मेष – धनप्राप्ती होण्याची शक्यता आहे
आज तुम्हाला रखडलेली धन प्राप्ती होण्याची शक्यता आहे. चल – अचल संपत्ती खरेदी करण्याची योजना होऊ शकते. रखडलेली कामं मार्गी लागून कौटुंबिक प्रतिष्ठा वाढेल. व्यावसायिक कामामध्ये विस्तार होण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये बदल होण्याचा योग आहे.
कुंभ – आईच्या आरोग्यात सुधारणा होईल
आईच्या आरोग्यात सुधारणा झाल्यामुळे तुम्ही आनंदी राहाल. आजचा दिवस परोपकारात घालवाल. आत्मविश्वास वाढेल. जोडीदाराबरोबरील संबंधामध्ये अधिक सुधारणा होईल. कार्यालयात अधिकाऱ्यांकडून अधिक सहकार्य मिळेल. नव्या प्रयोगामध्ये तुम्हाला हवं तसं यश मिळेल. बिघडलेली कामं मार्गी लागतील.
मीन – जोडीदाराबरोबर तणाव वाढण्याची शक्यता
जोडीदाराबरोबर तणाव वाढण्याची शक्यता आहे. मुलांना तुमच्या प्रेमाची अधिक गरज भासेल. देण्याघेण्याबाबत सावधानता बाळगा. रागावर नियंत्रण ठेवा. विरोधकांकडे दुर्लक्ष करू नका. विरोधक आज कधीही तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतात. व्यावसायिक प्रवास टाळा.
वृषभ – नवे प्रेमसंबंध निर्माण होतील
आज खास व्यक्तीची भेट होईल. नवे प्रेमसंबंध निर्माण होतील. बहीण भावामधील कडवटपणा दूर होईल. कार्यालयात अधिकाऱ्यांकडून प्रशंसा होईल. व्यवसायात राजकारणातून फायदा होईल. आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. योग आणि अध्यात्मामध्ये रूची वाढेल.
मिथुन – कार्यक्षेत्रात सावधानता बाळगा
आज तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये सावधानता बाळगण्याची गरज आहे. व्यावसायिक बाबीमध्ये जोखीम उचलू नका. गुंतवणूक करण्यासाठी ही वेळ योग्य नाही. जुन्या मित्रांची भेट होईल. रखडलेली धनप्राप्ती होण्याची संभावना आहे. बिघडलेली कामंही व्यवस्थित होतील. आई – वडिलांचं सहकार्य मिळेल.
कर्क – उपहार अथवा सन्मान मिळेल
आज तुम्हाला उपहार अथवा सन्मान मिळेल. व्यावसायिक संबंध सुधारतील. सामाजिक प्रतिष्ठा आणि धनवृद्धी होईल. घरात आज चांगल्या कार्यांमध्ये व्यस्त राहाल. जोडीदाराबरोबर तुमचे संबंध सुधारतील. मात्र संततीमुळे तुम्हाला आज चिंता वाटत राहील.
सिंह – बेजबाबदारपणामुळे संधी गमवाल
कार्यालयात आवश्यक काम करत असताना आळशीपणा झटका. बेजबाबदारपणामुळे संधी गमवाल. मेहनत अधिक आणि कमी लाभ होईल. अचानक आवडत्या माणसांची भेट होईल. धार्मिक कार्यात भागीदारी होऊ शकते. आरोग्याची काळजी घ्या.
कन्या – तणाव वाढू शकतो
कुटुंबामध्ये समस्यांमुळे तणाव वाढण्याची शक्यता आहे. कोणत्याही घरातील सदस्याची अचानक तब्बेत खराब होऊ शकते. खाण्यापिण्यात आणि दैनंदिन गोष्टीत विशेष लक्ष द्या. आर्थिक क्षेत्रात योजनेशिवाय काम करू नका. कार्यालयात स्थिती सुधारण्याची शक्यता आहे.
तूळ – नात्यात जवळीक वाढेल
नात्यांमध्ये जवळीक वाढेल. विरोधकांवर मात कराल. आर्थिक बाजू मजबूत होईल. विचार केलेली सर्व कामं आज पूर्ण होतील. दुसऱ्यांकडून सहयोग घेऊन यशप्राप्ती होईल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. रचनात्मक कार्यात प्रगती होईल.
वृश्चिक – शिक्षण क्षेत्रात यश मिळेल
शिक्षण क्षेत्रात यश मिळेल. बेरोजगार व्यक्तींना आज काम मिळण्याची शक्यता आहे. व्यावयायिक प्रवासात लाभ मिळेल. कार्यालयात पदोन्नती होण्याचा योग आहे. रखडलेली कामं मार्गी लागतली. रचनात्मक कार्यात तुमची आवड वाढेल. जोडीदाराकडून सहयोग मिळेल.
धनु – आज कोणालाही उधार देऊ नका
आज कोणाला उधार दिल्यास, ते पैसे परत मिळणार नाहीत. व्यावसायिक योजना करण्यासाठी गुंतवणूक करावी लागेल.देण्याघेण्यात कदाचित धोका होण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यात मन लागून राहील. वाहनाचा वापर जपून करा. कायद्याच्या बाबीतून सुटका होण्याची शक्यता आहे.
मकर – ऊर्जा आणि टवटवीतपणा जाणवेल
आरोग्याच्या बाबत तुम्ही पूर्ण फिट आहात. आज ऊर्जा आणि टवटवीतपणा जाणवून उल्हासित राहाल. व्यवसायात चढउतार होण्याचे संकेत आहेत. उत्पन्नाचे नवे स्रोत मिळतील. कार्यक्षेत्रातही सर्वांकडून प्रभावित व्हाल. आज प्रवास करणं शक्यतो टाळा. रचनात्मक कार्यात आवड निर्माण होईल. देण्याघेण्याच्या बाबतीत सतर्क राहा.