मेष : वास्तूवर खर्च
आज तुम्ही आनंदाचे वास्तूवर खर्च करणार आहात. त्यामुळे घरात आनंदी आनंदाचे वातावरण राहील. लहान फायदा करुन घेण्याच्या नादात आज मोठ नुकसान होणार नाही, याकडे लक्ष ठेवा. आज तुम्हाला सल्लेही खूप मिळतील. मात्र ऐकावे जनाचे करावे मनाचे असे धोरण तुम्हाला ठेवावे लागणार आहे. थोडा तणाव जाणवू शकतो. तो घालवण्यासाठी गाणं ऐका.
कुंभ : जोडीदाराचा प्रभाव
आज तुम्ही पूर्णपणे जोडीदाराच्या प्रभावात राहणार आहात. आज तुम्हाला जोडीदराकडून सहकार्य मिळू शकते. तसेच खर्चही वाढ शकतो. जो तुम्ही आनंदाने करणार आहात. एखाद्या अपूर्ण असलेल्या महत्त्वपूर्ण कार्यासाठी प्रयत्न वाढवा. यश नक्की मिळेल. फुकटच्या गप्पा-टप्पा आज नकोच. बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी अशी स्वत:ची अवस्था होण्यापासून वाचवा.
मीन : प्रवासाचा आनंद
आज तुमचे प्रवासाचे योग असून जोडीदारासोबत तुम्ही आज प्रवास करणार आहात. त्यामुळे आनंददायी वातावणर असेल. भविष्यात एखादा मोठा फायदा होणार असेल तर आज लहान नुकसान झालेले चालेल. त्याला गुंतवणूक समजा. चार दिवस सासूचे व चार दिवस सुनेचे असतात, ही बाब लक्षात घेऊन आपलेच म्हणणे रेटू नका. अचुक संवाद साधा.
वृषभ : जोडीदाराचा प्रभाव
आज तुमच्यावर पूर्णपणे जोडीदाराचा प्रभाव राहिल. त्यांच्या मर्जीप्रमाणे आज तुम्ही वागणार आहात. त्याचा योग्य लाभ घेतल्यास घरात आनंददायी वातावरण राहू शकतं. एखाद्या कामात आज अनंत अडचणी येऊ शकतात. त्यामुळे आत्मविश्वास कमी होणार नाही याची काळजी घ्या. प्रयत्न सोडू नका. जीवनात झटपट काहीच मिळत नाही ही सत्यता लक्षात घेऊन झटपट पैशांच्या मागे लागू नका.
मिथुन : प्रेमात यश
आज प्रेमवीरांसाठी आनंदाचा दिवस असून प्रेयसीशी संपर्क होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज प्रेम प्रकारणात यश मिळू शकतं. आयुष्याबद्दल विचार करण्यासाठी तुम्हाला आज एकांताची आवश्यकता भासेल. त्यामुळे एकांतात जाऊन चिंतन करण्यावर भर द्या. त्यातून नवीन मार्ग तुम्हाला मिळतील. सुयोग्य कर्मचा-यांना बढती मिळण्याचे योग आहे. त्यामुळे त्या दृष्टीने प्रयत्न करायला हवेत.
कर्क : गैरसमज होतील
चुकीचा समज हा गैरसमजाला जन्म देतो. आज तुमचा जोडीदाराबद्दल गैरसमज होऊ शकतो. म्हणून कोणतेही मत किंवा समज बनविण्याआधी फार विचार करा. सरळ निर्णय घेऊ नका. घरोघरी मातीच्याच चुली असतात, ही सत्यता लक्षात घ्या. ही काळजी घेतल्यास आज वैवाहिक आयुष्य अधिक सुरेख होण्यास मदत मिळू शकते.
सिंह : नफ्याकडे लक्ष ठेवा
विशेषत: व्यावसायिकांनी आज नफ्याकडे लक्ष ठेवावे. आपला फायदा कशात आहे, हे ओळखता यायला हवे. आज थोडी आत्मवि·ाासात कमी राहिल. म्हणून आज कोणताच महत्त्वपूर्ण घेऊ नका. जो प्रशंसा करु शकत नाही त्याला टिका करण्याचा अधिकार नाही. अशी तुमची अवस्था असेल किमान आज तरी दुस-यांवर टिका टिप्पणी नको. उचलली जीभ लावली टाळ्याला असे करु नका.
कन्या : खर्च वाढेल
आज तुमचा खर्च वाढणार आहे. त्यामुळे उत्पन्न व खर्च यांचा ताळमेळ तुम्हाला आज बसवावा लागणार आहे. अनावश्यक खर्चाला कात्री लावावी लागेल. अंथरुन पाहून पाय पसरावे, ही बाब लक्षात घ्या. तुमचा आत्मवि·ाास बघुन आज अनोळखी लोकांचा विरोध होऊ शकतो. म्हणून सावध राहा. इच्छित कार्य उशिरा होईल. म्हणून विचलित होऊ नका.
तुळ : व्यवसायात गोंधळ
आज व्यवसायात गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सावध राहून फायदा नाही झाला तरी चालेल मात्र नुकसान होणार नाही, याची काळजी घ्या. अमर्याद सहनशिलता व उत्साह या दोन्ही गोष्टींनी आज तुम्ही परिपूर्ण राहणार आहात. त्यामुळे आजच्या दिवसाचा योग्य सदुपयोग करुन घ्या. जीवनात धोका न पत्करणे हाच सर्वात मोठा धोका असतो, ही बाब लक्षात घ्या.
वृश्चिक : खर्च वाढेल
आज तुमच्यासाठी खर्चीक दिवस आहे. ज्याला तुम्ही टाळू शकत नाहीत. म्हणून उत्पन्न व खर्च यांच्यात नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. अनावश्यक खर्चाला कात्री लावून जे आवश्यक आहे, त्यावरच खर्च करा. आज तुम्ही कार्यात व्यस्त राहणार आहात. आरोग्य थोडे नरम -गरम राहिल. म्हणून स्वत:ची काळजी घ्या.
धनु : व्यवसायात लाभ
आज व्यापार, व्यवसायात सुखद व लाभाचा दिवस असून त्याचा सदुपयोग करण्यावर भर द्या. अधिकारी वर्गाच्या हातात एखादे महत्त्वपूर्ण काम अडलेले असेल तर ते आज पूर्ण होऊ शकते. म्हणून त्या दृष्टीने प्रयत्न वाढवायला हवेत. नाही तर हत्ती निघुन गेला आणि शेपूट राहिले अशी तुमची अवस्था होऊ शकते. मार्ग सापडत नसेल सरळ चालायला सुरुवात करा. भाग्य आपोआप तुमच्या मागे येईल. प्रयत्नांनीच परमे·ाराची प्राप्ती होते हे लक्षात घ्या.
मकर : जोडीदाराशी वाद
छोट्याशा कारणावरुन जोडीदाराशी आज वाद होऊ मनमुटाव होऊ शकतो. घरोघरी मातीच्या चुली असतात, ही बाब लक्षात घेऊन वाद न वाढवता मिटविण्यावर भर द्या. थोडा कमीपणा घ्यावा लागला तरी हरकत नाही. आज एखाद्या गोष्टीवर विनाकारण संताप होईल. म्हणून शक्य तितके शांत राहण्याचा प्रयत्न करा. संध्याकाळपर्यंत एखादा अविस्मरणीय क्षण प्राप्त होण्याचा शक्यता आहे.
फेब्रुवारी महिन्यात जन्म होणारे लोक नक्की कसे असतात, जाणून घ्या
लेखिकेचा संपर्क करा : श्री ज्योतिष संशोधन केंद