मेष – विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी येण्याची शक्यता
आज विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणींचा सामना करावा लागेल. कामाच्या ठिकाणी समस्या येण्याची शक्यता आहे. विरोधकांपासून सावध राहा. विवाहात अडचणी येऊ शकतात. नवीन मित्रांची भेट फायदेशीर ठरेल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.
कुंभ – व्यवसायात लाभाची संधी मिळेल
आज व्यवसायातून लाभ होण्याची शक्यता आहे. सासरच्या लोकांकडून धन अथवा मौल्यवान भेटवस्तू मिळेल. विद्यार्थ्यांना परिक्षेत यश मिळू शकते. कौटुंबिक मंगल कार्याची योजना आखाल. जोडीदाराशी नाते मजबूत होण्याची शक्यता आहे.
मीन – जुन्या ओळखींचा फायदा होईल
आज तुम्हाला जुन्या ओळखींमधून फायदा मिळण्याची शक्यता आहे. भावनेच्या आहारी घेतलेले निर्णय बदलावे लागतील. जवळच्या नातेसंबंधांमध्ये संयम ठेवा. संकट टळण्याची शक्यता आहे. बचत करण्यावर लक्ष ठेवा. व्यवसायात चढ-उतार येण्याची शक्यता आहे.
वृषभ – नवीन संपत्ती खरेदी कराल
आज तुम्ही चल अथवा अचल संपत्ती खरेदी करण्याचा विचार कराल. परदेशी जाण्याची इच्छा पूर्ण होईल. कामाच्या ठिकाणी उच्च अधिकारी मदत करतील. आरोग्याची काळजी घ्या. आज तुम्हाला आनंदवार्ता मिळेल.
मिथुन – अपेक्षेपेक्षा विपरित परिणाम मिळेल
आज विद्यार्थ्यांना अपेक्षित परिणाम मिळणार नाही. कामाच्या ठिकाणी दुर्लक्षपणा केल्यामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवा. विनाकारण खर्च करू नका. विरोधकांचा त्रास कमी होईल.
कर्क – ताण तणाव कमी होईल
आज कौटुंबिक समस्यांंमुळे तणाव वाढणार आहे. रचनात्मक कार्यातील लोकांना लाभ मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. सामाजिक समारंभात सहभागी होण्याची संधी मिळेल.
सिंह – व्यायसायिक भागिदाराशी भेट होईल
आज व्यावसायिक भागिदाराशी तुमची भेट होणार आहे. मित्रांचे सहकार्य मिळणार आहे. कौटुंबिक वातावरण आनंदाचे असेल. जोडीदाराशी नाते मजबूत होण्याची शक्यता आहे. सामाजिक मानसन्मान आणि धनसंपत्तीत वाढ होईल.
कन्या – नवीन व्यवसायातील अडथळे दूर होतील
आज तुमच्या व्यवसायात येणारे अडथळे दूर होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन रमेल. आर्थिक बाजू मजबूत होण्याची शक्यता आहे. घरातील वृद्ध व्यक्तींची काळजी घ्या. रचनात्मक कार्यात प्रगती होण्याची शक्यता आहे. रखडलेली कामे पूर्ण होतील.
तूळ – मौल्यवान वस्तू तुटण्याची शक्यता आहे
आज प्रॉपर्टीबाबत कोणतेही काम करू नका. मौल्यवान वस्तू तुटण्याची शक्यता आहे. एखाद्या अनोळखी व्यक्तीसोबत प्रेमाची भावना दाटून येईल. जोडीदारासोबत सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल.
वृश्चिक – आरोग्याची काळजी घ्या
आरोग्याची काळजी घ्या. व्यावसायिक योजना सफळ होतील, पदोन्नतीची शक्यता आहे. महत्त्वाची कामे पूर्ण होतील. प्रेमसंबंध रोमॅंटिक होतील. कौटुंबिक खर्च वाढण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यात सहभागी होण्याचा योग आहे.
धनु – कौटुंबिक नात्यात फूट पडेल
आज एखाद्या अफवेमुळे तुमच्या कौटुंबिक नात्यात फूट पडण्याची शक्यता आहे. सामाजिक स्तरावर समस्यांचा सामना करावा लागेल. धनलाभाचा योग आहे. रखडलेली कामे पूर्ण कराल. वाहन चालवताना सावध राहा.
मकर – जोडीदाराची तब्येत बिघडण्याची शक्यता
आज तुमच्या जोडीदाराची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. डोकेदुखी अथवा डोळ्यांच्या समस्या जाणवणार आहेत. खर्च वाढू शकतो. आज दिवसभर कामात व्यस्त राहण्याची शक्यता आहे. आईवडीलांचे सहकार्य मिळेल. विनाकारण दिखावा करण्याचा प्रयत्न करू नका. एखादी आनंदवार्ता मिळू शकते.
अधिक वाचा –
जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’
या राशींचे जोडीदार असतात जास्तच केअरिंग, प्रत्येक लहानसहान गोष्टींची घेतात काळजी