मेष – धनसंपत्तीबाबत एखादी आनंदवार्ता मिळेल
आज तुम्हाला धनसंपत्तीबाबत एखादी आनंदवार्ता मिळेल. कुटुंबातील लोकांसोबत फोनवर गप्पा मारल्यामुळे मन आनंदी राहील. घरात राहून नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा.
कुंभ – शारीरिक आणि मानसिक आराम मिळेल
आज विनाकारण तुमची दगदग वाढणार आहे. काही दिवस घरात राहणे योग्य राहील. शारीरिक आणि मानसिक आराम मिळेल. प्रिय व्यक्तीसोबत फोनवर संपर्क साधा. व्यावसायिक स्थितीत स्थिरता येण्याची शक्यता आहे.
मीन- प्रिय व्यक्तीसोबत मतभेद होतील
आज तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत तुमचे मतभेद होण्याची शक्यता आहे. इतरांसाठी तुम्हाला स्वतःचे वैयक्तिक निर्णय बदलावे लागणार आहेत. मुलांच्या जबाबदाऱ्या पूर्ण कराल. सामाजिक कार्यापासून काही दिवस दूरच राहा. आर्थिक स्थिती मजबूत राहील.
वृषभ – तणाव जाणवेल
पायाचं दुखणं जाणवण्याची शक्यता आहे. तणाव वाढेल. स्वतःचे आणि कुटुंबाची काळजी घ्या. व्यवसायात स्थिरता येण्याची शक्यता आहे. घरात राहून कुटुंबाची काळजी घ्या. रचनात्मक कार्यातील रस वाढणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत राहील.
मिथुन – कुटुंबाच्या मदतीने लक्ष्य साध्य कराल
आज तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या मदतीने तुमचे लक्ष्य साध्य कराल. घरात मंगल कार्य घडणार आहे. सहकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉलने संपर्क साधाल. व्यवसायात लाभ मिळण्याची शक्यता आहे.
कर्क – विद्यार्थ्यांना जास्त मेहनतीची गरज आहे
आज विद्यार्थ्यांना अधिक मेहनतीची गरज आहे. कमजोर विषयांवर जास्त लक्ष द्या. ज्या लोकांशी बरेच वर्ष संवाद झालेला नाही अशा लोकांसोबत फोनवर संपर्क साधण्याची संधी मिळेल.
सिंह – कौटुंबिक संपत्ती मिळण्याची शक्यता
आज तुम्हाला कौटुंबिक संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. जोडीदारासोबत नाते मजबूत होईल. विद्यार्थ्यांना समस्या येण्याची शक्यता आहे.प्रभावशाली व्यक्तीची भेट काही कारणांमुळे होणार नाही.
कन्या – नवीन काम करणे सध्या टाळा
आज विद्यार्थ्यांच्या मनात नकारात्मक विचार येण्याची शक्यता आहे. व्यवसायातील योजनांमध्ये बदल करावे लागतील. नवीन कामाला सुरूवात करणे टाळा. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. घरात कॅंडल लाईट डिनरचा प्लॅन कराल.
तूळ – डोकेदुखी जाणवणार आहे
आज तुम्हाला अचानक तीव्र डोकेदुखी जाणवेल. प्रेमसंबधांमध्ये दूरावा येण्याची शक्यता आहे. वाहन चालवताना सावध राहा. कोर्टकचेरीचे पालन करा. घरात राहून कुटुंबाची काळजी घ्या. आर्थिक स्थिती मजबूत राहील.
वृश्चिक – नातेसंबंध बिघडण्याची शक्यता
आज तुमचे नातेसंबंध बिघडण्याची शक्यता आहे. वर्क फ्रॉम होम करावे लागणार आहे. जोडीदाराचे प्रेम आणि साथ चांगली मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील.
धनु – मोठं यश मिळण्याची शक्यता
आज तुम्हाला व्यवसायात कष्ट आणि सातत्याने चांगले यश मिळणार आहे. सध्या प्रवासाला जाण्याचे सर्व बेत रद्द करा. विरोधक नमणार आहेत. कोणतेही व्यवहार करणे सध्या टाळा. आरोग्याची विशेष काळजी घ्या.
मकर – पैसे अडकण्याची शक्यता
आज तुम्हाला व्यवहारात सावध राहण्याची गरज आहे. पैसे अडकण्याची शक्यता आहे. कोर्टकचेरीतून सुटका मिळेल. कामाच्या ठिकाणी अधिकारी तणाव वाढवण्याची शक्यता आहे. वादविवाद करणे सध्या टाळा.
हे ही वाचा –
2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला
अधिक वाचा –
जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’
तुमच्या राशीनुसार जाणून घ्या तुम्ही कशा ‘आई’ आहात