मिक भावना मनाला प्रभावित करतील. कार्यकुशलता असल्यामुळे पदोन्नती होऊ शकते. व्यापारिक यात्रा यशस्वी होईल. नवी वाहनखरेदी करण्याची शक्यता.
मिथुन – बऱ्याच गोष्टीत यश मिळण्याची शक्यता
व्यवसायात नवं यश मिळेल. नव्या नोकरीची संधीदेखील मिळेल. सुखसाधनांमध्ये वृद्धी होईल. धार्मिक अथवा सामाजिक कार्यात प्रतिष्ठा वाढेल. रखडलेली कामं पूर्ण होण्याची शक्यता आहे. राजकारणामध्ये सक्रियता वाढीला लागेल. आदान – प्रदानाच्या गोष्टी उलगडतील.
कर्क – डोळ्यांच्या त्रासाने हैराण होण्याची शक्यता
तुम्हाला आज डोळ्यांचा त्रास होण्याची शक्यता आहे. लहानसहान आजाराकडे दुर्लक्ष करू नका. आदान आणि प्रदानामध्ये संतुलन ठेवा. नोकरीमध्ये वातावरण तणावपूर्ण होण्याची शक्यता आहे. आळसापोटी काम करणं थांंबवू नका. जोडीदाराबरोबर सामाजिक कार्यक्रमामध्ये सहभागी व्हाल.
सिंह – वरीष्ठांच्या मदतीने गोष्टी उलगडतील
वरीष्ठांच्या मदतीने जुने वाद मिटतील. प्रियजनांच्या मदतीने नोकरीच्या ठिकाणी असलेले त्रास कमी होतील. जुन्या मित्रांशी भेट फायदेशीर ठरेल. मानसिक ऊर्जेत वृद्धी होईल. आपल्या रागावर नियंत्रण ठेवा. लहानसहान आजार होण्याची शक्यता आहे.
कन्या – व्यापारात काही अडचणी येण्याची शक्यता
व्यापारात काही अडचणी येण्याची शक्यता आहे. आर्थिक नुकसान होण्याचीदेखील शक्यता आहे. वाढत्या खर्चामुळे तुम्ही त्रासात असाल. बदलत्या वातावरणामुळे आजारी पडण्याची शक्यता आहे. मित्रांबरोबर प्रवास सुखकारक आणि फायदेशीर ठरतील. कौटुंबिक संबंधामधील मधुरता पुन्हा एकदा अनुभवू शकाल.
तूळ – नव्या योजनांना सुरुवात होण्याची शक्यता
आज व्यवसायात लाभ झाल्यामुळे मन प्रसन्न राहील. कोणतंतरी नवं काम सुरु होण्याची शक्यता आहे. आर्थिक क्षेत्रात प्रगती होत राहील. काही कौटुंबिक समस्या त्रास देऊ शकतात. जोडीदाराकडून भावनात्मक पाठिंबा मिळेल.
वृश्चिक – कामाच्या शोधात होईल त्रास
नव्या कामासाठी शोध घ्यावा लागेल. वरीष्ठांच्या आश्वासनामुळे काम बिघडू शकतं. आश्वासनांनी घाबरून जाऊ नका. कायद्याच्या वादांमध्ये यश मिळेल. कोणत्याही कामात त्रास असल्यासारखं वाटेल. आई – वडिलांकडून पैसे मिळण्याची शक्यता आहे. मित्रांबरोबर मजा मस्ती तशीच चालू राहील.
धनु – आरोग्याच्या काळजीमुळे तणाव वाढण्याची शक्यता
आज कुटुंबात तणाव वाढू शकतो. तुम्ही तुमच्या आरोग्याच्या काळजीमुळे तणावात राहण्याची शक्यता आहे. भविष्याच्या काळजीत राहाल. नोकरीमध्ये उन्नतीसाठी आळस झटकून द्याल. व्यापारामध्ये उन्नती होईल. मुलांकडून सुख मिळेल. धार्मिक कार्यात आवड वाढेल.
मकर – जवळच्या व्यक्तीची भेट होईल
आज तुम्ही ज्याच्यावर प्रेम करत आहात त्या जवळच्या व्यक्तीशी भेट होईल. नवे प्रेमसंंबंध निर्माण होऊ शकतात. आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होईल. साहित्य आणि संगीतात तुमची आवड वाढेल. देणीघेणी असतील तर ती उलगडतील. कौटुंबिक जीवन सुखकारक राहील. कुटुंबाच्या सहयोगाने तुमची कठीण कामं पूर्ण होतील.
हेदेखील वाचा –
आपल्या राशीनुसार करून पाहा या सेक्स पोझिशन (Sex Position)
जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात ‘प्रेम’
राशीनुसार जाणून घ्या कोणता नंबर आहे तुमच्यासाठी भाग्यशाली