ADVERTISEMENT
home / Mental Health
ऍसिडिटी व एन्झायटी यांचा एकमेकांशी आहे जवळचा संबंध!

ऍसिडिटी व एन्झायटी यांचा एकमेकांशी आहे जवळचा संबंध!

आपल्या मानसिक आरोग्याचा आपल्या शारीरिक आरोग्यावर खूप  मोठा परिणाम  होतो हे तर वारंवार सिद्ध  झाले आहे. आपणही आपल्या रोजच्या आयुष्यात याचा अनेकदा अनुभव घेतो. आपला मूड चांगला असेल तर काही दुखत -खुपत असले तरी ते पटकन बरे होते. किंवा आपले त्याकडे सतत लक्ष जात नाही. पण जर आपण कुठल्या तणावाखाली असू किंवा दुःखी असू तर शारीरिकदृष्ट्या आपण कितीही निरोगी असलो तरीही आपल्याला काही करावेसे वाटत नाही. काहीही खायची-प्यायची इच्छा होत नाही. अगदी आपल्या अत्यंत आवडीचा पदार्थ जरी समोर आला तरी  त्यावेळी तो खावासा वाटत नाही.ह्याउलट शारीरिक आजार झाला असेल पण मन खंबीर असेल तर माणूस दुर्धर आजारावर देखील स्वतःच्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर मात करू शकतो. ह्याची अनेक उदाहरणे आपल्याला आजूबाजूला दिसतात.  

असेच तणावाखाली असताना किंवा  एन्झायटीचा त्रास असेल तर त्यावेळी ऍसिडिटी वाढण्याचा त्रास अनेकांना सतावतो. एखाद्याला जर ऍसिड रिफ्लक्सचा त्रास असेल तर त्या व्यक्तीला जेव्हा एन्झायटी होते तेव्हा घशाशी जळजळणे, छातीत जळजळणे किंवा आंबट पाणी घशाशी येणे हे त्रास बऱ्याचदा जाणवतात. खरं तर वरकरणी  पाहता ऍसिडटी आणि एन्झायटीचा संबंध असेल असे वाटत नाही. पण तज्ज्ञांच्या मते ह्या दोन्हींचा एकमेकांशी खूप जवळचा संबंध आहे. 

आपल्याला एन्क्झायटी किंवा डिप्रेशन आहे की नाही हे कसे ओळखाल

ऍसिडिटी व एन्झायटीचा संबंध  

चिंता आणि नैराश्यामुळे ऍसिडिटी व ऍसिड रिफ्लक्सचा धोका वाढतो आणि अभ्यासात असे आढळून आले आहे की सततच्या ऍसिडिटी वाढण्याचा  शारीरिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होत असल्याने चिंता आणि नैराश्यात देखील वाढ होते. थोडक्यात हे एक दुष्टचक्र आहे. गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी या मेडिकल जर्नलमधील एका अहवालानुसार एन्झायटी असलेल्या व्यक्तींना ऍसिडिटीचा  त्रास होण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. तज्ज्ञांच्या मते एन्झायटीमुळे आपले शरीर वेदेना तसेच ऍसिडिटीच्या बाबतीत अधिक संवेदनशील होते.  एन्झायटी आणि इतर मानसिक त्रासांमुळे अन्ननलिकेच्या हालचालीवर परिणाम जातो. ह्याचा अन्ननलिका स्फिंक्टरच्या कार्यावर देखील परिणाम होतो. अन्ननलिकेची हालचाल म्हणजे तुमच्या अन्ननलिकेमध्ये अन्न तुमच्या पोटात हलवण्यासाठी होणारे आकुंचन होय.

ADVERTISEMENT

अन्ननलिकेखालचे स्फिन्क्टर मसल अन्ननलिका व पोटाच्या मध्ये असलेला एक प्रकारचा व्हॉल्व्ह असतो. ह्यामुळेच पोटातील अन्न परत वर अन्ननलिकेत येण्यास प्रतिबंध होतो. पण जेव्हा ह्या स्फिन्क्टरचे कार्य नीट होत नाही, तेव्हा पोटातील अन्न व त्यात मिश्रित असलेले ऍसिड देखील अन्ननलिकेत वर येते आणि आपल्याला छातीत व घशाशी जळजळ होऊ लागते.  तुम्हाला जर खूप जास्त प्रमाणात एन्झायटी असेल तर त्यामुळे पोटात जास्त प्रमाणात ऍसिड तयार होऊ लागते. तसेच सततच्या तणावाचा शरीरावर परिणाम होतो त्यामुळे शरीरातील स्नायू सुद्धा ताठ होऊ लागतात. जर पोटातल्या स्नायूंवर ताण पडला तर त्यामुळे देखील पोटातले ऍसिड वर येऊ लागते.  थोडक्यात काय तर एन्झायटीमुळे ऍसिडिटी आणि ऍसिडिटीमुळे येणारी एन्झायटी असे हे दुष्टचक्र आहे.  

तुमच्या भावनांचा तुमच्या आरोग्यावर होतो हा परिणाम

ह्यावर उपाय काय?

आपल्या खाण्यापिण्याचा ऍसिडीशी खूप जवळचा संबंध असतो. म्हणूनच आपल्या खाण्यापिण्याची काळजी घ्यावी. खास करून जे लोक तणावाखाली आहेत त्यांनी तर आवर्जून पौष्टिक पण हलका आहार घेतला पाहिजे. खूप तेलकट, तिखट, मसालेदार पदार्थ खाऊ नयेत जेणे करून ऍसिडिटी वाढणार नाही.  खूप वेळ पोट रिकामे ठेऊ नये. तसेच आवडेल तो ,जमेल तो व्यायाम करावा. व्यायामुळे एन्झायटी देखील कमी होते आणि अन्नपचनही सुधारते. जास्त त्रास होत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ती औषधे (अँटासिड) घ्यावीत.  

ऍसिडिटी व एन्झायटी ह्या दोन्ही गोष्टी हलक्यात घेऊ नका. कारण ह्या दोन्हींचे शारीरिक व मानसिक आरोग्यावर दूरगामी गंभीर परिणाम होतात.  

ADVERTISEMENT

अधिक वाचा –

तुम्ही विनाकारण चिंता करत असाल तर करा हे सोपे उपाय

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

The Great Glamm Survey

ADVERTISEMENT
31 Jan 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT