दात हा तोंडातील एक महत्त्वाचा अवयव आहे. तोंडाची स्वच्छता राखण्यासाठी दात स्वच्छ करणं गरजेचं आहे. यासोबतच नियमित दातांच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण दात निरोगी असतील तर तुम्ही अन्न नीट चावून खाता. ज्याचा तुमच्या संपूर्ण आरोग्यावर चांगला परिणाम होतो. डॉक्टर नेहमी डेंटल हेल्थ चेकअप करताना दिवसातून दोनदा दात घासावेत असा सल्ला देतात. मात्र दात नेमके किती वेळ घासावे याबाबत प्रत्येकाचे मत वेगवेगळे असू शकते. काही लोक सांगतात एक मिनीट तर काही लोक सांगतात किमान दोन मिनीट तरी दात घासायला हवे. यासाठीच जाणून घ्या दात घासण्याची किमान वेळ किती असावी.
दात स्वच्छ करण्यासाठी पाळा हे नियम
दिवसातून दोनदा दात स्वच्छ केल्यामुळे तोंडाची योग्य स्वच्छता राखली जाते. संशोधनानुसार दात घासल्यामुळे दातावरील प्लाक दूर होतो. जर तुमच्या दातावर जास्त कठीण प्लाक जमा झालं असेल तर तुम्ही किमान तीन ते चार मिनीटे दात घासायला हवे. दात घासताना तुमचा टुथब्रश जास्त कठीण नसेल याची काळजी घ्या कारण तो मऊ केसांचा असेल तर तुमच्या हिरड्यांना दुखापत होणार नाही. जर तुम्ही दिवसभरात दोनदा दोन मिनीट दात घासत असाल तर तुमच्या दातांवर प्लाक निर्ममाण होत नाही.
का कीडतात लहान मुलांचे दुधाचे दात, करा हे उपाय
का घासावे दात
दात घासण्याचा मुख्य उद्देश तोंडाचा वास येणे, प्लाक आणि जीवजंतू नष्ट करणे हा असतो. प्लाक म्हणजे तोंडात जंतूना पोषक ठरणारी जागा असते. यासाठी दात सर्व बाजूने टुथब्रशने घासणे गरजेचं आहे. जर तुम्ही दिवसभरात एकच वेळ आणि कमी कालावधीसाठी दात घासले तर दातांवर प्लाकचा थर जमा होऊ लागतो. ज्याचा पुढे तुमच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ लागतो. जीवजंतूमुळे दात कीडतात आणि हिरड्यांना सूज येते. यामुळे तोंडातून दुर्गंधी येणे ही समस्या मोठ्या प्रमाणावर वाढते.
5 मिनिट्समध्ये दातावरील प्लाक हटवा, जाणून घ्या घरगुती उपाय
कसे घासावे दात
दंतवैद्याच्या सल्लानुसार दातांवर कठीण प्लाक जमा झालेल्या लोकांनी दिवसभरात दोनदा कमीत कमी तीन ते चार मिनीटे दात घासावे. दातांच्या सुरक्षेसाठी जास्त कठीण ब्रश वापरू नये आणि दोन पेक्षा जास्त वेळा दात घासू नयेत. दात घासताना वरील आणि खालील दात घासून झाल्यावर दाढा आणि दाढांच्या आतील भाग जरूर घासावा. कारण या ठिकाणी जीवजंतू मोठया प्रमाणावर पोसले जातात. दात जोरात घासू नये. ब्रश करण्यासोबत फ्लॉसने दात स्वच्छ करावे. ज्यामुळे दातात अडकलेले अन्नकण सहज निघून जातील.