नारळाचा वापर भारतीय स्वयंपाकात मोठया प्रमाणात केला जातो. यासाठीच जाणून घ्या नारळाचा किस जास्त दिवस कसा टिकवावा. भारतीय संस्कृतीमध्ये साधारणपणे समुद्र किनारपट्टीपासून जवळ राहणाऱ्या प्रद्रेशात स्वयंपाकात नारळ वापरण्याची पद्धत असते. केरळ, गोवा, कोकणात नारळाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. एक अख्खा नारळा सोलून खोवला तर त्यामधून दोन ते तीन मोठ्या वाट्या नारळाचा किस निघतो. मोदक, करंजी, लाडू करण्यासाठी नारळ वापरला जातोच. मात्र भाजी, पोहे, पुलाव, करी, सोलकढीसाठी नारळ रोजच वापरण्यात येतो. यासाठी जर तुम्ही नारळ खोवून ठेवला असेल तर तो जास्त दिवस टिकवण्यासाठी फॉलो करा या सोप्या टिप्स
नारळ खाण्याचे फायदे
नारळामध्ये फॅट्स जरी असले तरी त्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असते. नारळात कॅलरिज कमी असतात आणि त्यामधून शरीराला व्हिटॅमिन बी आणि पोटॅशिअम मिळते. नारळ पाण्यात भरपूर अमिनो अॅसिड आणि इलेक्ट्रोलेट्स असतात. ज्यामुळे शरीराला पुरेसे अॅंटि ऑक्सिडंट मिळतात. पण नारळ ओलसर असल्यामुळे तो एकदा फोडला की बाहेरील वातावरणात जास्त काळ टिकत नाही. नारळ टिकवण्यासाठी तो उन्हात सुरवून सुके खोबरे वापरले जाते. मात्र ओला नारळ टिकवण्यासाठी तुम्हाला फ्रीजचा वापर करावाच लागतो.
घरी अचानक आले पाहुणे तर असा करा झटपट स्वयंपाक
ओला नारळ फ्रीजमध्ये का ठेवावा
ओल्या नारळामध्ये पाण्याचा अंश मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे जर नारळाचा किस अथवा फोडलेला नारळ फ्रीज बाहेर ठेवला तर तो कुजण्याची अथवा त्याला बुरशी येण्याची शक्यता असते. नारळ हा 95 टक्के पाण्यापासून तयार होत असल्यामुळे तो टिकवण्यासाठी तुम्हाला फ्रीजचा वापर करावाच लागतो. पण असं असलं तरी खोवलेला नारळ तीन ते चार दिवसांच्या वर फ्रीजमध्ये ठेवू नये. त्यामुळे दोन ते चार दिवसांमध्ये नारळाचा वापर करा. नारळपाणीदेखील दोन ते तीन तासांच्यावर फ्रीजमध्ये ठेवू नये. जर तुम्हाला नारळपाणी जास्त काळ टिकवायचे असेल तर त्याच्या आईस क्युब्स करून तुम्ही ते फ्रिजरमध्ये साठवू शकता.
बहुगुणी आहे नारळाचे दूध,असा करा वापर (Coconut Milk Uses In Marathi)
नारळाचा किस जास्त काळ टिकवण्यासाठी सोप्या टिप्स
असं असलं तरी काही ठिकाणी नारळ सहज उपलब्ध होत नाही. शिवाय नारळ विकत आणणे तो फोडणे आणि किसणे हे मेहनतीचे काम असल्यामुळे काहींना नारळाचा किस जास्त दिवस टिकवण्याची गरज लागू शकते. अशा वेळी तुम्ही फ्रीजरमध्ये नारळाचा किस टिकवून ठेवू शकता. मात्र लक्षात ठेवा अशा वेळी नारळ खरेदी करताना तो फ्रेश असेल याची खात्री करून घ्या. नारळ फोडल्यावर तो किसून घ्या अथवा त्याचे छोटे छोटे तुकडे करा आणि झिप लॉक बॅगमध्ये भरा. दररोज नारळाचा वापर करायचा असेल तर छोट्या छोट्या बॅगचा वापर करा ज्यामुळे एकदा बॅग फ्रीजरमधून काढली की एकाच वेळी तुम्हाला त्यातील नारळाचा किस वापरता येईल. बॅग सिल पॅक असतील आणि त्यात हवा जाणार नाही याची काळजी घ्या. अशा पद्धतीने तुम्ही किसलेले खोबरे एक आठवडा टिकवू शकता.
नारळाचे दूध आणि डेरी क्रिम काय आहे तुमच्या आरोग्यासाठी चांगले