ADVERTISEMENT
home / भविष्य
9  एप्रिल 2020 चं राशीफळ, सिंह राशीला होणार धनलाभ

9 एप्रिल 2020 चं राशीफळ, सिंह राशीला होणार धनलाभ

मेष –  कामाच्या ठिकाणी अचानक बदल होतील

आज तुमच्या कामाच्या ठिकाणी अनेक अनपेक्षित बदल होणार आहेत. विद्यार्थ्यांना यश मिळेल. रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती मजबूत असेल. प्रवासाला जाणे टाळलेलेच बरे राहील.

कुंभ – मानसिक तणाव जाणवेल

आज व्यवसाय बंद असल्यामुळे तुम्हाला मानसिक तणाव जाणवण्याची  शक्यता आहे. गरोदर महिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. भविष्याचे नियोजन करण्यासाठी योग्य काळ आहे. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. 

ADVERTISEMENT

मीन- विवाहाचा योग आहे

आज अविवाहित लोकांसाठी चांगला काळ आहे. विवाहाचा योग आहे. प्रभावशाली व्यक्तीच्या भेटीमुळे मन प्रसन्न होईल. व्यवसायातील परिस्थिती चांगली राहील. घरातून बाहेर जाऊ नका. रखडलेली कामे पूर्ण होतील. 

वृषभ – पैसे गमावण्याची शक्यता आहे 

जास्त कमावण्याच्या प्रयत्नात तुम्ही पैसे गमावण्याची शक्यता आहे. विनाकारण खर्च करणे टाळा. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. तुमचे छंद पूर्ण करण्याच्या हा योग्य काळ आहे. जोडीदाराशी नाते मजबूत होईल. 

ADVERTISEMENT

मिथुन –  मुलांचा हेल्थ रिपोर्ट चांगला येईल

आज मुलांचा हेल्थ रिपोर्ट चांगला येण्याची शक्यता आहे. अचानक काही कामे करावी लागतील. विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन रमणार नाही. वाहन चालवताना सावध राहा. आज तुमचा वेळ चांगल्या कामात जाणार आहे. 

कर्क –  मुलांची चिंता  सतावेल

आज तुम्हाला मुलांची चिंता सतावणार आहे. कामाच्या ठिकाणी बदल होतील. धार्मिक कार्यातील रस वाढणार आहे. रखडलेली कामे पूर्ण होतील. 

ADVERTISEMENT

सिंह –  रखडलेले पैसे मिळण्याची शक्यता

आज तुम्हाला तुमचे रखडलेले पैसे परत मिळणार आहेत. बिघडलेली कामे पूर्ण झाल्यामुळे कुटुंबात प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक स्थिती मजबूत असेल. प्रवासाला जाणे टाळा. विद्यार्थ्यांना खुशखबर मिळेल. 

कन्या –  तणाव वाढण्याची शक्यता 

मुलांपासून दूर राहिल्यामुळे तणाव वाढणार आहे. करिअरबाबत घरातील अनुभवी आणि मोठ्या व्यक्तीचा सल्ला घ्या. तुमच्या प्रतिभाशैलीमुळे तुमची जवळची व्यक्ती प्रभावित होणार आहे. 

ADVERTISEMENT

तूळ –  प्रेमिकांच्या इच्छा पूर्ण होतील

आज प्रेम करणाऱ्या लोकांना त्यांचे ध्येय साध्य होणार आहे. नात्यातील कटूपणा दूर होईल. कामाच्या ठिकाणी मनासारखी जबाबदारी मिळेल. आर्थिक संकट दूर होईल. 

वृश्चिक –  सौंदर्यक्षेत्रातील लोकांना समस्या

आज सौंदर्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या समस्या वाढणार आहेत. घरातील लोकांसोबत घरातील कामात हातभार लावा. मुलांची आणि वयस्कर लोकांची काळजी घ्या. वाहन चालवताना सावध राहा. 

ADVERTISEMENT

धनु – आर्थिक लाभ होण्याचा योग

आज व्यवसायात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढतील. अध्यात्म आणि योगातील रस वाढणार आहे. घरात राहून नवीन योजना तयार कराल. विनाकारण कामांमध्ये व्यस्त राहणार आहात. 

मकर – नवीन कामांची सुरूवात कराल

आज विद्यार्थ्यांच्या जीवनावर नकारात्मक विचारांचा प्रभाव राहील. नवीन कामे सुरू कराल. आत्मविश्वास वाढणार आहे. आर्थिक स्थिती चांगली राहील. आहाराकडे दुर्लक्ष करू नका. अध्यात्म आणि योगातील रस वाढणार आहे. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा –

घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी.

अधिक वाचा –

जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’

ADVERTISEMENT

तुमच्या राशीनुसार जाणून घ्या तुम्ही कशा ‘आई’ आहात

 

07 Apr 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT