मेष – कौटुंबिक तणाव वाढण्याची शक्यता
आज तुमचा कौटुंबिक वाद चिघण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचा तणाव वाढेल. धार्मिक कार्यातील रस वाढणार आहे. व्यावसायिक योजना पूर्ण करण्यात यश मिळेल. देणी घेणी सांभाळून करा.
कुंभ – आर्थिक संकट येण्याची शक्यता
आज तुमच्यावर कदाचित आर्थिक संकट येण्याची शक्यता आहे. नवीन योजना राबवण्यासाठी पैशांची चणचण जाणवेल. व्यवसायात बदल करण्याची गरज आहे. प्रिय व्यक्तीशी भेट होईल. जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका.
मीन – आरोग्य सुधारण्याची शक्यता आहे
आज तुमच्या आरोग्यात सुधारणा होण्याची शक्यता आहे. सामाजिक ओळखींमधून लाभ होईल. उत्पन्न आणि खर्च यावर नियंत्रण ठेवा. मुलांकडून शुभवार्ता मिळतील. कामाच्या ठिकाणी नवी जबाबदारी मिळेल. एकट्याने लॉंग ड्राईव्हवर जाण्याचा आनंद घ्याल.
वृषभ – हात अथवा पायाला वेदना जाणवतील
आज तुमच्या हात अथवा पायात वेदना जाणवण्याची शक्यता आहे. थोड्याशा प्रयत्नाने तुमचे रखडलेले काम पूर्ण होईल. राजकारणील महत्त्वकांक्षा पूर्ण होतील. तरूणांना खेळात चांगली संधी मिळेल.
मिथुन – अचानक धनलाभ मिळण्याची शक्यता
आज तुमचे रखडलेले पैसे परत मिळण्यायची शक्यता आहे. व्यावसायिक विस्ताराची शक्यता आहे. पैसे गुंतवणूकीचा विचार कराल. प्रवासातून यश मिळण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यक्रमात सहभागी व्हाल.
कर्क – प्रेमाचा शोध पूर्ण होईल
आज तुम्हाला भावंडांचे सहकार्य मिळणार आहे. प्रेमाचा शोध पूर्ण होणार आहे. कामातील तुमच्या नवीन पद्धतीमुळे अधिकारी खुश होतील. आर्थिक स्थिती सुधारणार आहे. देणी घेणी सांभाळून करा.
सिंह – बेरोजगार निराश होतील
आज बेरोजगारांना निराश व्हावं लागेल. व्यावसायिक योजना रखडू शकतात. काम वेळेत पूर्ण करण्याचा दबाव राहील. रखडलेले धन पुन्हा परत मिळेल. जोडीदारासोबत नाते मजबूत राहील.
कन्या – चल-अचल संपत्ती खरेदीत यश मिळेल
आज तुम्ही चल अथवा अचल संपत्ती खरेदी करणार आहात. जोडीदारासोबत शॉपिंगला जाण्याची योजना आखाल. उत्पन्नात वाढ होईल. व्यावसायिक प्रवास फायदेशीर होईल. एखाद्या व्यक्तीशी अचानक झालेली भेट नात्यात परिवर्तीत होईल.
तूळ – कामाच्या ठिकाणी दुर्लक्षपणा करू नका
आज कामाच्या ठिकाणी दुर्लक्षपणा करू नका. कामासाठी शिफारस करावी लागेल. देणी घेणी करताना सावध राहा. मुलांकडून खुशखबर मिळेल. विरोधकांपासून सावध राहा.
वृश्चिक – जोडीदाराचे आरोग्य बिघडण्याची शक्यता
आज तुमच्या जोडीदाराची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तणावामुक्त वातावरण असेल. व्यावसायिक योजना फायदेशीर ठरतील. आर्थिक स्थिती मजबूत असेल. राजकारणातील महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील.
धनु – कौटुंबिक सहयोग लाभेल
प्रेमसंबंधात महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागेल. कौटुंबिक साथ मिळेल. आर्थिक समस्या सोडवण्यात यश मिळेल. व्यावसायिक भागिदारीमुळे तणाव निर्माण होईल. लॉंग ड्राईव्हला जाण्याची संधी मिळेल.
मकर – स्पर्धा परिक्षेत यश मिळेल
आज तुम्हाला स्पर्धा परिक्षेत यश मिळण्याची शक्यता आहे.आजचा दिवस रोमॅंटिक असेल. मित्रांसोबत प्रवासाला जाण्याचा योग आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करणं महागात पडेल. धार्मिक कार्यात रस वाढेल.
अधिक वाचा –
जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’
आळशी असतात ‘या’ राशीचे लोक, तुम्ही पण त्यातले एक आहात का
या राशींचे जोडीदार असतात जास्तच केअरिंग, प्रत्येक लहानसहान गोष्टींची घेतात काळजी