मेष – उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे
अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक योजना लाभदायक ठरतील. आर्थिक पक्ष मजबूत असेल. वृद्ध लोकांची काळजी घ्या. विरोधकांपासून सावध राहा. रखडलेली कामे पूर्ण होतील.
कुंभ – मनातील गोष्टी सांगण्यात यश
आज तुम्हाला तुमच्या मनातील गोष्टी इतरांना सांगण्यात यश मिळेल. कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करणे सोपे जाईल. नोकरीत बदल करण्याची इच्छा वाटेल. रखडलेली कामे पूर्ण होतील.
मीन – महत्त्वाची कामे पूर्ण होतील
योग्य वेळी अचूक निर्णय न घेतल्यामुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागेल. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता आहे. रचनात्मक कार्यातील रस वाढणार आहे. जोडीदाराची भावनिक साथ मिळेल.
वृषभ – व्यवसायात अडथळे येण्याची शक्यता आहे
आज तुमच्या व्यवसायात अडथळा येण्याची शक्यता आहे. अधिकाऱ्यांसोबत तणाव वाढण्याची शक्यता आहे. कोर्ट कचेरीतून सुटका मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत असेल. प्रिय व्यक्तीबाबत पझेसिव्ह व्हाल.
मिथुन – मुलांची तब्येत खराब होण्याची आहे
वातावरणातील बदलामुळे मुलांची तब्येत बिघडेल. विनाकारण दगदग करावी लागेल. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढणार आहेत. प्रभावशाली व्यक्तीशी भेट होईल.
कर्क – विवाहासाठी प्रस्ताव मिळू शकतात
विवाहाचे प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत मौजमस्तीचे वातावरण असेल. नवीन जबाबदारी मिळाल्याने बिझी व्हाल. कौटुंबिक जीवन सुखमय असेल. सामाजिक सन्मान आणि धनसंपत्तीत वाढ होईल.
सिंह – पदोन्नती आणि पगारवाढ होईल
आज कामाच्या ठिकाणी तुमच्यासाठी आनंदाचे वातावरण असेल. पदोन्नती आणि पगारवाढ होण्याची शक्यता आहे. राजकारणातील व्यस्तता वाढेल. व्यावसायिक कामांसाठी परदेशी जाण्याची शक्यता आहे.
कन्या – आर्थिक नुकसान होण्याची शक्यता
आज व्यवसायात सावधपणे काम करण्याची शक्यता आहे. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. विनाकारण खरेदी केल्यामुळे बजेट वाढणार आहे. जोडीदाराची साथ मिळेल. राजकारणातील जबाबदारी वाढणार आहे.
तूळ – फ्रेश वाटेल
आज तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटेल. एखादी नवीन गोष्ट केल्यामुळे उत्साहित व्हाल. कामाच्या ठिकाणी पदोन्नती होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक योजना यशस्वी होतील. सामाजिक कार्यक्रमात सक्रिय सहभाग घ्याल.
वृश्चिक – इतरांच्या हस्तक्षेपामुळे समस्या वाढतील
इतरांच्या हस्तक्षेपामुळे घरातील समस्या वाढणार आहेत. सहकारी लक्ष विचलित करण्याची शक्यता आहे. पैशांच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. कला आणि लेखन कार्यात विद्यार्थ्यांना मेहनत घ्यावी लागेल.
धनु – तणाव वाढण्याची शक्यता
जीवनशैलीत बदल झाल्यामुळे तणाव वाढण्याची शक्यता आहे. व्यवसायातील आर्थिक मदतीमुळे लाभ होण्याची शक्यता आहे. सहकाऱ्यांच्या सहयोगाने कामे पूर्ण होतील. विद्यार्थ्यांचा खेळातील रस वाढणार आहे.
मकर – मौल्यवान वस्तू अथवा धन मिळेल
आज सासरच्या मंडळींकडून तुम्हाला धन अथवा महागडी भेटवस्तू मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत असेल. चल अचल संपत्ती खरेदी कराल. व्यावसायिक योजना सफळ होतील. प्रवासाला जाण्याचा योग आहे.
अधिक वाचा –
जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’
आळशी असतात ‘या’ राशीचे लोक, तुम्ही पण त्यातले एक आहात का
या राशींचे जोडीदार असतात जास्तच केअरिंग, प्रत्येक लहानसहान गोष्टींची घेतात काळजी