मेष – विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात रमणार नाही
आज विद्यार्थ्यांना अभ्यासाचा कंटाळा येईल. मित्रमैत्रिणींसोबत वेळ घालवाल. आत्मविश्वास कमी होईल. खर्च वाढणार आहे. आरोग्याची काळजी घ्या. व्यावसायिक कामे रखडण्याची शक्यता आहे.
कुंभ – रखडलेले पैसे मिळतील
आज तुमचे व्यवसायातील रखडलेले पैसे परत मिळणार आहेत. एखादी आनंदवार्ता लवकरच मिळणार आहे. रचनात्मक कार्यातील लोकांना विशेष मानसन्मान आणि भेटवस्तू मिळेल. जोडीदारासोबत रोमॅंटिक प्रवासाला जाण्याची शक्यता आहे.
मीन- भावंडांचे सहकार्य मिळेल
आज तुम्हाला व्यवसायात भावंडांची साथ मिळणार आहे. व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. प्रतिष्ठित लोकांशी ओळख होणार आहे. येत्या काळात याचा तुम्हाला चांगला फायदा मिळेल. घरातील वृद्ध व्यक्तीची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे.
वृषभ – भाग्योदयाचा योग आहे
आज तुम्हाला भाग्योदयाचा योग आहे. चल-अचल संपत्ती खरेदी करण्याची योजना आखाल. वैयक्तिक गोष्टी टाळल्याने समस्या वाढू शकते. रखडलेली कामे पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी पदोन्नती होण्याची शक्यता आहे.
मिथुन – तरूणांना नवीन काम शोधावे लागेल
आज तरूण मंडळींना नव्या कामासाठी दगदग करावी लागेल. योग्य वेळी निर्णय न घेतल्यास नुकसान सहन करावे लागू शकते. पैशांसंबधी चांगली बातमी मिळेल. कोर्टकचेरीतून सुटका मिळेल.
कर्क – विनाकारण दगदग करावी लागेल
आज विनाकारण दगदग केल्यामुळे कंटाळा जाणवेल. शारीरिक थकवा आणि अशक्तपणा येऊ शकतो. विद्यार्थ्यांना अभ्यासासोबत सामाजिक कार्यात रस वाढेल. वाहन चालवताना सावध रहा.
सिंह – मैत्रीचं रूपातंर प्रेमात होईल
आज अचानक तुमच्या एखाद्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात होण्याची शक्यता आहे. रखडलेली कामे करण्यासाठी कुटुंबाची चांगली साथ मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी परदेशी जावं लागेल. व्यवसायात फायदा होईल. कामाच्या ठिकाणी नवीन कामांची संधी मिळेल.
कन्या – ध्येय साध्य करण्यात यश
आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी योग्यता आणि कौशल्यामुळे एखादी नवीन जबाबदारी मिळेल. नियोजित ध्येय आज तुम्ही साध्य करणार आहात. आज तुमचं एखादं रखडलेलं काम पूर्ण होणार आहे. अभ्यासात चांगली गती मिळेल.
तूळ – कर्ज घ्यावं लागेल
आज तुम्हाला एखादं कर्ज घ्यावं लागू शकतं. विनाकारण खर्च करणे कमी करा. जोखिमेची कामे करण्यापासून सावध रहा. मेहनत जास्त आणि फळ कमी मिळेल. कौटुंबिक समस्यांमुळे मन निराश होण्याची शक्यता आहे. जोडीदाराची भावनिक साथ मिळेल.
वृश्चिक – आजारपणातून सुटका मिळेल
आज तुम्हाला सांधेदुखी अथवा पाठदुखीच्या त्रासातून सुटका मिळणार आहे. छोट्या-मोठ्या समस्या सुटणार आहेत. व्यवसायात नवीन कामांमुळे मन उत्साहीत राहील. आर्थिक स्थिती चांगली होईल.
धनु – प्रेमात निराशा मिळू शकते
प्रेमप्रकरणात आज तुम्हाला निराशा मिळू शकते. एखादा मित्र अथवा जोडीदारामुळे तणाव वाढणार आहे. मुलांची चिंता वाढू शकते. वादविवाद करणे टाळा. रचनात्मक कामातील रस वाढण्याची शक्यता आहे.
मकर- डोकेदुखी अथवा कफाचा त्रास जाणवेल
आज तुम्हाला अचानक डोकेदुखी अथवा कफाचा त्रास जाणवू शकतो. आरोग्याची नीट काळजी घ्या. नेहमीची कामे करण्याचा कंटाळा करू नका. रखडलेली कामे पूर्ण होतील. खेळात प्राविण्य मिळेल. देणीघेणी सांभाळून करा. जोडीदाराशी नातं मजबूत होईल.
अधिक वाचा
जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’
12 राशीमध्ये चार राशी असतात जास्त बलशाली
आळशी असतात ‘या’ राशीचे लोक, तुम्ही पण त्यातले एक आहात का