मेष – एखादी मौल्यवान वस्तू चोरी होण्याची शक्यता
आज तुमची एखादी महागडी वस्तू चोरी होऊ शकते. कामानिमित्त दगदग होईल. सोपे वाटणारे काम करणे कठीण जाईल. व्यवसायात भागिदारीमुळे नुकसान होऊ शकते. मित्रांची मदत मिळेल.
कुंभ – कठीण काळात कुटुंंबाची साथ मिळेल
आज तुम्हाला व्यवसायातील आव्हान पूर्ण करण्यासाठी तुमच्या भावंडांची साथ मिळेल. कठीण प्रसंगी कुटुंब जवळ असेल. मित्रांच्या मदतीने उत्पन्न वाढेल. प्रेमीयुगूलांना यश मिळेल. रचनात्मक कार्यामुळे लोकप्रियता मिळेल. वाहन चालवताना सावध रहा.
मीन – वाहन विक्रीच्या व्यवसायात यश
आज तुम्हाला वाहन विक्रिच्या व्यवसायात यश मिळेल. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या सुटतील. युवांना नोकरीच्या संधी मिळतील. व्यवसायानिमित्त परदेशी जाण्याचा योग आहे. जोडीदारासोबत नाते मजबूत होईल.
वृषभ – दिवसभर आनंदी वाटेल
आज तुमच्या राशीत भाग्योदयाचा योग आहे. दिवसभर फ्रेश आणि आनंदी वाटेल. उत्साह वाढेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या आवडीचे काम मिळेल. विरोधकांना मात द्याल. जोडीदारासोबत प्रवासाला जाल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन रमेल.
मिथुन – मुलांच्या गैरव्यवहारामुळे मन निराश होईल
आज तुमच्या मुलांच्या वागण्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. जोडीदाराचा विश्वास जिंकण्याची गरज आहे. तणाव वाढू शकतो. भावनेच्या आहारी गेल्याने घेतलेले निर्णय बदलावे लागतील. रागावर नियंत्रण ठेवा. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळेल. वाहन चालवताना सावध रहा.
कर्क – जोडीदाराला त्वचेच्या समस्या होऊ शकतात
आज तुमच्या जोडीदाराला त्वचेच्या समस्येचा त्रास जाणवेल. कामाच्या ठिकाणी होणारा त्रास कमी होऊ शकतो. व्यवसायात नवीन कामे मिळतील. कौटुंबिक वाद दूर होतील. रागावर नियंत्रण ठेवा. एखाद्या सामाजिक संस्थेद्वारा सन्मानित व्हाल.
सिंह – अचानक धनलाभ होईल
आज तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. चल अथवा अचल संपत्ती खरेदी करण्याचा विचार कराल. मित्रांशी भेट झाल्याने आनंदी व्हाल. विद्यार्थ्यांना शिक्षणाची चांगली संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या अधिकारात वाढ होण्याची शक्यता आहे.
कन्या – नवीन ओळखींमुळे भाग्योदय होईल
वैवाहिक चर्चा सफळ होऊ शकते. नवीन ओळखींमुळे भाग्योदय होऊ शकतो. मित्रांच्या मदतीने व्यवसायात वाढ होऊ शकते. आर्थिक स्थिती सुधारेल. इतरांची मदत करण्याची संधी मिळेल. घरातील वातावरण आनंदाचे असेल.
तूळ – कामाच्या ठिकाणी तणाव वाढेल
विद्यार्थ्यांना शिक्षणात अडचणी येतील. विनाकारण वेळ वाया जाईल. व्यवसायात चढ-उतार येऊ शकतात. कामात उशीर झाल्याने कार्यालयात तणाव वाढेल. बोलताना सावध रहा. खोटं बोलून काम काढून घेण्याची सवय सोडा.
वृश्चिक – कौटुंबिक संपत्ती मिळण्याची शक्यता
आज तुम्हा आईकडून वारसाहक्क मिळण्याची शक्यता आहे. नवीन वाहन खरेदी कराल. व्यवसायात प्रगती होईल. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी निर्णय तुमच्या बाजून राहील. देणी-घेणी करताना सावध रहा.
धनु – विद्यार्थ्यांचे मन भरकटू शकते
आज तुमचे अभ्यासात मन रमणार नाही. नकारात्मक विचारांचा प्रभाव पडू शकतो. व्यवसायात समस्या येतील. कामाच्या ठिकाणी अधिकारी नाराज होतील. पदोन्नती रखडण्याची शक्यता आहे. जोडीदाराचे सहकार्य मिळेल.
मकर- गुडघेदुखी अथवा पायाला दुखापत होऊ शकते
आज तुम्हाला पायाचे दुखणे होण्याची शक्यता आहे. चालताना सावध रहा. सामाजिक अथवा धार्मिक कार्यात मन रमवा. उत्पन्न आणि खर्चात समतोल राखा. मुलांकडून आनंदवार्ता मिळेल. विद्यार्थ्यांना वरिष्ठांकडून योग्य मार्गदर्शन मिळेल.
अधिक वाचा
जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’
राशीनुसार जाणून घ्या तुमच्या जोडीदाराचा स्वभाव
या राशीच्या व्यक्ती असतात Romanceसाठी नेहमीच तयार
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम