ADVERTISEMENT
home / आरोग्य
blood sugar in summer

मधुमेह आहे, मग अशी करा उन्हाळ्यात ब्लड शुगर मॅनेज

उन्हाळा हा एक असा ऋतू आहे जेव्हा आपल्या सर्वांनाच आरोग्याची अधिक काळजी घेणे आवश्यक असते. उन्हाळ्यात आपल्याला वारंवार तहान लागते आणि सारखे पाणी प्यायला अनेकांना आवडत नाही म्हणून काही लोक त्यांची तहान शमवण्यासाठी कार्बोनेटेड पेये पितात. उन्हाळ्यात सुट्ट्या असतात, त्यामुळे पार्ट्या -गेट टुगेदर्स होतात. अशावेळी कधीकधी आपण अस्वास्थ्यकर प्रक्रिया केलेले पदार्थ देखील खातो, ज्याचे आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. वाढत्या तापमानाशी लढण्यासाठी आपल्या शरीरातून सतत घाम येत असतो आणि त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता जाणवते. शरीरातील हायड्रेशनची पातळी बिघडल्याने रक्तातील साखरेच्या पातळीवरही विपरित परिणाम होतो आणि उन्हाळा हा मधुमेहाच्या रुग्णांसाठी त्रासदायक ठरतो. तुम्हालाही मधुमेह असेल तर अशा प्रकारे उन्हाळ्यात स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या.

साखरयुक्त रसांपासून लांब राहा

मधुमेह । diabetes
मधुमेह

उन्हाळ्यात वारंवार तहान लागते आणि सतत फक्त पाणी पिणे थोडे कठीण असते. साधारणपणे उन्हाळ्यात लोक अनेक प्रकारची सरबते, फळांचे रस पितात. या सरबते व रसांमध्ये अनेकदा भरपूर प्रमाणात साखर असते.  पण मधुमेही व्यक्तींनी हे समजून घेणे आवश्यक आहे की साखरयुक्त पेय प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. सरबते, फळांचे रस प्यायल्याने आपल्याला उष्णतेपासून तात्पुरता आराम मिळतो, परंतु शरीराला आवश्यक असलेले पोषण त्यातून मिळत नाही. तसेच फळांच्या नुसत्या रसात फायबर देखील नसते.  त्यामुळे फळांचे साखर घातलेले रस घेण्यापेक्षा फळे खाण्यास प्राधान्य द्या. 

हंगामी फळे प्रमाणात खावीत 

निरोगी राहण्यासाठी फळांचे सेवन करणे चांगलेच आहे. सिझनल फळे नक्कीच चांगली असतात. पण मधुमेही व्यक्तींनी फळांचे सेवन करताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.. उदाहरणार्थ, जर तुम्हाला आंबा खायचा असेल तर त्याचे मर्यादित प्रमाणात सेवन केले पाहिजे. एकाच वेळी खूप आंबे खाऊ नका.कारण आंब्यामध्ये नैसर्गिक साखर असते, ज्यामुळे मधुमेहींमध्ये रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. आंब्यात भरपूर प्रमाणात  फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स देखील असतात. अशा फळांचे सेवन जास्त करावे, ज्यात पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्याच वेळी, कोणतेही फळ खाण्यापूर्वी जीआय पातळी तपासण्यास विसरू नका.

आहारात फायबरचे प्रमाण जास्त ठेवा 

उन्हाळ्यात मधुमेहींनी जास्त फायबरचे सेवन केले पाहिजे. फायबरयुक्त अन्न खाल्ल्याने तुमचे पोटही भरेल आणि तुम्हाला सारखी भूकही लागणार नाही. शिवाय फायबर खाल्ल्याने साखर हळूहळू रक्तप्रवाहात सोडली जाते आणि त्यामुळे रक्तातील ग्लुकोजच्या वाढीस प्रतिबंध होतो.

ADVERTISEMENT

स्वत:ला हायड्रेटेड ठेवा पण हेल्दी पद्धतीने 

उन्हाळ्यात शरीरातून घामाद्वारे पाणी बाहेर टाकले जाते. त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण झटकन कमी होते. म्हणून या ऋतूमध्ये स्वत:ला हायड्रेटेड ठेवणे फार महत्वाचे आहे. पण त्यासाठी योग्य पद्धत असायला हवी. तहान लागल्यावर अस्वास्थ्यकर पेये घेणे टाळावे. म्हणून नेहमी पाण्याची बाटली सोबत ठेवा आणि दिवसभर स्वतःला हायड्रेटेड ठेवा. जेव्हा तुम्ही पुरेसे पाणी पिता तेव्हा ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते आणि रक्तप्रवाहातून अतिरिक्त विषारी घटक बाहेर टाकते.

तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वारंवार तपासा

मधुमेह । diabetes
मधुमेह

गरम हवामानामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी-जास्त होऊ शकते. खूप थकवा आल्यास किंवा अचानक खूप घाम आल्यास किंवा हायपोग्लासीमियाचे कोणतेही लक्षण जाणवल्यास लगेच घरीच ग्लुकोमीटरने चाचणी करा. अशा प्रकारे, तुमची रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यासाठी तुम्ही योग्य आणि तात्काळ कारवाई करू शकता. हायपोग्लासीमियावर उपचार करण्यासाठी खाण्याच्या वस्तू तुमच्यासोबत ठेवा. यामध्ये ग्लुकोज टॅब किंवा ग्लुकोज जेलचा समावेश आहे.

अशा प्रकारे उन्हाळ्यात स्वतःच्या आरोग्याची खास काळजी घ्या. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
29 Apr 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT