मेष – कार्यात व्यस्त राहाल
परिश्रम व प्रयत्नांमध्ये सातत्य आपल्याला यशाच्या जवळ नेत असते. कार्यात व्यस्त राहिल्याने इतर गोष्टींमधील आपला हस्तक्षेप आपोआप कमी होत जाईल. कार्यात व्यस्त राहणे कधीही चांगले याचा अनुभव आज आपल्याला येईल. कार्यात व्यस्त राहिल्यामुळे घरातील शितयुद्धापासून आपण दूर राहाल. हेच तुमच्या हिताचे राहिल. खर्चाकडे मात्र आज लक्ष ठेवलं पाहिजे. अनावश्यक खर्चाला कात्री लावली पाहिजे. चिकाटी कायम ठेवून हातातील अपूर्ण कार्य पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत राहा. त्यात तुम्हाला यश नक्कीच मिळेल. संततीकडून सुर्वाता कानी येतील. कारण आज मुलांना सुयश मिळणार आहे.
कुंभ – आज धाडस करू नका
आत्मविश्वास कमी असताना कुठलंच धाडस करायला नको कारण त्यामुळे नुकसान होत असते. फायदाही झाला तरी तो अपेक्षित असा नसतोच. आपल्यासाठी आजचा दिवस असाच काहीसा आहे. आज तुमचा आत्मविश्वास कमी राहिल. कुठलेच धाडस आज करु नका. चिकाटीने प्रयत्न करीत राहा. प्रयत्नांमध्ये खंड पडणार नाही याची काळजी घ्या. एखादे काम अपूर्ण राहिलेले असेल तर ते पूर्ण करण्यावर भर द्या. आज नवीन काम हाती घेऊ नका. तुमचेच नुकसान होऊ शकते. विशेषत: लहान फायद्यासाठी मोठं नुकसान अजिबात नको. आज संततीला यश मिळू शकतं.
मीन – उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ ठेवा
खर्च कोणालाही सुटत नाहीत. जिथे आवश्यक आहे तिथे खर्च हा करावाच लागतो. कधी कधी तर इच्छा नसतानाही अवास्तव खर्च करावा लागतो. आजचा दिवस आपल्यासाठी काही विशेष असा नाही. त्यामुळे अवास्तव खर्चाला कात्री लावण्याचा प्रयत्न करा. उत्पन्न व खर्च याचा योग्य ताळमेळ ठेवा. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होता कामा नये. कामाला पूर्ण होण्यासाठी आज जास्त वेळ लागू शकतो. मन विचलित होऊ देऊ नका. आज तुम्हाला परिश्रम करावेच लागणार आहेत. परिश्रमांना यश मिळु शकतं.
वृषभ – जोडीदारासोबत प्रवासाचे योग
प्रवास कुठल्यातरी निमित्ताने होत असला तरी तो तन आणि मनासाठी आवश्यक असतो. प्रवास जर जोडीदारासोबत असेल तर त्याचा आनंदच निराळा असतो. रोजच्या दिनचर्येतून बाहेर पडण्याचा तो एक मार्ग आहे. या आनंदाची अनुभूती आज तुम्हाला मिळू शकते. आज जोडीदारासोबत तुम्ही प्रवास करणार आहात. त्यामुळे जीवनात आनंदी आनंद असेल. व्यापारी, व्यावसायिकांसाठी आज सुखद दिवस असून लाभदायक असणार आहे. कलाकारांनाही आजचा दिवस यश देणारा आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मात्र आजचा दिवस चिंतेचा आहे. कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक घेणे गरजेचे आहे. लक्षात ठेवा लाभ नाही झाला तरी चालेल मात्र नुकसानही होता कामा नये.
मिथुन – आरोग्य उत्तम राहिल
तनासह मनही सुदृढ असणारा व्यक्ती जीवनातील कोणत्याही आव्हानाला सक्षमपणे तोंड देऊ शकते. स्वत: जगण्याचा मनमुराद आनंद घेत इतरांनाही आनंद देऊ शकतो. स्वत:च्या समस्या सोडवत इतरांचीही काळजी घेऊ शकतो. याची अनुभूती आज तुम्हाला मिळणार आहे. आज तुम्ही तनासह मनानेही सुदृढतेचा अनुभव करणार आहात. कुटुंबातील एखाद्या प्रश्नावर आज तुम्ही धैर्याने निर्णय घेणार आहात. त्याचे सर्वांकडून स्वागतच होणार आहे. व्यापार आणि व्यवसायही आज सुखदायक राहिल. लेखकांना आज अपेक्षित यश प्राप्त होऊ शकते. आज सारखा दिवस रोज उगवावा, अशी देवाकडे प्रार्थना कराल.
कर्क – लाभदायक दिवस
लाभ फक्त आर्थिकच असतो असं नाही तर लाभाचे खूप वेगवेगळे प्रकार आहेत. फक्त ते आपल्याला ओळखता आले पाहिजेत. लाभाचा योग्य उपयोग करुन आपण आनंद मिळवू शकतो. आजचा दिवस आपल्यासाठी अशाच आनंदाचा आणि लाभदायक आहे. कारण व्यापार, व्यवसाय सुखदायक असून त्यात लाभ होऊ शकतो.आज तुमचा मानसन्मानदेखील वाढ होऊ शकतो. याशिवाय अचानक आनंदही प्राप्त होऊ शकतो. थोडक्यात आजचा दिवस आपल्यासाठी लाभदायक आहे. फक्त आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका.
