मेष – नवीन काहीतरी करण्याचा उत्साह असेल
आज तुम्हाला काहीतरी नवीन करण्याचा उत्साह जाणवेल. दिवसभर फ्रेश वाटेल. सामाजिक संस्थेद्वारा सन्मान मिळेल. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांची साथ मिळेल. प्रवासाला जाण्याचा योग आहे.
कुंभ – करिअरमध्ये चांगली संधी मिळेल
आज तरूणांना करिअरची चांगली संधी मिळेल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेत यश मिळण्याची शक्यता आहे. दीर्घ काळापासून रखडलेली कामे पूर्ण होतील. व्यावसायिक प्रवासाला जाण्याची संधी मिळेल. आत्मविश्वासात वाढ होईल.
मीन – कामे अचानक रद्द होण्याची शक्यता
आज तुमच्या आर्थिक समस्या वाढणार आहेत. व्यवसायातील एखादे काम अचानक रद्द होण्याची शक्यता आहे. पदोन्नतीची संधी रखडण्याची शक्यता आहे. जोडीदाराची भावनिक साथ मिळेल. आरोग्याची काळजी घ्या.
वृषभ – प्रेमात निराशा मिळण्याची शक्यता
आज तुम्हाला कुटुंबातील एखाद्या व्यक्तीकडून तणाव मिळण्याची शक्यता आहे. प्रेमात निराशा मिळेल. छोट्या गोष्टींची फार चिंता करू नका. अचानक प्रवासाला जावे लागेल. आर्थिक स्थिती ठिक राहील.
मिथुन – जुन्या आजारपणामुळे निराश व्हाल
आज तुम्ही जुन्या आजारपणामुळे निराश व्हाल. महत्त्वाची कामे करण्याचा आळस करू नका. रचनात्मक कार्यात यश मिळेल. पैशांचे व्यवहार सांभाळून करा. एखाद्या खास व्यक्तीशी भेट होईल.
कर्क – प्रॉपर्टीतून लाभ मिळेल
आज तुम्हाला प्रॉपर्टीतून लाभ मिळेल. व्यावसायिक कामे मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक समस्या कमी होतील. विरोधकांपासून सावध राहा. मित्रांना दिलेले वचन पाळणे कठीण जाईल.
सिंह – नाते मजबूत होईल
आज तुम्ही मनातील गोष्ट शेअर केल्यामुळे तुमचा तणाव कमी होईल. वादविवाद मिटतील.अधिकाऱ्यांशी असलेले चांगले संबंध तुम्हाला पदोन्नतीसाठी फायदेशीर ठरतील. व्यावसायिक भागीदारीचा फायदा होईल.
कन्या – नोकरीचा शोध करावा लागेल
आज तुम्हाला नोकरीचा शोध घ्यावा लागेल. कामाच्या ठिकाणी तणाव असेल. आर्थिक स्थिती मजबूत असेल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवता येईल. नुकसानकारक व्यवसायात पैसे गुंतवू नका. आज प्रॉपर्टीत गुंतवणूक करणे टाळा.
तूळ – कौटुंबिक संपत्ती मिळण्याची शक्यता
आज तुम्हाला कौटुंबिक संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. घरातील सजावटीवर खर्च कराल. कामाच्या ठिकाणा झालेला बदल सुखद असेल. कोर्ट कचेरीतून सुटका मिळेल. जोडीदारासोबत परदेशी जाण्याचा योग आहे.
वृश्चिक – विद्यार्थ्यांचे मन अभ्यासातून भटकेल
आज विद्यार्थ्यांचे मन अभ्यासातून भटकेल. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करू नका. आज एखाद्या महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा. खर्चावर नियंत्रण ठेवा. वाहन चालवताना सावध राहा.
धनु – अज्ञात भिती जाणवेल
आज तुम्हाला एखादी अज्ञात भिती जाणवणार आहे. स्वभावात चिडचिड होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल असेल. नवीन योजना आखाल. प्रिय व्यक्तीपासून दूर जावे लागू शकते. धार्मिक कार्यातील रस वाढणार आहे.
मकर – प्रेमात ह्रदयाचा कौल घ्या
आज प्रेमात ह्रदयाने दिलेला निर्णय घ्या. कुटुंबासोबत वातावरण आनंदाचे असेल. जुनी रखडलेली कामे मित्रांच्या मदतीने पूर्ण कराल. व्यवसायातील लाभ वाढण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना साहित्य आणि संगीतातील रस वाढणार आहे.
अधिक वाचा –
या राशींचे जोडीदार असतात जास्तच केअरिंग, प्रत्येक लहानसहान गोष्टींची घेतात काळजी
जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’