मेष – वास्तुतून लाभ मिळेल
आपण जिथे राहतो त्या वास्तूचा आपल्या जीवनावर फार प्रभाव पडत असतो. विशेषत: जर ती वास्तू स्वत:ची असेल तर अधिक आनंद देत असते. आपल्या जीवनात येणारे सर्व आनंद, दु:खही ती वास्तूही अनुभवत असते. म्हणून वास्तूच्या बाबतीत नेहमी सजग राहावं. तिचं पावित्र्य, शांतता जपण्याचा प्रयत्न करावा. आज तुम्हाला तुमच्या वास्तूतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. तो लाभ कोणत्याही प्रकारचा असला तरी आनंद देणारा मात्र नक्कीच असेल. मात्र खर्चाकडे लक्ष ठेवावे लागेल. अवास्तव खर्च होण्याची शक्यता असल्याने गरज असेल तिथेच खर्च करण्यावर भर द्यावा. आज संततीला यश प्राप्त होईल. त्यामुळे आनंदी आनंद असेल. मात्र सासरच्या मंडळींशी वाद संभवू शकतो. म्हणून शांत राहणेच तुमच्या हिताचे राहिल.
कुंभ- वेळ चुकवू नका
जीवनात वेळेला खूप महत्त्व असते. योग्य वेळी योग्य गोष्ट केल्यास तिचा आनंद काही वेगळाच असतो. तसेच वेळ निघून गेल्यावर पश्चाताप करण्यापेक्षा वेळ पाळलेली कधीही चांगली. वेळ मग ती कुठलीही असो. अगदी मग ती आपल्या व्यायामाची वेळ असली तरी. आज शक्यतोवर व्यायामाची वेळ चुकवू नका. जोडीदारासोबतच आज प्रवासाचे योग आहेत. घरात आनंदी आनंद असेल. प्रवासातून संधीही प्राप्त होऊ शकते. आनंद द्विगुणित होईल. प्रियकरांसाठीही आजचा दिवस लाभदायक आहे. कारण प्रेयसीशी भेट होण्याचा योग आहे. थोडक्यात आज आज दिलेली वेळ पाळा त्यातून आनंद मिळेल.
मीन- प्रवास टाळलेलाच बरा
मन रमविण्यासाठी, नवीन गोष्टी मिळविण्यासाठी प्रवास आवश्यक असला तरी इच्छा नसतांना केलेला प्रवास कधी कधी त्रासदायक ठरु शकतो. आज तुमच्यासाठी प्रवासाचा योग आहे. मात्र त्यात नुकसान होण्याचेही संकेत आहेत. त्यामुळे शक्यतोवर आज प्रवास कसा टाळता येईल ते बघा म्हणजे नुकसानही होणार नाही. महत्त्वाचे म्हणजे आज कुणाच्या बाबतीत गैरसमज करवून घेऊ नका त्यात तुमचेच नुकसान होईल. वायफळ बोलण्यावर नियंत्रण ठेवा. जे काही बोलायचे आहे ते मुद्देसुद बोला. समोरची व्यक्ती काही ऐकण्याच्या मनस्थितीत नसेल. संततीला मात्र आज यश मिळू शकते. म्हणून त्या दृष्टीने प्रयत्न करायला हरकत नाही.
वृषभ- धैर्याने निर्णय घ्या
जीवनात कोणताही निर्णय घाईत घेऊ नये. विशेषत: निर्णय जर स्वत:च्या करियरबाबत किंवा कुटुंबाबाबत असले तर संयम व धैर्य ठेवूनट घ्यावा. मात्र कधी कधी भावनाविवश होऊन निर्णय घेतले जातात आणि मग नंतर पश्चाताप होतो. आपल्यासोबत आज असे होऊ नये म्हणून धैर्य राखणे गरजेचे आहे. आज तुम्ही कुटुंबातील समस्या, प्रश्नांवर निर्णय घेणार आहात. हा विचारपूर्वक घेणे तुमच्या हिताचे राहिल. कोणतीही व्यक्ती कुटुंबाच्या बाबतील भावनाप्रधान असतेच म्हणून सावध राहा आणि धैर्य दाखवा. तुमच्या निर्णयाचे स्वागत होईल. मित्र मंडळींकडून तुम्हाला आज आनंद प्राप्त होऊ शकतो. मात्र आनंदाच्या भरात उत्पन्न व खर्च यांचा समतोल बिघडता कामा नये. नवीन ओळखी होतील.
