मेष : यश मिळेल
व्यपारी व व्यावसायिकांनी आज आनंदाचा दिवस असून त्यांना यश मिळवून देणारा आहे. एखादे काम पूर्ण होत नसेल तर समजून घ्या की भाग्य तुमची परिक्षा घेतंय. म्हणून चिकाटीने प्रयत्न सुरुच ठेवा. हातात घेतलेले काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. सासरच्या मंडळींशी वाद होण्याचे योग आहेत. म्हणून गुडघ्याला बाशिंग न बांधता शांत राहण्याचा प्रयत्न करा.
कुंभ : विचारपूर्वक निर्णय घ्या
आज कोणताही निर्णय घेतांना तो विचारपूर्वकच घ्या. घाई करुन घेतलेल्या निर्णयातून नुकसान होण्याचा धोका आहे. संधीवाताचा त्रास असलेल्यांशी आज आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यायची आहे. त्रास वाढण्याची शक्यता आहे. ओळखीच्या व्यक्तींबरोबर सामंजस्य वाढविण्याची संधी आज तुम्हाला उपलब्ध होणार आहे.
मीन : खर्चावर नियंत्रण
उत्पन्न व खर्च यांच्या नियंत्रण ठेवणे कधीही गरजेचे असते. वाढत्या किंवा अवास्तव होत असलेल्या खर्चामुळे आपले आर्थिक नियोजन कोलमडू शकतं. आरोग्य चांगले राहिल. दिवसभर तुम्ही ताजेतवाणे राहणार आहात. सासुरवाडीकडून लाभ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये आनंदाचे वातावरण राहिल.
वृषभ : व्यवसायात गोंधळ
व्यावसायिकांसाठी आजचा दिवस गोंधळाचा ठरु शकतो. म्हणून त्यांनी आज विशेष काळजी घेऊन व्यवसायात लक्ष दिले पाहिजे. गुरुंचे आशीर्वाद मिळविण्यासाठी प्रयत्न करा. त्याची तुम्हाला खूप गरज आहे. नवीन दिशा शोधण्याचा प्रयत्न करा. कुटुंबवत्सल लोकांना आज अर्थलाभ होण्याची शक्यता आहे.
मिथुन : खर्चावर लक्ष ठेवा
उत्पन्नापेक्षा खर्च जास्त झाला, की आर्थिक नियोजन डळमळीत होत असतं. म्हणून आपल्या वाढत्या खर्चावर तुम्हाला बारकाईने लक्ष ठेवावे लागणार आहे. थोडक्यात अंथरुन पाहुनच पाय पसरायला हवेत. गुरु किंवा जेष्ठांचे आशीर्वाद, मार्गदर्शन मिळविण्यासाठी प्रयत्न करा. आज अनोळखी लोकांच्या विचाराधाचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो.
कर्क : स्वार्थी बना
जीवनात कधी कधी स्वार्थी बनायला पाहिजे. व्यावसायिकांनी तर बनायलाच हवं. आज आपल्या नफ्याकडे लक्ष ठेवा. मिळणा-या संधीचा लाभ घ्या. सोबतच तुम्हाला आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे. वेळोवेळी व्यायाम करण्याची सवय लावून घ्या. प्रेमवीरांसाठी आज आनंदाचा दिवस असून प्रेयसीशी आज संपर्क होऊ शकतो.
सिंह : प्रॉपर्टीतून लाभ
आज तुम्हाला प्रॉपर्टीतून लाभ मिळण्याची संभावना आहे. त्यामुळे तुम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करायला हवेत. आरोग्याच्या दृष्टीकोनातून वेळोवेळी व्यायाम करण्याची सवय लावून घ्या. तनासह मनही सुदृढ राखण्यासाठी प्रयत्न करा. मित्रांकडून आज तुम्हाला आनंद प्राप्त होणार आहे. त्यांच्यासोबत एखाद्या गोष्टीचे नियोजन आज तुम्ही करणार आहात.
कन्या : कागदपत्रे सांभाळा
आपली महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित व जागेवर आहेत की नाही याची खात्री करुन घ्या. त्यांना सांभाळून ठेवा. अपचनाचा त्रास होण्याची शक्यता आहे. म्हणून आपल्या आहारावर नियंत्रण ठेवून पथ्यांचे पालन करा. प्रेमवीरांसाठी आनंदी बातमी म्हणजे आज त्याचां प्रेयसीशी संपर्क होऊ शकतो.
तूळ : जोड व्यवसायाचा विचार
प्रगतीसाठी आज तुम्ही जोड व्यवसायाचा विचार करणार आहात. त्यामुळे काळजीपूर्वक विचार करुन निर्णय घ्या. हातचे सोडून पळत्याच्या मागे लागू नका. रक्तदाबाचा त्रास असलेल्यांनी आज आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यायची आहे. भाग्य परिक्षा घेत असल्यामुळे यश मिळविण्यासाठी तुम्हाला अगोदर परिश्रम घ्यावेच लागतील.
वृश्चिक : व्यवसायात यश
व्यवसायात आज तुम्हाला घवघवीत असं यश मिळू शकतं. ज्याची तुम्ही कल्पना किंवा अपेक्षाही केलेली नसेल असं यश प्राप्त करण्याचा आजचा तुमचा दिवस आहे. त्याचा फायदा करुन घ्या. जंक फूड आरोग्यासाठी घातकच. आज तर तुम्ही त्यांच्यापासून लांबच राहायला हवे. मानसिक सुखशांतीच्या वातावरणाचा तुम्ही आज अनुभव करणार आहात.
धनु : काम पूर्ण होईल
एखादे काम अपूर्ण असेल किंवा अधिकारी वर्गाच्या हातात एखादे महत्त्वपूर्ण काम अडकून पडलेले असेल तर आज प्रयत्न वाढवायला हरकत नाही. कारण आज ते पूर्ण होऊ शकतं. संधीवाताचा त्रास असलेल्यांशी आज आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यायची आहे. त्रास वाढण्याची शक्यता आहे. वैवाहिक आयुष्यातील विविध रंग आज तुम्हाला अनुभवायला मिळणार आहेत.
मकर : गोंधळ उडेल
आजचा दिवस तुमच्यासाठी गोंधळाचा ठरणार आहे. विशेषत: सरकारी कर्मचा-यांचा आज गोंधळ उडणार आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेतांना काळजीपूर्वक घेणे फायद्याचे राहिल. अन्नबाधेचा त्रास होऊ शकतो. म्हणून आहारावर नियंत्रण ठेवून पथ्य पाळण्याचा प्रयत्न करा. आज तुमच्या नवीन ओळखी होणार आहेत.
लेखिकेचा संपर्क करा : श्री ज्योतिष संशोधन केंद्र