मेष : व्यापार सुखद
व्यापार, व्यवसायासाठी आजचा दिवस सुखद असा आहे. त्यामुळे व्यापारी बांधवांनी आज मिळणा-या संधींकडे लक्ष दिले पाहिजे. फायदा होऊ शकतो. शरीराहस मनही सुदृढ राहावे म्हणून व्यायामासाठी वेळ काढा व त्याची सवय लावून घ्या. आज तुम्ही वास्तूवर आनंदाने खर्च करणार आहात. त्यामुळे घरात आनंदी आनंद असेल.
कुंभ : सोशल मीडिया घातक
सोशल मीडियाचा अतिवापर आज सर्वांसाठीच घातक ठरत आहे. विद्याथ्र्यांनी तर त्यापासून लांब राहणे योग्य राहिल. तरच त्यांचे लक्ष अभ्यासावर केंद्रित होऊ शकते. जेष्ठ नागरीकांनी आज आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यायची आहे. जुनी दुखणी तोंड वर काढू शकतात. आपल्यावर ईश्वराची कृपा असल्याची भावना आज मनात दाटून येईल.
मीन : चिकाटी कायम ठेवा
प्रयत्न करुनही यश मिळत नसेल तर समजून घ्या की भाग्य तुमची परिक्षा घेत आहे. म्हणून चिकाटी कायम ठेवून प्रयत्न करीत राहा. अपूर्ण असलेली कामे पूर्ण करण्यावर भर द्या. मुलं आज तुमच्या आवडीनुसार वागणार नाहीत. त्यामुळे आज त्यांच्याकडून अपेक्षा नकोच. एखाद्याबद्दल आज गैरसमज होऊ शकतो.
वृषभ : कामे पूर्ण होतील
आजचा दिवस कामे पूर्ण होण्याचा दिवस आहे. विशेषत: अधिकारी वर्गाच्या हातात काम अडकलेले असेल किंवा एखादे महत्त्वपूर्ण काम बाकी असेल तर आज प्रयत्न वाढवा. नाही तर हत्ती गेला नि शेपूट राहिले, अशी अवस्था होईल. आरोग्य चांगले राहिल. आज तुमचे प्रवासाचेही योग असून त्यात नुकसान होऊ शकते. म्हणून प्रवास टाळा.
मिथुन : गोंधळ उडेल
तुमच्यासाठी आज गोंधळाचा दिवस आहे. विशेषत: आज सरकारी कर्मचारी गोंधळात पडू शकतील. म्हणून कोणताही निर्णय घेतांना विचारपूर्वकच घ्या. आज तुमच्या संततीला यश मिळू शकतं. त्यांना प्रोत्साहन द्यायला विसरु नका. इच्छित कार्याला उशिर होत असेल तर निराश होऊ नका. कदाचित भाग्य तुमची परिक्षा घेत असेल.
कर्क : खर्चावर नियंत्रण
उत्पन्नापेक्षा खर्च जास्त झाला की आर्थिक गणिते बिघडत असतात. आज तुमचे तसे होऊ नये म्हणून उत्पन्न व खर्च यांच्यात तुम्हाला नियंत्रण ठेवावे लागेल. अवास्तव खर्चाला कात्री लावावी लागेल. वडीलांकडून आज तुम्हाला मार्गदर्शन मिळू शकतं. त्याचा उपयोग आपल्या कामात करुन घेण्याचा प्रयत्न करा. आज तुमचे शत्रू पराभुत होणार आहेत.
सिंह : जोडीदाराचा प्रभाव
आज तुमच्यावर जोडीदाराचा प्रभाव राहणार आहे. दिवसभर तुम्ही जोडीदार सांगेल त्यानुसार वागण्याचा प्रयत्न करणार आहात. त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण असेल. कुटुंबासाठी वेळ काढाल. अमर्याद सहनशीलता व उत्साह या दोन्ही गोष्टींचा आजचा तुमचा दिवस परिपूर्ण राहणार आहे. सरकारी कर्मचारी मात्र आज गोंधळात पडू शकतात. म्हणून काळजी घ्यावी.
कन्या : संधीचा उपयोग घ्या
नोकरीसह आज व्यवसायातही संधी मिळू शकतात. म्हणून दिवसभर डोळे ठेवून मिळणा-या संधी लाभ घेण्यासाठी सजग राहा. नाही तर नंतर पश्चाताप करीत बसावे लागेल. अपचनाचा त्रास होण्याची शक्यता आहे. आहारासह आरोग्याची काळजी घ्या. पथ्य पाळण्यावर भर द्या.
तूळ : नफ्याकडे लक्ष
कधी कधी स्वार्थ साधुन घेण फायद्याचं असतं. आज थोडं स्वार्थी होऊन नफ्याकडे लक्ष ठेवा. नाही तर दैव देते आणि कर्म नेते अशी अवस्था होईल. आरोग्य नरम – गरम राहिल. त्यामुळे उत्साह वाटणार नाही. आपल्या शब्दांवर नियंत्रण ठेवा. बोलतांना तोलून-मापुनच बोला. आपल्या बोलण्याने कुणी दुखावणार नाही याची काळजी घ्या.
वृश्चिक : व्यवसायात यश
व्यावसायिकांसाठी आज अतिशय आनंदाचा दिवस असून व्यवसायामध्ये घवघवीत असं यश प्राप्त होऊ शकतं. आज इच्छा व अपेक्षेपेक्षा जास्त मिळविण्याचा दिवस आहे. स्त्रियांना आज मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. म्हणून आपल्या आवडत्या गोष्टीमध्ये मन रमविण्याचा व शांत राहण्याचा प्रयत्न करा. जीवन जगत असतांना सर्वकाही आपल्यालाच मिळेल हा अट्टहास चुकीचा असतो.
धनु : कागदपत्रे सांभाळा
आपली महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित आहेत की नाही याची खात्री करुन त्यांना सांभाळून ठेवा. म्हणजे कामाच्या वेळी शोधाशोध करावी लागणार नाही. सौ बका एक लिखा नुसार फक्त बोलण्यावर विश्वास ठेवू नका. कल्पक व सर्जनशील कार्यात आज प्रगती शक्य होणार आहे. टाकीचे घाव सहन केल्याशिवाय देवपण येत नाही.
मकर : बढती मिळेल
कर्मचारी वर्गासाठी आजचा दिवस आनंददायी होऊ शकतो. कारण बढतीच्या योग्य असणा-या कर्मचा-यांना आज बढती मिळू शकते. जोडीदाराबद्दल आज गैरसमज होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शांत राहून वाद मिटवण्यावर भर द्या. योग्य संवाद साधा. आध्यामित्मक कार्यात सहभागी झाल्याने आज मनस्वी आनंद मिळू शकतो.
लेखिकेचा संपर्क करा : श्री ज्योतिष संशोधन केंद्र