ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
how-eating-potatoes-in-right-way-in--to-avoid-weight-gaining-marathi

बटाटा खा अशा पद्धतीने, वाढणार नाही वजन

भारतामध्ये सर्वाधिक खाण्यात येणारा पदार्थ कोणता असा प्रश्न विचारल्यावर उत्तर म्हणून ‘बटाटा’ असं कोणती सांगितलं तर आश्चर्य वाटायला नको. कारण घराघरात अगदी उत्तर भारतापासून ते दक्षिण भारतापर्यंत सगळीकडे अगदी अनेक पदार्थांमध्ये सर्वाधिक वापर होतो तो बटाट्याचा (Potato). समोसा, बटाटावडा रेसिपी, आलू टिक्की, कटलेट्स, बटाट्याचा पराठा, घरातील वेगवेगळ्या भाजी या सर्वांमध्ये बटाट्याचा समावेश असतोच. बटाट्याच्या विविध रेसिपीज आपल्याकडे बनतात. बऱ्याच जणांना वाटतं की, बटाटा जास्त खाल्ल्यास, वजन वाढते. त्यामुळे अनेकदा बटाटा न खाण्याकडे अनेक जणांचा कल असतो. ही गोष्ट खरी की खोटी याबाबत अधिक जाणून घ्या. खरं तर हे अजिबात खरं नाही. तुम्ही जर बटाटा योग्य पद्धतीने खाल्लात तर तुमचे वजन अजिबात वाढणार नाही. बटाटा योग्य पद्धतीने खाल्ल्यास तुम्हाला कोणत्या आजारालाही सामोरे जावे लागणार नाही.

बटाटा खाल्ल्याने वजन वाढते का?

बटाट्यामुळे अनेक पदार्थांची चव वाढते. तसंच बटाट्यात अनेक पोषक तत्वही असते. तज्ज्ञांनुसार, बटाट्यामध्ये सोडियम, फायबर, विटामिन सी आणि विटामिन बी, पोटॅशियम असते. ज्यामुळे बटाटा हा आपल्या शरीरासाठी हानिकारक नाही हे समजते. मात्र काही व्यक्तींना वाटते की, बटाटा खाल्ल्याने शरीरातील साखरेची पातळी वाढते. पण हे अगदी योग्य नाही. बटाट्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स आढळतो, त्यामुळे अधिक सेवन केल्यास, रक्तातील साखरेची पातळी वाढते. तुम्ही जर 100 ग्रॅम बटाटा खाल्ला तर तुमचे वजन वाढत नाही. कारण यामध्ये साधारण 16 ग्रॅम कार्बोहायड्रेट असते. त्यामुळे आपण आपल्या डाएटचा भाग बनवू शकता. 

बटाटा शरीरासाठी घातक का मानला जातो 

बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण अधिक असते ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. पण आपल्या घरांमध्ये ज्या प्रकारे बटाट्याचा उपयोग केला जातो, त्यामुळे वजन अधिक वाढते. ज्याप्रमाणे आलू पराठा, बटाट्याचे वेफर्स, बटाट्याची भजी, डीप फ्राय आलू यामुळेच शरीरासाठी बटाटा घातक ठरतो. वास्तविक तुम्ही बटाटा योग्य पद्धतीने खाल्ला तर अजिबात तुमचे वजन वाढणार नाही आणि बटाटाही तुमच्यासाठी घातक ठरणार नाही. 

बटाटा खाण्याची योग्य पद्धत (How to Eat Potato)

  • बटाटा खाण्याची पहिली पद्धत – जर तुम्ही बटाट्याचा पराठा खात असाल तर तुम्ही त्याऐवजी स्टफ आलू रोटीचे सेवन करू शकता. जेणेकरून तुमचे वजन वाढणार नाही 
  • बटाटा खाण्याची दुसरी पद्धत – तळलेला अथवा मसालेदार बटाटा तुम्ही खाणे सहसा टाळा. याच्या ऐवजी तुम्ही मोहरीच्या तेलात बटाट्याची भाजी बनवून खा. यामुळे तुमच्या शरीराला चांगली ऊर्जा मिळेल आणि शरीरासाठी बटाटा घातक ठरणार नाही 
  • बटाटा खाण्याची तिसरी पद्धत – बटाटा तळण्याऐवजी तुम्ही बटाटा उकडून घ्या आणि त्यात काळी मिरी पावडर, मीठ घालून तुम्ही याचे सेवन करा 
  • बटाटा खाण्याची चौथी पद्धत – तुम्हाला जर सँडविच खायला खूप आवडत असेल तर तुम्ही उकडलेल्या बटाट्याऐवजी बटाटा स्टफिंग स्वरूपात वापरावा 
  • बटाटा खाण्याची पाचवी पद्धत – बटाट्याचे स्नॅक्न बनवताना फ्रेंच फ्राईज, भजी या ऐवजी तुम्ही उकडलेला बटाटा, त्यात दही, चाट मसाला, मीठ मिक्स करून खा. यामुळे पोटही जास्त काळ भरलेले राहाते. पटकन भूक लागत नाही आणि तुमचे वजन अजिबात वाढत नाही  

बटाटा खाण्याचे फायदे (Benefits of Eating Potato)

Benefits of Potato
  • बटाटा खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते खरं आहे, त्याशिवाय तुम्हाला तोंड आले असेल तर त्यावरही बटाटा उपयुक्त आहे. यामध्ये असणारे अमिनो असिड आणि ओमेगा 3 हे शरीरासाठी फायदेशीर ठरते. रोज एका बटाट्याचे सेवन शरीरामध्ये विटामिन बी आणि सी चे प्रमाण राखून ठेवते
  • बटाट्यामधील विटामिन बी आणि सी, कार्बोहायड्रेट, पोटॅशियम, फायबर हे शरीरासाठी फायदेशीर ठरते. तुम्ही बटाटा योग्य पद्धतीने खाल्ल्यास, वजन वाढणार नाही 
  • उकडलेले बटाटे सेवन केल्यास, तुमचे वजन वाढणार नाही  

बटाट्याचे सेवन योग्य पद्धतीने करा आणि तुम्ही स्वतःच्या तब्बेतीची काळजी घ्या. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा. 

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

26 Apr 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT