मेष – नातेसंबधांमध्ये कडूपणा
नातेसंबध बिघडण्याची शक्यता आहे.विनाकारण वाद करणे टाळा. व्यवसायामध्ये अडचणी येतील. नोकरीमध्ये नवीन जबाबदाऱ्या वाढल्यामुळे व्यस्त राहाल. वाढण्याऱ्या समस्यांचा आत्मविश्वास आणि धेर्यांने सामना करा. अडकलेली कामे पूर्ण होतील.
कुंभ – वाहनाची काळजी घ्या.
वाहनाची काळजी घेण्याची गरज. पैसे दुप्पट करणाऱ्या योजनांपासून दूर रहा. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. व्यवसायामध्ये चढ-उतार येतील. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. अनोळखी लोकांवर विश्वास ठेऊ नका.
मीन- आरोग्य सुधारेल
आज आराम आणि चिंतन दोन्हीसाठी वेळ मिळेल. आरोग्यामध्ये चांगली सुधारणा होईल. मानसिक स्वास्थ सुधारेल. व्यवसायातील नवीन ओळखी लाभदायक ठरतील. कामानिमित्त प्रवास घडेल. व्यवहार करताना सावध रहा.
वृषभ – धनलाभ होईल
तुमच्यासाठी आजचा दिवस शुभ असेल. एखादी मोठी खुषखबर मिळण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये प्रमोशन होईल. बुडालेले पैसे अचानक मिळाल्याने आनंद मिळेल. जोडीदारावर संशय घेणे सोडा. अनोळखी लोकांवर विश्वास ठेऊ नका.
मिथुन – आईच्या तब्येतीची काळजी घ्या
अचानक तुमच्या आईची तब्येत बिघडू शकते. निराश न होता काळजी घ्या. नोकरीमध्ये प्रमोशन होण्याची शक्यता. उत्पन्नाची साधने वाढतील. भागीदारीत केलेले व्यवहार फायद्याचे ठरतील. देणी-घेणी करताना सावध रहा. धार्मिक कार्यात मन रमवा.
कर्क – भावंडासोबत असलेला जुना वाद मिटेल
प्रेमाचे नातेसंबध अधिक रोमॅंटिक होईल. मित्रांच्या सहकार्यांमुळे बिझनेस वाढेल. विद्यार्थ्यांना परिक्षा आणि इंटरव्हू मध्ये यश मिळेल. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढतील.
सिंह – संधी गमवाल
दुर्लक्षपणा केल्यामुळे चांगल्या संधी गमवाल. यश मिळविण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागेल. राग आणि भावनिक होऊन घेतलेले निर्णय चुकीचे ठरतील. प्रेमात यश मिळेल. बिघडलेले काम सुधारण्यात यश मिळेल.
कन्या – धनलाभ होण्याची शक्यता
आर्थिक व्यवहारांमध्ये खुशखबर मिळेल. एखादी वास्तू खरेदी करण्याचे योग आहेत. व्यवसायामध्ये आर्थिक यश मिळेल. नोकरीमध्ये प्रगती होईल. जोडीदार मन दुखावण्याची शक्यता आहे. प्रवास घडेल.
तूळ – व्यवहार रद्द होण्याची शक्यता
एखादा मोठा व्यवहार अचानक रद्द होण्याची शक्यता आहे. आर्थिक संकट समोर दिसेल. कर्ज घेणे टाळा. मानसिक ताण येण्याचा धोका आहे. कठोर बोलणे टाळा. जोडीदाराला दुखवू नका. पालकांची काळजी घ्या. अडकलेले पैसे परत येतील.
वृश्चिक – भावंडाचे प्रेम वाढेल
भावंडांमधील नातेसंबध अधिक चांगले होतील. विवाहयोग्य तरूण लग्नासाठी तयार होतील. अडकलेली कामे पूर्ण होतील. यश मिळेल. जुन्या नात्यातून लाभ होतील. भागीदारीच्या व्यवहारात यशस्वी व्हाल. कायद्याच्या अडचणीतून सुटका मिळेल.
धनु – व्हायरल आजारपण
वातावरणातील बदलांमुळे आजारपणाला सामोरे जावे लागेल. आहाराबाबत सावध रहा. व्यवहारात यश मिळेल. उत्पन्नाची साधने वाढतील. सामाजिक संस्थांमध्ये मानसन्मान मिळेल. मित्रांची भेट होईल. विरोधक त्रास देतील.
मकर- विद्यार्थ्यांना यश मिळेल
विद्यार्थ्यांना सकारात्मक विचारांमुळे यश मिळेल. स्वतःमधील कलागुणांचा शोध घ्या. व्यवसायात जलद यश मिळेल. नोकरीमध्ये आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता. कायद्याची संकटे दूर होतील. जोडीदारासह सामाजिक कार्यात सहभाग घ्याल.