मेष – कौटुंबिक संपत्ती मिळण्याची शक्यता
आज तुम्हाला कौटुंबिक संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील वातावरण आनंदाचे असेल. सामाजिक समारंभात मित्र आणि नातेवाईकांची भेट होईल. कोर्टकचेरीतून सुटका मिळेल.
कुंभ – पूर्वीच्या प्रियकराशी भेट होईल
आज तुमची अचानक तुमच्या पूर्वीच्या प्रियकराशी भेट होईल. भावंडांच्या मदतीने व्यवसायात वाढ होईल. घरातील वातावरण आनंदाचे असेल. सामाजिक प्रतिष्ठा आणि धनसंपत्तीत वाढ होईल. आरोग्याची काळजी घ्या.
मीन- नवीन कामात मन रमणार नाही
आज तुम्हाला मनाप्रमाणे नोकरीसाठी दगदग करावी लागेल. मात्र नवीन कामात मन रमणार नाही. जोखिमेची कामे करण्यापासून दूर राहा. जोडीदाराशी नाते मजबूत राहील. मित्रांच्या सहकार्याने बिघडलेली कामे पूर्ण होतील.
वृषभ – कामाच्या ठिकाणी ताणतणाव वाढेल
आज तुमच्या कामाच्या ठिकाणी ताणतणाव वाढणार आहे. व्यवसायात चढ उतार येण्याची शक्यता आहे. आईवडीलांकडून भावनिक आणि आर्थिक साथ मिळेल. वाहन चालवताना सावध राहा. व्यवहार करताना सावध राहा.
मिथुन – मानसिक तणाव जाणवेल
आज व्यवसायातील मंद गतीमुळे मानसिक तणाव वाढेल. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढणार आहेत. धनसंपत्तीबाबत चांगली बातमी मिळेल. धार्मिक गोष्टीतील रस वाढणार आहे.
कर्क – कौटुंबिक साथ मिळेल
आज तुम्हाला तुमच्या आवडत्या व्यक्तीला भेटता येणार आहे. संकट काळात तुमचे कुटुंब तुमच्यासोबत असेल. आरोग्य चांगले असेल. कोर्टकचेरीबाबत सावध राहा. आर्थिक स्थिती मजबूत असेल.
सिंह – नवीन काम मिळणार आहे
आज तुम्हाला मनासारखी नोकरी मिळणार आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेत यश मिळेल. कौटुंबिक संतुलन राखा. रखडलेली कामे पूर्ण होतील. प्रवासाला जाण्याचा योग आहे.
कन्या – मौल्यवान वस्तू तुटण्याची शक्यता
एखादी मौल्यवान वस्तू खराब होण्याची अथवा तुटण्याची शक्यता आहे. प्रॉपर्टीबाबत समस्या लवकर सुटतील. वाहन चालवताना सावध राहा. वादविवाद करणे टाळा. आर्थिक स्थिती चांगली असेल.
तूळ – आरोग्याच्या समस्या दूर होतील
आज तुमच्या आरोग्याबाबत असेलेल्या समस्या संपणार आहेत. एखाद्या खास व्यक्तीची भेट होईल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. मुलांकडून खुशखबरी मिळेल. रचनात्मक कार्यातील रस वाढणार आहे.
वृश्चिक – तणाव वाढणार आहे
आज तुमच्या कौटुंबिक समस्या वाढणार आहेत. तणाव वाढण्याची शक्यता आहे. कार्य कुशलतेने पदोन्नती मिळवण्याचा प्रयत्न कराल. नवीन वाहन खरेदीची योजना आखाल. धार्मिक कार्यात रस वाढणार आहे.
धनु – उत्पन्नाचे स्त्रोत वाढणार आहेत
आज तुमचे भाग्य तुमच्यासोबत आहे. अतिरिक्त उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. जुनी रखडलेली कामे पूर्ण होतील. रचनात्मक कार्यात प्रगती होणार आहे. एखादी कौटुंबिक खुशखबर मिळेल.
मकर – अपुरी झोप मिळण्याची शक्यता आहे
आज तुमची झोप पूर्ण न झाल्यामुळे तुम्हाला त्रास जाणवेल. आहाराबाबत सावध राहा. रखडलेली कामे पूर्ण होतील. जोडीदाराची चांगली साथ मिळेल. आर्थिक बाजू मजबूत असेल. देणी घेणी सांभाळून करा.