ADVERTISEMENT
home / Care
गरम पाण्यामुळे होतं का केसांचं नुकसान, जाणून घ्या

गरम पाण्यामुळे होतं का केसांचं नुकसान, जाणून घ्या

केसांची खूप काळजी घ्यायला तुम्हाला आवडत असेल पण केसांची काळजी नेमकी कशी घ्यायची हे माहीत नसेल तर केसांसाठी तुम्ही करत असलेल्या काही गोष्टी तुमच्या केसांच्या आरोग्यासाठी नक्कीच चांगल्या नाहीत. आता केस धुण्याचाच विचार केला तर तुम्ही तुमचे केस नेमके कशापद्धतीने धुता ही केस धुण्याची योग्य पद्धतही तुम्हाला माहीत हवी. केसांवरुन आंघोळ करायची म्हणजे खूप जण केसांसाठी गरम पाण्याचा उपयोग करतात. पण केसांसाठी गरम पाण्याचा उपयोग चांगला आहे का नाही? हे तुम्ही कधी जाणून घेतले आहे का? केसांसाठी गरम पाण्याचा सतत उपयोग कल्यामुळे नेमकं काय होऊ शकतं ते आता आपण जाणून घेऊया.

या आयुर्वेदिक वस्तूंचा करा चेहऱ्यावर उपयोग, क्रिमची गरज नाही भासणार

केसांसाठी गरम पाण्याचा उपयोग करताय?

Instagram

ADVERTISEMENT
  • केसांसाठी गरम पाण्याचा उपयोग करताना जितका आनंद आणि आराम मिळतो ही गोष्ट खरी असले तरी देखील  केसांवर गरम पाण्याचा उपयोग केल्यामुळे स्काल्प भाजण्याची शक्यता जास्त असते. 
  • स्काल्पवर असलेले पोअर्स देखील यामुळे उघडतात.त्यामुळे केसांची मूळ नाजूक होण्याची शक्यता जास्त असते. 
  • त्वचेवर गरम पाणी ओतल्यानंतर जी अवस्था होते. तशीच अवस्था ही केसांच्या स्काल्पची देखील होते. केसांची मूळ खूप जास्त गरम झाल्यामुळे केस तुटण्याची आणि मुळापासून निघण्याची शक्यता ही सगळ्यात जास्त असते  त्यामुळे गरम पाण्याचा उपयोग केसांसाठी तसा नुकसानकारक ठरतो. 
  • केसांवर गरम पाण्याचा प्रयोग केल्यामुळे केसांवरील तेल निघण्यास अडथळा होतो. केस पटकन स्वच्छ होत नाही.
  •  केसांना सतत गरम पाण्याचा उपयोग केला तर केस कोरडे होतात. केसांवरील मॉईश्चर निघून जाते. त्यामुळे केस आकर्षक दिसत नाहीत. 

या 5 फेस मिस्टमुळे तुम्हाला मिळेल सुंदर त्वचा

असे स्वच्छ करा केस

असे धुवा केस

Instagram

  •   केस धुण्यासाठी जर तुम्हाला थंडपाणी वापरायचे नसेल तर तुम्ही कोमट पाण्याचा उपयोग करुन केस धुवा. म्हणजे तुमच्या केसांना आवश्यक असलेली हिट तुम्हाला मिळेल.
  •  केसांसाठी पाणी हे बोअरींगचे असता कामा नये.  बोअरींगचे पाणी हे जड असते. केसांचा शॅम्पू गेला की नाही हे या पाण्याच्या वापरामुळे मुळीच कळत नाही. त्यामुळे अशा हार्ड वॉटरचा उपयोग करणे टाळलेलेच बरे. 
  •  केस स्वच्छ राहावे असे जरी वाटत असले तरी सतत केस धुणे हे चांगले नाही. आठवड्यातून एकदा किंवा तीनवेळा केस धुवा. सतत विनाकारण केस धुण्यानेही केसांची मूळं दुखावली जातात. त्यामुळे केस गळण्याची शक्यता जास्त असते. 
  •  केस चमकदार राहावे असे वाटत असेल तर केसांवर सतत प्रयोग करणे टाळा, केस रंगवणे केसांना सतत रंगवत राहणे यामुळे केसांची वाढ खुंटते. शिवाय केमिकल्सच्या अति वापरामुळे केसांचा रंग ही जाण्याची शक्यता असते. 
  •  केसांसाठी चांगल्या प्रॉडक्टची निवड करणे हे नेहमीच चांगले त्यामुळे केसांसाठी चांगले शॅम्पू आणि कंडिशनर वापरा. प्रत्येक शॅम्पूनंतर केसांवर कंडिशनरचा प्रयोग अगदी हमखास करा. 


आता केसांसाठी गरम पाणी कसे काम करते हे जाणून घेतल्यानंतर त्याचा उपयोग कसा करायचा हे नक्कीच कळले असेल.

मास्कमुळे पिंपल्सचा होतोय त्रास, तर अशी घ्या काळजी

ADVERTISEMENT
28 Jan 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT