ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
चेहऱ्यावर पिंपल्स आलेत?  ही हॉट अॅण्ड कोल्ड पद्धत येईल कामी

चेहऱ्यावर पिंपल्स आलेत? ही हॉट अॅण्ड कोल्ड पद्धत येईल कामी

पिंपल्स आल्यानंतर चेहऱ्यावर वेगवेगळे प्रयोग करणे अगदी स्वाभाविक असते. प्रत्येकाच्या त्वचेनुसार वेगवेगळ्या पद्धती या काम करतात. एकदा पिंपल्स आले की ते जाण्यासाठी काही कालावधी लागतो. एका रात्रीत हे पिंपल्स जाऊ शकत नाही. पिंपल्स घालवण्याची आणखी एक पद्धत आम्ही शोधून काढली आहे ती म्हणजे हॉट अॅण्ड कोल्ड पद्धत. पिंपल्स घालवण्याची ही पद्धत अगदी सगळ्या त्वचेसाठी योग्य पद्धतीने काम करते. पिंपल्स घालवण्याची हॉट अॅण्ड कोल्ड पद्धत नेमकी आहे तरी काय ती जाणून घेऊया.

चेहऱ्यावर असतील भरपूर पिंपल्स तर टाळा मेकअपमधील या स्टेप्स

पिंपल्सचे करा निरीक्षण

shutterstock

ADVERTISEMENT

पिंपल्स हे वेगवेगळ्या प्रकारचे असते. काहींना फक्त पुटकुळ्या (बारीक पुळ्या) येतात. काहींना पिंपल्सने मोठे येतात.ज्यामध्ये पस भरलेला असतो. ज्यांची त्वचा तेलकट असते. त्यांच्या त्वचेवर आलेले पिंपल्स हे फार मोठे आणि अधिक त्रासदायक करतात. त्वचेवर असलेल्या तेलामुळे हे पिंपल्स खोल आणि दुखणारे असतात. चेहऱ्यावरील तेलाचे प्रमाण कमी झाले की मग हे पिंपल्स नियंत्रणात येण्यास मदत मिळते. त्यामुळे तुम्ही सगळ्यात आधी तुमचा पिंपल्स कशामुळे आला आहे हे देखील जाणून घ्या. जर एखादा पिंपल असेल तर तो घालवताना फार त्रास होत नाही. पण जर चेहऱ्यावर पिंपल्स जास्त असतील. तर तो पसरण्याची शक्यता जास्त असते. 

पिंपल्स आल्यानंतर कधीच करु नका या 5 चुका

पिंपल्स येण्याची कारणं

पिंपल्स हे वेगवेगळ्या कारणामुळे येतात. त्वचेचा प्रकार, त्वचेची अॅलर्जी, अस्वच्छता, पोट खराब असणे, पिरेड्स अशा वेगवेगळ्या कारणांमुळे पिंपल्स येऊ शकतात. पिंपल्स येण्याचे तुमचे कारणही तुम्हाला माहीत हवे. योग्य कारण तुम्ही जाणून घेतले की, तुम्हाला त्यानुसारही इलाज करणे सोपे जाते.

पिंपल्स आले असतील तर ग्रीन टीची वाफ आहे खूपच फायदेशीर

ADVERTISEMENT

हॉट अॅण्ड कोल्ड पद्धत

या पद्धतीने कमी करा पिंपल्स

Instagram

आता पिंपल्स घालवण्याची हॉट अॅण्ड कोल्ड पद्धत काय आहे ते जाणून घेऊया. 

  • ज्या ठिकाणी तुम्हाला पिंपल्स आले आहे. तो पिंपल्स अगदी एखादा असेल तर तुम्ही तेवढ्याच जागेसाठी ही पद्धत करा. 
    एखादा टर्किश कपडा गरम पाण्यात टाकून तो पिळून घ्या आणि पिंपल्सवर ठेवा. गरम वाफ तुमच्या पिपंल्सला लागायला हवी. गरम पाण्यामुळे चेहऱ्यावरील पोअर्स ओपन होतात. त्यामुळे जर पोअर्समध्ये अडकलेली घाण असेल. 
  • गरम पाण्याच्या शेकमुळे चेहऱ्यावरील तेल कमी होते आणि त्यामुळे पिंपल्स सुकतात. पिंपल्स सुकणे हे चांगले असले तरी देखील काहींना यामुळे डाग पडण्याची शक्यता असते. 
  • जर उष्णतेमुळे तुमचा पिंपल्स फुगला आणि त्यातून पस बाहेर आला. तर तो योग्य पद्धतीने काढा तो पिळून काढताना चेहरा आणि त्वचा दुखावली जाणार नाही याची काळजी घ्या. 
  • पिंपल्सवर वाफ घेऊ झाल्यावर आणि चांगला दबल्यानंतर आता त्याचे डाग राहू नये आणि चेहरा चांगला राहावा यासाठी बर्फाचा प्रयोग करा. बर्फाच्या प्रयोगामुळे त्वचेमुळे ओपन झालेले पोअर्स बंद होतात. म्हणजे त्यामध्ये अधिक घाण जाण्याची शक्यता धुसर होते. 

आता ज्यावेळी तुम्हाला पिंपल्स येईल त्यावेळी तुम्ही अशा पद्धतीने पिंपल्सची काळजी घ्या. म्हणजे तुमचे पिंपल्स लवकर बरे होतील आणि त्वचा अधिक चांगली राहील.

ADVERTISEMENT
02 Jan 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT