मेष : नोकरीचा शोध समाप्त होईल
नोकरीचा शोध आज संपुष्टात येईल. क्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. राजकारणात सक्रियता वाढेल. आखलेल्या कामांमध्ये प्रगती होईल. जोडीदारासोबत संबंध रोमँटिक असतील. प्रवासाचा योग आहे.
कुंभ : मानसिक त्रास होईल
आज मानसिक त्रास होऊ शकतो. आरोग्याशी संबंधित खर्च अधिक होऊ शकतात. कार्यक्षेत्रात तुमची एखाद्याकडून फसवणूक होऊ शकते. जोडीदारासह दिवस चांगला जाऊ शकतो. व्यवसायाच्या निमित्तानं नवीन सहकाऱ्यांच्या भेटी होतील.
मीन : विरोधकांचा पराभव होईल
जोडीदाराचा सहवास आणि सहकार्य लाभेल. नवीन करारामुळे पद आणि प्रतिष्ठा वाढेल. विरोधकांना आपलं मत पटवून देण्यात यश मिळेल. अधिकाऱ्यांसोबत असलेला संपर्क प्रगतीसाठी उपयुक्त ठरेल.
वृषभ : व्यवहारात सावधगिरी बाळगा
पैशांच्या व्यवहारात आज सतर्कता बाळगावी. गुंतवणूक करणं टाळा. अनावश्यक खर्चामुळे बजेट कोलमडू शकतं. आर्थिक संकट निर्माण होऊ शकतं. कर्ज घेणं टाळा. कार्यालयाच्या ठिकाण वरिष्ठांसोबत मतभेद वाढू शकतात.
मिथुन : आरोग्याच्या समस्या दूर होतील
आरोग्यासंबंधित समस्या दूर होतील. धोकादायक कार्यांपासून दूर राहा. विरोधकांपासून सतर्क रहा. अचानक फायद्याची संधी मिळेल. आत्मविश्वास वाढेल. अचानक प्रवास होण्याचा योग आहे.
कर्क : नातेसंबंधांमध्ये तणाव
नात्यामध्ये तणावाची स्थिती निर्माण होऊ शकते. शेजारी किंवा नातेवाईकामुळे ताण येऊ शकतो. आरोग्यावर लक्ष देण्याची गरज आहे. धार्मिक कार्यात रस वाढू शकतो.
सिंह : आईच्या प्रकृतीत बिघाड
दिवसभरात आज प्रचंड धावपळ होईल. आईची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. जोडीदाराचं सहकार्य मिळेल. नोकरी बदलण्याचा विचार येऊ शकतो. उत्पन्न आणि खर्चामध्ये संतुलन राहील.
कन्या : कौटुंबिक मालमत्ता मिळू शकते
आईकडून कौटुंबिक मालमत्ता मिळू शकते. पार्टनरसोबत निर्माण झालेली कटुता दूर होईल. नवीन नाती निर्माण होतील. व्यवसायात फायदा होईल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यात रस वाढेल.
तूळ : प्रेयसी/ प्रियकराचा शोध पूर्ण होईल
प्रेयसी/प्रियकराचा शोध आज पूर्ण होईल. मालमत्तेसंदर्भातील प्रश्न सुटतील. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळेल. आपणास संपर्कांचा लाभ मिळेल. नातवाईक किंवा मित्रांसह भ्रमंतीचा योग घडून येऊ शकतो.
वृश्चिक : जबाबदारी पार पाडताना होऊ शकते चूक
व्यवसायातील आपली जबाबदारी पार पाडताना चूक होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी बदनामी होण्याची भीती. आत्मविश्वास कमी होऊ शकतो. धोकादायक कार्यांपासून दूर राहा. चांगल्या संपर्कांमुळे तुम्हाला लाभ मिळेल.
धनु : धनलाभ होण्याची शक्यता
सासरहून एखादं महागडी भेटवस्तू किंवा धनलाभ होण्याची शक्यता आहे. बराच काळापासून रखडलेलं कार्य पूर्ण होईल. व्यावसायिक कार्यांमध्ये व्यस्त होऊ शकता. जोडीदाराकडून सहकार्य लाभेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.
मकर : हक्कांसाठी संघर्ष करावा लागेल
व्यवसायातील काही महत्त्वपूर्ण निर्णय घेणे आज टाळा. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. आपल्याला आपल्या पदासाठी आणि अधिकारांसाठी संघर्ष करावा लागू शकतो. रखडकलेली कामे पूर्ण होतील. धार्मिक कार्यात मन लागेल.