मिथुन- आज मुद्देसुदच बोला
आपल्याला कितीही ज्ञान, अनुभव असला तरी प्रत्येकजण प्रत्येकवेळी आपले बोलणे ऐकण्याच्या मनस्थितीत असेलच असे नाही. समोरची व्यक्ती आपली एक प्रवृत्ती घेऊन वागत असते. ती आपल्याला ओळखता यायला हवी. आज आपल्याकडे असलेले ज्ञान, अनुभव बाजूला ठेवून मुद्देसुद बोलणेच आपल्या हिताचे राहिल. सोबत आज कमालीची सहनशिलता आपण दाखवाल त्यामुळे हा उत्साहही टिकून राहिल. म्हणून जर एखादे महत्त्वपूर्ण काम अपूर्ण राहिले असेल तर या वाढलेल्या उत्साहाचा फायदा करुन घ्या. ते काम पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करीत राहा. तसे केल्यास आज तुम्ही कार्यात व्यस्त राहाल.
कर्क – घरात शांतता ठेवा
घरात शांतता असेल तर सुख समृद्धीही टिकून राहते. घरातील वादाचे परिणाम आपल्याला बाहेरही भोगावे लागतात. कारण अशा परिस्थितीत आत्मविश्वास कमी झालेला असतो. कामामध्ये लक्ष लागत नाही. त्यामुळे घरात कुठलाही वाद किंवा शितयुद्ध सुरु असेल तर आपण स्वत: माघार घ्यायला मागेपुढे पाहू नका. शक्यतोवर गरज असतानाच बोला जेणे करुन वाद वाढणार नाही. आज घरातमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी तुम्हाला शितयुद्धापासून दूर राहावे लागेल. भुतकाळ घडून गेलेल्या आनंददायी घटना आज पुन्हा आनंद देऊ शकतात. कुटुंबात निर्णय घेताना तो धैर्यानेच घ्या कारण तेच तुमच्यासाठी फायदाचे आहे. आज कुटुंबाला सांभाळा, बाकी सगळे आपोआप होईल.
सिंह- आज एखादं लहान नुकसान चालेल
मनुष्य कधी कधी खूप स्वार्थी होऊन जातो. जीवनात काही मिळविण्यासाठी आधी काहीतरी गमवावचं लागतं. आयुष्यात गुंतवणूकीला फार महत्त्व आहे आपण मात्र नेमकं हेच विसरतो आणि एखाद्या लहान फायद्यामध्ये अडकून मोठ्या फायद्याचं नुकसान करुन बसतो. आज तुमच्यासोबत हे होऊ शकतं. म्हणून भविष्यात मोठा फायदा देऊ शकेल असं एखादं लहान नुकसान आज होणार असेल तर ते होऊ द्या. त्याला भविष्य काळातली गुंतवणूक समजा. शक्यतोवर बाहेरील जंक फूड खाणे टाळा. त्यामुळे आरोग्याच्या समस्या उत्पन्न होऊ शकतात. स्त्री पक्षाकडून सहयोग मिळू शकतो. त्यामुळे आनंददायी वातावरण असेल. मात्र आज एखाद्याबद्दल गैरसमज होऊ शकतो.
कन्या- कौशल्याला वाव मिळेल
जीवनात अंगी कौशल्य असणे खूप गरजेचे आहे. आपल्या अंगी एखादी कला असेल तर तिच्याद्वारे आपला चरितार्थ चालतो किंवा छंद म्हणून कला जोपासत असाल तर मनाला अद्वितीय आनंद मिळत असतो. आपल्या कलेला लोकांनीही पसंत करावं, असं प्रत्येकाला वाटतं. कलाकाराने स्वयंप्रेरीत असायला हवं. मात्र आज लोकांकडून तुम्हाला प्रेरणा व शाबासकी मिळणार आहे. विशेषत: जे लेखक असतील त्यांना आज यश प्राप्त होणार आहे. सोबतच मित्रही आनंद देऊ शकतो. म्हणजे आज मित्रांसोबत एखाद्या गोष्टीचे नियोजन केले जाऊ शकते. जेष्ठ नागरीकांसाठी मात्र आजचा दिवस प्रकृतीची काळजी घेण्याचा आहे. आज किरकोळ ताप वगैरे येऊ शकतो. सरकारी कर्मचा-यांनी कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्यावा.