सिंह – महत्त्वपूर्ण निर्णय आज नको
आजचा दिवस सामान्य आहे. आपल्याला काही मिळणार नसले तरी आपले काही नुकसानदेखील होणार नाही आज कोणतीही जोखीम पत्करु नका. विशेषत: आज कुठलाही महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. घरात मानसिक सुख शांतीचे वातावरण राहिल. विद्यार्थीही अभ्यासात लक्ष देतील. स्त्रियांना मात्र आज मानसिक तणाव सहन करावा लागू शकतो. म्हणून त्यांनी आज कुठलेही धाडस करायला अथवा वादात पडायला नको. कुठल्यातरी गोष्टीमध्ये आपले मन रमवून ठेवा म्हणजे इतर गोष्टींचा मानसिक त्रास होणार नाही.
कन्या – बाहेरील पदार्थ खाऊ नका
घरचं जेवण कुणाला आवडत नाही. खरंतर शरीरासाठी तेच आवश्यक असतं. घराबाहेर असताना बाहेरील चटपटीत पदार्थ, जंक फूड खाण्याचा मोह कुणालाच टाळता येत नाही मात्र ते आरोग्यासाठी घातक असतात. तुम्हाला आज बाहेरील पदार्थांना नाहीच म्हणावे लागेल विशेषत: जंक फूड तर नकोच. आज नवीन ओळखीही होऊ शकतात. नवीन लोकांसमोर आत्मविश्वासाने सामारे जा. एखादे महत्त्वपूर्ण कार्य अपूर्ण राहिलेले असेल तर ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायला आज हरकत नाही. जेष्ठ नागरीकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे आज किरकोळ ताप योण्याची शक्यता आहे.
तुळ – वाहन सावकाश चालवा
हल्ली वाहन मोठ्या प्रमाणावर वेगाने चालविण्याची फॅशन झाली आहे. वेळेवर पोहचण्यासाठी किंवा उशीर झाल्यामुळे लोक वाहन जोरात चालवतात. अशाने अपघात होत असतात. आज तुम्ही मात्र कितीही घाई असली तरी वाहन सावकाश चालवा. एखाद्या ठिकाणी तातडीने पोहचायचे असेल तर वेळेच्या आधी निघा मात्र घाई करु नका. कुटुंबात कोणताही निर्णय धैर्याने घ्या. निर्णय घेताना घाई करु नका. मित्रांकडून आज आनंद प्राप्त होईल. ओळखीच्या व्यक्तींबरोबर सामंजस्य वाढेल.
वृश्चिक – संधीचा लाभ घ्या
आजचा दिवस आपल्यासाठी नवीन संधी उपलब्ध करुन देणारा असेल. नोकरी व व्यवसायामध्ये यश मिळवायचे असेल तर या संधीचा आपल्याला लाभ घ्यावा लागेल. सोबतच आपली कल्पकता व सर्जनशीलतेलाही आज पुरेपुर वाव मिळू शकतो. आत्मविश्वासही वाढलेला असेल. आपल्या कार्याला आज नवी दिशा प्राप्त होऊ शकते. एखाद्या कार्याविषयी आज वडीलांकडूनही मार्गदर्शन मिळू शकते. त्यांच्या अनुभवाचा व त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा आपल्या कामामध्ये उपयोग करुन घ्या. तो नक्कीच तुमच्या उपयोगी पडेल. संततीकडूनही आज सुर्वाता कानी येतील. कारण मुलांना आज यश मिळणार आहे.
धनु – अडचणींचा दिवस
प्रत्येक दिवशी तुमच्या मनासारखेच घडेल अशी अपेक्षाही करणं व्यर्थ आहे. कामामध्ये अडचणी येत असतील तर काम करण्याची जिद्द आणखीन वाढली लागली पाहिजे. जिद्दीने मिळविलेल्या यशाचा आनंदही मोठा असतो. आजचा तुमचा दिवस चांगला जाऊ शकतो. आज तुमच्या अडचणी वाढणार आहेत. आपण आज खंबीरदेखील राहिले पाहिजे. उत्तम आरोग्यासाठी व्यायाम केला पाहिजे. स्त्री पक्षाकडून आज सहयोगाची अपेक्षा तुम्ही करु शकता. ज्याचा उपयोग तुम्हाला आत्मबल वाढविण्यासाठी होईल. खर्चावर मात्र लक्ष ठेवले पाहिजे. अवास्तव खर्चाला कात्री लावणेच हिताचे राहिल.
मकर – शिस्तीचा अंगीकार करा
शिस्तप्रिय व्यक्तींची काम करण्याची शैलीच वेगळी असते. त्याची सर्व कामे ही वेळेवर होतात. आळस अशा व्यक्तींच्या आजुबाजुलाही फिरकत नसतो. आज तुम्हाला अशा शिस्तीचा अंगीकार करावा लागणार आहे. तुमची अपूर्ण कामे पूर्ण होतील. बेशिस्त राहू नका. आज तुमचे शत्रू त्यांचा पराभव मान्य करतील. तुम्ही कार्यात व्यस्त राहिल्यामुळे इतर गोष्टीत लक्ष घालणार नाही. जे आज तुमच्या हिताचे आहे. घरातील शितयुद्धापासून दूर राहा. घरात शांती टिकून राहिल.
लेखिका : श्री ज्योतिष संशोधन केंद्र