मेष – दीर्घ आजारापणातून होईल सुटका
आज तुम्हाला आराम मिळेल. कामाच्या ठिकाणी समस्या येण्याची शक्यता आहे. धनसंपत्तीबाबत चांगली बातमी मिळेल. मित्रांशी भेट होईल. वाहन चालवताना सावध राहा.
कुंभ – आरोग्य चांगले राहील
आज तुमचे आरोग्य आणि आर्थिक स्थिती चांगली राहील. प्रवास सुखाचा होईल. तरूणांना खेळात प्राविण्य मिळवण्यात यश मिळेल. मित्रांची मदत मिळाल्याने व्यवसायात प्रगती होईल. प्रेमसंबंधात भावनिक ओढ वाढेल.
मीन – कुटुंबातील ताण वाढणार आहे
आज तुमच्या घरात बाहेरच्या लोकांच्या हस्तक्षेपामुळे तणाव वाढणार आहे. व्यावसायिक भागिदारासोबत वाद होऊ शकतात. रचनात्मक कार्यात प्रगती होण्याची शक्यता आहे. वाहन चालवताना सावध राहा.
वृषभ – धनलाभाचा योग
आज तुमच्यासाठी धनलाभाचा योग आहे. आयात-निर्यातीशी निगडीत लोकांना लाभ मिळेल. सामाजिक समारंभात जुन्या मित्रांची भेट होईल. एखाद्या संस्थेकडून सन्मान मिळण्याची शक्यता आहे.
मिथुन – सामाजिक ओळखी वाढतील
आज तुम्हाला प्रेमाची जाणिव होण्याची शक्यता आहे. सामाजिक ओळखी वाढतील. अधिकाऱ्यासोबत असलेल्या ओळखीमुळे तुमची वैयक्तिक कामे पूर्ण करणे शक्य होईल. आर्थिक बाजू मजबूत होईल. रखडलेली कामे पूर्ण कराल.
कर्क – व्यावसायिक समस्या येण्याची शक्यता
आज व्यवसायात तुम्हाला समस्या येण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांचे मन व्यर्थ कामात गुंतण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत जोखिम घेऊ नका. आरोग्याची काळजी घ्या. जोडीदाराची भावनिक साथ मिळेल.
सिंह – घरात सजावटीची योजना आखाल
कौटुंबिक सुखसुविधा वाढण्याची शक्यता आहे. घरात सजावटीचा बेत आखाल. व्यावसायिक बाबतीत यश मिळेल. रखडलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. धार्मिक उत्सव आनंदात साजरा कराल.
कन्या – चांगली संधी गमावण्याची शक्यता
आज दुर्लक्ष केल्यामुळे तुम्ही एखादी चांगली संधी गमावण्याची शक्यता आहे. व्यवसायात चढ-उतार येऊ शकतात. उत्पन्न आणि खर्चात समतोल राखा. वादविवादापासून दूर राहा. प्रेमात त्रिकोण निर्माण होण्याची शक्यता आहे.
तूळ – घरातील वृद्ध व्यक्तीच्या आरोग्याची काळजी घ्या
आज तुमच्या घरातील वृद्ध व्यक्तीच्या आरोग्याची चिंता तुम्हाला सतावणार आहे. मनात निराशा आणि असमाधानाची भावना निर्माण होऊ शकते. धनसंपत्तीत वाढ होण्यासाठी शुभ काळ आहे. प्रेमसंबंध चांगले असतील. अचानक धनलाभ होऊ शकतो.
वृश्चिक – एखाद्या व्यक्तीकडे आकर्षित व्हाल
आज तुम्ही एखाद्या व्यक्तीकडे आकर्षित होणार आहात. जुने वाद मिटतील. आत्मविश्वासात वाढ होईल. कामाच्या ठिकाणी पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. परदेशी जाण्याची संधी मिळू शकते. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढणार आहेत.
धनु – विद्यार्थ्यांना परदेशी जाण्याची संधी
आज विद्यार्थ्यांना परदेशी जाण्याची संधी मिळेल. पदोन्नतीचा योग आहे. उत्पन्नाचे साधन वाढेल. आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. घरात सुख-शांतीचे वातावरण असेल. रखडलेली कामे पूर्ण कराल.
मकर – देणी- घेणी करताना नुकसान होण्याची शक्यता
आज देणी- घेणी करताना नुकसान होण्याची शक्यता आहे. एखादी मौल्यवान वस्तू तुटण्याची अथवा खराब होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक साथ मिळेल. प्रवासाला जाणे टाळा. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता आहे.
या राशींचे जोडीदार असतात जास्तच केअरिंग, प्रत्येक लहानसहान गोष्टींची घेतात काळजी
जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’
आळशी असतात ‘या’ राशीचे लोक, तुम्ही पण त्यातले एक आहात का