मेष – आरोग्याची काळजी घ्या.
अति तणाण आणि डोकेदुखीचा त्रास जाणवेल. तुमच्या योजनांना यश मिळेल. कुटुंबातील वातावरण चांगलं राहील. मित्रांची साथ लाभेल. व्यवसायात पार्टनरशिपमध्ये लाभ होईल. कागदपत्रांची व्यवस्थित पूर्तता करा. कामाच्या ठिकाणी वातावरण चांगलं राहील.
कुंभ – अडकलेलं पैसे मिळण्याची शक्यता
आजचा दिवस तुमच्यासाठी लाभदायक आहे. एखाद्या ठिकाणी अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक संपत्तीबाबतचे वाद मिटू शकतात. वाहन खरेदी करण्याचं प्लॅनिंग कराल. मित्रांसोबत फिरायला जाण्याचा योग आहे. पण फिरायला गेल्यावर अनावश्यक खर्च टाळा. पार्टनरशी असलेले संबंध सुधारतील.
मीन- आर्थिक नुकसान होण्याची शक्यता
करिअरमध्ये आव्हानात्मक काम मिळू शकतं. काम करताना काळजी घ्या. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. उतावळेपणावर नियंत्रण ठेवा. समस्यांपासून मुक्ती मिळेल. अनेक अडकलेली कामांना गती मिळेल. कौटुंबिक वातावरणही चांगले राहील. संतान प्राप्तीसाठी प्रयत्न कराल.
वृषभ – भावा-बहिणींच्या नात्यातील कटुता दूर होईल
भावा-बहिणींसाठी खूषखबर आहे. जर तुमच्या नात्यात कटुता आली असेल तर ती लवकरच दूर होईल. वैवाहीक जीवनातही आनंद मिळणार आहे. फॅमिली प्लानिंग करू शकता. प्रॉपर्टीसंबंधातील प्रकरण मार्गी लागतील. व्यावसायिक पार्टनरशिपमध्ये फायदा होईल. विरोधकांवर मात कराल. रखडलेली काम पुन्हा सुरू होतील.
मिथुन – रचनात्मक कार्यात वृद्धी होईल
आज विद्यार्थ्यांना आनंदवार्ता मिळेल. रचनात्मक कार्यात वृद्धी होईल. फिरायला जाण्याचा योग आहे. जुन्या मित्रांची भेट होईल. अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. प्रेमाच्याबाबतीत तुमची स्थिती सकारात्मक राहील. छोटी-मोठ्या आजारांमुळे त्रास होईल.
कर्क – मेहनत करूनही हवं तसं फळ मिळणार नाही
व्यवसायात मेहनत करूनही मनासारखं फळ न मिळण्याची शक्यता आहे. कोणतीही महागडी वस्तू खरेदी करणं टाळा. संपत्तीच्या प्रकरणात कुटुंबातील लोक अडथळा निर्माण करू शकतात. हेकेखोरपणामुळे नुकसान होईल. प्रिय व्यक्तींच्या मदतीने कठीण काम पूर्ण कराल.
सिंह – आरोग्यात सुधारणा होईल
आज तुम्हाला शुभ संकेत मिळतील. विशेषकरून आरोग्याच्या बाबतीत यश मिळेल. व्यापारात विस्तार होण्याची शक्यता आहे पण आर्थिक प्रकरणात तणाव राहील. कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. रचनात्मक कार्यात रस घ्याल. मित्रांबरोबर फिरायला जाल.
कन्या – कुटुंबात तणाव निर्माण होईल
कुटुंबात छोट-मोठे तणाव निर्माण होऊ शकतात, त्यामुळे काळजी घ्या. संवाद साधताना काळजी घ्या. द्विधा मनस्थितीत कोणताही निर्णय घेऊ नका. व्यावसायिक विस्तार होईल. नोकरीमध्ये जोखमीच्या कामांपासून दूर राहा. रचनात्मक कार्यांमध्ये आवड वाढेल. देवाण-घेवाणीच्याबाबतीत सावधानता बाळगा.
तुळ – उत्पन्नात वृद्धी होईल
नोकरी करणाऱ्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होईल. व्यवसायात एखादी महत्त्वपूर्ण योजना पूर्ण करून लोकप्रियता मिळवाल. नव्या कामांना सुरूवात कराल. आपल्या आरोग्याकडे खास लक्ष द्या. नात्यांमधील कडवटपणा दूर होईल. अडकलेली काम पूर्ण होतील.
वृश्चिक – मौसमी आजाऱ्यांपासून त्रास होईल
तुमच्या आईला गुडघे किंवा पायांचा त्रास जाणवेल. खाण्यापिण्याच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. व्यापाराच्या बाबतीत तुमचा दिवस सुखद राहील. उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील. एखाद्या संस्थेकडून तुमचा सन्मान करण्यात येईल. मित्रांची भेट होईल. विरोधकांवर मात कराल.
धनु – नवे प्रेमसंबंध प्रस्थापित होतील
नवे प्रेमसंबंध प्रस्थापित होऊन त्यांना योग्य दिशा मिळेल. वयस्करांच्या मदतीने तुम्हाला संपत्तीनिगडीत समस्या सोडवत येण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी नवीन जवाबदाऱ्या मिळतील. व्यावसायिक भागीदारीने होईल लाभ. सध्या कोणत्याही ठिकाणी फिराला जाणं टाळा. रचनात्मक कार्यात मन रमेल.
मकर – विद्यार्थ्यांचं अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल
आज विद्यार्थांचं अभ्यासाकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. मित्रांसोबत वेळ घालवाल. नोकरीमध्ये लक्ष्य मिळवण्यात तुम्ही अयशस्वी राहाल. धैर्य हेच तुमच्या यशाची किल्ली आहे. खर्चांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. आरोग्याबाबत सावधानता बाळगा. कौटुंबिक नात्यांमध्ये समस्या निर्माण होतील.
हेही वाचा –
वार्षिक भविष्य 2019 सिंह (Leo) राशी : नवीन वर्षात कभी खुशी कभी गम
वार्षिक भविष्य तूळ (Libra) राशी : फक्त जून ते ऑगस्ट काळजी घ्या, बाकी वर्ष तुमचंच
12 राशीमध्ये चार राशी असतात जास्त बलशाली