तुळ- आत्मिक समाधान मिळेल
प्रत्येकजण आपापल्या परीने परिश्रम करीत असतो. त्यातून फक्त पैसा मिळविणे हाच उद्देश नसतो तर आत्मिक समाधानही मिळणे गरजेचे असते. कामात समाधान नसेल तर आपले मन लागत नाही. अशा वेळी मग आत्मिक समाधान शोधण्यासाठी माणसे देवाच्या प्रार्थनेचा आधार घेतात. आज ईश्वराचा तुमच्यावर वरदहस्त असल्याची अनुभूती तुम्हाला मिळू शकते. आत्मिक समाधानही मिळेल. विशेषत: कलाकारांना आज यश प्राप्त होईल. त्यामुळे त्यांना आपल्या कलेवरील आणि ईश्वरावरील विश्वास अधिकच दृढ होईल. स्त्री पक्षाकडून सहयोग मिळण्याचे योग आहेत. त्यामुळे घरात आनंद असेल. विद्यार्थी आज अभ्यास टाळण्याचा प्रयत्न करतील. मौजमस्ती करण्यावर आज त्यांचा भर राहिल.
वृश्चिक – आज गैरसमज नकोच
कोणाविषयी एकदम समज किंवा गैरसमज करुन घेणे योग्य नाही. घाईघाईने झालेला समज किंवा गैरसमज एखादं नुकसान करू शकतो. एखाद्याविषयी गैरसमज झाल्याने आपण त्याच्यापासून सावध राहतो. जे एखादे छोटे नुकसान होणार असेल ते वाचविण्याचा प्रयत्न करतो. मात्र मुळात गैरसमज झालेला असल्याने आपल्याला तसे वाटत असते प्रत्यक्षात ती व्यक्ती तशी मुळीच नसते. छोट्या नुकसानावर लक्ष केंद्रित केल्याने भविष्यातील मोठ्या नफ्यापासून आपण वंचित राहतो. हे आज आपल्या सोबत घडू शकतं. म्हणून शक्यतोवर एखाद्याविषयी गैरसमज टाळा आणि सद्विवेकबुद्धीने निर्णय घ्या. हे करीत असतांना नफ्याकडेही लक्ष ठेवणे गरजेचे आहे. आज आरोग्याचीही काळजी घ्यावी लागेल.
धनु- आरोग्याकडे लक्ष द्या
शरीर व मन स्वस्थ तर कोणतंही काम अगदी मस्तच होतं. म्हणून शरीर व मन या दोघांच्या आरोग्याला आपण जपलं पाहिजे. छोट्यातला छोटा आजारही आपल्याला विचलित करुन जातो तसंच मनाचंही आहे. छोट्यातली छोटी गोष्ट आपल्याला दुखवून जाते. आज आपल्याला आरोग्याकडे लक्ष द्यावे लागणार आहे. आज वाहन शक्यतोवर सावकाश चालवा. कुठे तातडीने पोहचायचे असेल तर वेळेच्या थोडसं आधी निघा. तसेच आज खर्चाकडेही लक्ष द्यावे लागणार आहे. हातात घेतलेले कुठलेही काम अपूर्ण असेल तर ते आज पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहा. चिकाटी अजिबात सोडू नका. ते काम पूर्ण होण्याचे योग आहेत.
मकर- लाभदायक दिवस
लाभ हा अनेक प्रकारचा असतो फक्त संधी सारखा तो आपल्याला ओळखता आला पाहिजे. आज अशाच लाभाचा आपला दिवस आहे. विशेषत: मित्रांकडून आज आनंद प्राप्त होऊ शकतो. म्हणजे मित्रांसोबत आज कुठल्या तरी गोष्टीचे नियोजन केले जाऊ शकते. विद्यार्थीसुद्धा आज अभ्यासात लक्ष देतील. प्रेमनवीरांसाठीही आजचा दिवस लाभदायक आहे. कारण आज प्रेयसीशी भेट होण्याचा योग आहे. एकूणच आजचा दिवस लाभदायक आहे. फक्त अपचनाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे खानपानावर लक्ष देऊन आरोग्याची काळजी घ्यावी.