मेष – विद्यार्थ्यांनी अभ्यासात मन रमवावे
आज तुमची विनाकारण दगदग होऊ शकते. विद्यार्थांनी अभ्यासात लक्ष देण्याची गरज आहे. व्यवसायिकांनी व्यवहार करताना सावध रहा. विरोधक त्रास देऊ शकतात. आत्मविश्वास कमी होईल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यात रस वाढेल.
कुंभ – प्रॉपर्टी मिळण्याची शक्यता
आज तुम्हाला वारसाहक्काने एखादी प्रॉपर्टी मिळू शकते. व्यावसायिक योजना सफळ होण्याची शक्यता आहे. विरोधक त्रास देतील. रचनात्मक कार्यात वाढ होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी प्रमोशन मिळण्याचा योग आहे. रखडलेली कामे पूर्ण कराल.
मीन – एखाद्या खास व्यक्तीची भेट होईल
जो तुमच्यावर मनापासून प्रेम करतो त्याच्याशी तुमची भेट होणार आहे. नवीन ओळखी वाढतील. जोडीदारासोबत नाते दृढ होईल. विद्यार्थ्यांना यश मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. राजकारणात लाभ मिळण्याची शक्यता आहे.
वृषभ – मौल्यवान भेटवस्तू अथवा धनसंपत्तीचा योग
आईवडीलांकडून एखादी मौल्यवान वस्तू अथवा धनसंपत्ती मिळेल. कामात व्यस्त राहण्याची शक्यता आहे. व्यवसायात उत्कर्ष होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी सहकार्य मिळेल. विनाकारण खर्च करू नका. वाहन चालवताना सावध रहा. जोडीदारासह परदेशी जाण्याचा योग आहे.
मिथुन – दुर्लक्ष केल्यामुळे नुकसान होण्याची शक्यता
आज तुमच्या बेजबाबजारपणामुळे तुमचे नुकसान होऊ शकते. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांमुळे तणाव वाढेल. एखाद्या जवळच्या मित्रांची मदत मिळाल्यामुळे कामात सुधारणा होईल. एखाद्या ठिकाणी मनाविरूद्ध जावे लागेल. सामाजिक सन्मान वाढेल. राहणीमान सुधारेल. विरोधक त्रास देतील.
कर्क – डोळ्यांची अथवा डोकेदुखीची समस्या जाणवेल
आज तुम्हाला डोकेदुखी अथवा डोळ्यांचा त्रास जाणवेल. मन अशांत राहील. नोकरीत बदल होतील. भावंडाचे सहकार्य मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल. खर्चात कपात करण्यात यश मिळेल. जोडीदाराच्या भावनांचा मान राखा. देणी-घेणी करताना सावध रहा.
सिंह – विवाहाचा योग आहे
अविवाहितांसाठी आज विवाहयोग आहे. लग्न जुळू शकते. तुमच्या मनातील भावना लपवून ठेऊ नका. आज तुमची एखाद्या प्रभावशाली व्यक्तीशी भेट होऊ शकते. व्यवसायात विस्तार होण्याची शक्यता आहे. अचानक एखाद्या कार्यक्रमाला जाण्याचा योग घडेल. रखडलेली कामे पूर्ण होतील.
कन्या – शैक्षणिक क्षेत्रात विशेष यश मिळेल
आज तु्म्हाला शैक्षणिक क्षेत्रात विशेष यश मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे साधन वाढेल. व्यावसायिक योजना सफळ होतील. महत्त्वाची कामे आधी करा. प्रियजनांसोबत खेळीमेळीचे वातावरण राहील. रचनात्मक कार्यात यश मिळेल.
तूळ – पैसे अडकण्याची शक्यता आहे
आज पैशांचा व्यवहार करताना सावध रहा. पैसे अडकण्याची शक्यता आहे. कोर्ट-कचेरीची मदत घ्यावी लागेल. कामाच्या ठिकाणी ताण-तणाव वाढेल. वादविवाद करणे टाळा. मित्रांच्या मदतीने व्यवसायात यश मिळेल. रखडलेली एखादी योजना पूर्ण होण्याची शक्यता आहे.
वृश्चिक – आईच्या आरोग्यामध्ये सुधारणा होईल
आईच्या आरोग्यात सुधारणा होण्याची शक्यता आहे. घरात आनंदाचे वातावरण राहील. व्यवसायातील योजना पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात समस्या येतील. कायद्याच्या कात्रीतून मुक्तता मिळेल. मित्रांची मदत मिळू शकते.
धनु – प्रेम संबधामध्ये दूरावा येईल
प्रेमसंबध बिघडण्याची शक्यता आहे. मित्रांच्या मनमानी कारभारामुळे दुःखी व्हाल. एखाद्या व्यक्तीसाठी वैयक्तिक निर्णय बदलावा लागेल. मुलांच्या जबाबदाऱ्या पूर्ण कराल. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांमुळे तणाव वाढेल. प्रवास करणे टाळा.
मकर – मानसिक तणाव जाणवेल
आज तुम्हाला मानसिक ताणतणाव येणार आहे. ज्यामुळे चिडचिड होण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास कमी राहील. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. अध्यात्मिक रस वाढेल. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढण्याची शक्यता आहे. देणीघेणी करताना सावध रहा.