मेष – अधिकारी कामांवर संतुष्ट राहतील
सकारात्मक विचारामुळे विद्यार्थी वर्गाला यश मिळेल.आपल्यातील विशेष गुण शोधण्याचा प्रयत्न करा. व्यवसायात प्रगती होईल. नोकरीत वरीष्ठ अधिकारी तुमच्या कामांवर संतुष्ट असतील. कामासंदर्भात प्रवास होण्याची शक्यता आहे. कोर्ट कचेरीसंदर्भात दिलासा मिळेल. आरोग्य चांगले राहील.
कुंभ – ज्येष्ठांच्या आरोग्यामुळे वातावरण चिंताजनक राहील
घरातील ज्येष्ठांच्या आरोग्यामुळे चिंताजनक वातावरण राहील. अनावश्यक वादात फसण्याची शक्यता आहे. तुमच्या सहकार्याच्या विचित्र वागण्याचा तुम्हाला त्रास होईल. पण थोडे धीराने काम करा. दिवसाअखेर काही खर्च होण्याची शक्यता आहे. पार्टनरचे सहकार्य लाभेल. बाहेर जाण्याचा काही विचार करत असाल तर ती टाळल्यास उत्तम
मीन – नात्यात मधुरता वाढेल
भाग्यात चांगल्या गोष्टी येणार आहेत. नात्यात झालेले गैरसमज दूर होतील आणि नात्यात मधुरता वाढेल. टीकांपासून वाचा. तुम्ही कोणाला दुखवाल असे काही बोलू नका. जीभेवर साखर ठेवा.व्यवसायासाठी केलेली एखादी टूर सफल राहील. धार्मिक कामांची आवड वाढेल.
वृषभ – कोणाकडूनही कर्ज घेऊ नका
आजच्या दिवसात कोणाकडूनही कर्ज घेऊ नका.कामाच्या ठिकाणी नवी आव्हाने येऊ शकतात.अडकलेली कामे पूर्ण होतील. धार्मिक कार्यात खर्च होण्याची शक्यता अधिक आहे. आरोग्याच्या कुरबुरींमुळे त्रास होईल.शिक्षणासंदर्भात असलेल्या अडचणी दूर होतील. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या
मिथुन – अनोळखी लोकांवर विश्वास ठेवू नका
जुन्या आजारापासून सुटका मिळेल. पण म्हणून आरोग्याकडे दुर्लक्ष करुन नका.ठरवलेली कामे पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी अडचणी येण्याची शक्यता आहे. अनोळखी लोकांवर विश्वास ठेवू नका. उत्पादन आणि खर्च यावर नियंत्रण ठेवा.
कर्क – आरोग्याची काळजी घ्या
धावपळीमुळे कुटुंबातील वातावरणात तणाव राहील.विरोधकांमुळे कामात अडचणी येण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. धार्मिक कार्यात आवड वाढेल. अडकलेली कामे मित्रांच्या मदतीमुळे पूर्ण होतील. नोकरदार महिलांना धनप्राप्ती होण्याची शक्यता आहे.
सिंह – नवीन काम सुरु करु नका
प्रॉपर्टी संदर्भातील खटल्यांचा निकाल लागेल. आर्थिक बाजू मजबूत राहील.आनंदात, सुखात वाढ होईल. विरोधकांपासून सावधान. व्यवसायात यश मिळेल. नवीन काम सुरु करण्याचा प्रयत्न करुन नका.कौटुंबिक मित्रांसोबत एखादा प्रवास संभवतो.
कन्या- आईच्या आजारपणामुळे त्रस्त राहाल
आईच्या आजारपणामुळे तुम्ही त्रस्त राहाल. तुम्ही निराश आणि असंतुष्ट असल्यासारखे तुम्हाला वाटेल. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. खर्च वाढण्याची शक्यता आहे. संततीकडून काहीतरी खुशखबर मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात वृद्धि होण्याची शक्यता आहे. महत्वाची कामे पूर्ण करण्याचा योग्य काळ आहे.
तूळ-नव्या प्रेमाची सुरुवात होऊ शकते
तुमच्या आयुष्यात नव्या प्रेमाची सुरुवात होऊ शकते. विवाहोच्छुकांची योग्य जोडीदारासोबत भेट होण्याची शक्यता आहे. तुमच्या आयुष्यातील आदर्शवत व्यक्तिसोबत तुम्ही तुमच्या गोष्टी शेअर करु शकता. संततीकडून आनंदवार्ता मिळेल त्यामुळे तुमच्यातील विश्वास वाढेल. धार्मिक कार्यात रुचि वाढेल.
वृश्चिक -आत्मविश्वास कमी होईल
आवडता एखाद जॉब मिळवण्यासाठी तुमची धडपड होईल. कामाच्या ठिकाणी जबाबदारी सांभाळताना अडचणी येऊ शकतात. व्यवसायात चढ- उतार राहील. आत्मविश्वास कमी होण्याची शक्यता आहे.आरोग्याची काळजी घ्या. जोडीदाराचे सहकार्य राहील.धार्मिक कामांमध्ये मन रमेल.
धनु -उत्पन्नात वाढ होईल
नोकरदार वर्गाच्या उत्पन्नात वाढ होईल. व्यवसाय वाढवण्याचे आणि त्यातून लाभ मिळण्याच्या अनेक संधी मिळतील. वाहन खरेदी करण्याचा विचार कराल.जोडीदाराची काळजी घ्या.नात्यातील गोडवा वाढेल.आरोग्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करु नका.विद्यार्थीवर्गाला अधिक मेहनत करण्याची गरज आहे.
मकर – अधिकारी नाराज होण्याची शक्यता
तुमच्या कामाच्या पद्धतींमुळे तुमचे अधिकारी तुमच्यावर नाराज होण्याची शक्यता आहे. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. नव्या जबाबदाऱ्या आल्यामुळे तुम्ही व्यग्र राहाल. व्यवसाय मंदा चालल्यामुळे थोडा तणाव वाढेल. अडकलेली कामे पूर्ण होतील. सन्मान मिळेल. पद आणि प्रतिष्ठा वाढेल.घरात मंगलकार्याची योजना होईल.
हेही वाचा
धनु राशीसाठी कसे असणार २०१९ वर्ष,वाचा
१२ राशींमध्ये कोणत्या राशी आहेत बलशाली
तूळ राशीसाठी कसे असणार २०१९ हे वर्ष, वाचा वार्षिक राशी भविष्य