मेष – विवाहासंबंधीच्या समस्या होतील दूर
आज तुम्हाला मुलांच्याबाबतीतला मोठा निर्णय घ्यावा लागेल. विवाहासंबंधीच्या सर्व अडचणी दूर होतील. तुमच्या पार्टनरसोबत एखाद्या सामाजिक कार्यक्रमाला हजेरी लावण्याची संधी मिळेल. जुन्या मित्रांची भेट होईल. व्यावसायिक प्रकरणात यश मिळेल. वाहन चालवताना काळजी घ्या.
कुंभ – व्यवसायात नुकसानीची शक्यता
आज काम करताना सावधानता बाळगा. व्यवसायात नुकसान उचलावं लागू शकतं. पैशांच्या देवाण-घेवाण आणि गुंतवणूकीच्याबाबतीत सतर्क राहा. विरोधक तुमच्या पद आणि प्रतिष्ठेला ठेच पोचवू शकतात. पण असं असलं तरी कुटुंबासोबत चांगला वेळ व्यतीत कराल. शांत राहून तुमच्या कामांवर लक्ष द्या.
मीन – कानाचा त्रास जाणवेल
आज तुमच्या कानाची एखादी तक्रार जाणवेल. धर्म- अध्यात्मात तुमचं मन लागेल. प्रेम संबंध जपा. आर्थिक प्रकरणातील समस्या दूर होतील. कामाच्या ठिकाणी तुमची योग्यता आणि कौशल्य पाहून जबाबदाऱ्यांमध्ये वाढ होईल. निर्धारित लक्ष्य मिळवण्यात यश येईल.
वृषभ – सध्याच्या नोकरीत फायदा होईल
विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच सामाजिक कार्यातही सहभाग घ्यावा. नोकरीमध्ये वरिष्ठांशी झालेल्या भेटीमुळे तुमचा फायदा होईल. व्यापारात काहीतरी नावीन्य आणा. त्यामुळे भविष्यात फायदा होईल. मित्रांसोबत फिरायला जाण्याचा प्लॅन ठरू शकतो. रचनात्मक कार्यांमध्ये मन लागेल.
मिथुन – आर्थिक नुकसान होण्याची शक्यता
आजची महत्त्वाची बाब म्हणजे तुमचं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. एखादी महागडी वस्तू चोरी किंवा गहाळ होऊ शकते. कुटुंबाचा खर्च नियंत्रणात ठेवा, बजेट बिघडू शकतं. धीर ठेऊन काम करा. प्रियकराशी झालेली भेट आनंददायी ठरेल. कायदेशीर प्रकरण मिटतील. आर्थिक नुकसानीचा इशारा असला तरी अचानक लाभही होण्याची शक्यता आहे.
कर्क – प्रसन्नता देणारा अनुभव मिळेल
आजचा तुमचा दिवस शुभ आहे. तुम्ही दिवसभर उत्साहीत राहाल आणि तुम्हाला प्रसन्नही वाटेल. सामाजिक घडामोडींमध्ये रस घ्याल. आर्थिक गोष्टींबाबत विचार विनिमय करून निर्णय घ्या. नवीन व्यावसायिक भागीदार मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी वेतनवाढ होऊ शकते.
सिंह – प्रेमात निराशा पदरी पडेल
प्रेमामध्ये निराशा पदरी पडण्याचे संकेत आहेत. पार्टनरपासून दूर राहण्याची वेळ येईल. तुम्हाला मुलांचीही काळजी वाटेल. नोकरीच्या ठिकाणी जागा बदलल्याने फायदा होईल. उत्पन्नात वाढ होईल. एखादं नवीन काम सुरू कराल. कायदेशीर विवादही संपण्याची शक्यता आहे. अडकलेली काम पूर्ण होतील.
कन्या – लाभाच्या अनेक संधी मिळणार
आज तुम्हाला एखाद्या नवीन योजनेत यश मिळेल. लाभाच्या अनेक संधी उपलब्ध होतील. कायदेशीर विवादात यश मिळेल. रखडलेली कामही पूर्ण होण्याचे संकेत आहेत. व्यावसायिक दौरा फायदेशीर ठरेल. विचारांमधील भिन्नतेमुळे चांगल्या संबंधात दुरावा येईल.
तुळ – मानसिक बेचैनी आणि अस्वस्थेताचा अनुभव येईल
आज तुम्हाला मानसिक बेचैनी आणि अस्वस्थतेचा अनुभव येण्याची शक्यता आहे. पार्टनरची मदत होईल. कुटुंबासोबत वेळ घालवल्यास नात्यांमध्ये गोडवा कायम राहील. देवाणघेवाणीच्या व्यवहारात सावधनता बाळगा. सामाजिक सन्मान आणि संपत्तीत वृद्धी होईल. धार्मिक कार्यात मन लागेल.
वृश्चिक – बहीण-भावातील प्रेम वाढेल
बहीण-भावांमधील प्रेम वाढेल. विवाहयोग्य तरुण लग्नासाठी होकार देऊ शकतात. अडकलेली काम पूर्ण करण्याची योग्य संधी मिळेल. जुन्या ओळखींमुळे फायदा होईल. व्यावसायिक विस्तार होण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक होईल. फिरायला जाण्याचा योग आहे.
धनु – व्यावसायिक करार अचानक रद्द होऊ शकतात
कोणतेही व्यावसायिक करार अचानक रद्द होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी घाईगडबडीत चूक होऊ शकते. काळजी घ्या. प्रत्येक काम विचारपूर्वक करा. तुम्हाला आज गिफ्ट किंवा सन्मान मिळण्याची संधी आहे. लोकप्रियतेत वाढ होईल. राजकारणात असल्यास तुमच्या जवाबदार्या आज वाढतील आणि आत्मसन्मातही वाढ होईल.
मकर – व्यवसायात विस्तार होईल
आर्थिक स्थिती आज मजबूत होईल. व्यावसायात विस्तारही होण्याची शक्यता आहे. प्रोपर्टी खरेदी करण्याची योजना आज बनू शकते. दिलेलं कर्ज परत मिळेल. पार्टनरच्या आरोग्याची काळजी घ्या. घरात शुभ कार्याची तयारीला सुरूवात होईल. आईबाबांची मदतही मिळेल.
हेही वाचा –
12 राशीमध्ये चार राशी असतात जास्त बलशाली
2019 वार्षिक भविष्य धनु राशी – यावर्षी ग्रह तुमची परीक्षा घेणार आहेत
तुम्हाला नक्की कसं सेक्स करायचं आहे हे सांगते तुमची रास