कितीही व्यायाम केला तरी काही जणांना फॅटलॉस करणे कठीण जाते. तुम्हीही बराच व्यायाम करत असाल वजन कमी होऊनही तुमच्या शरीरातील फॅट कमी होत नसेल तर तुम्हाला काही फॅटलॉस स्पेशल व्यायाम करण्याची गरज आहे. भारतीय योगासनांमधील परिपूर्ण असा व्यायाम म्हणजे ‘सूर्यनमस्कार’. खुद्द अभिनेत्री करिना कपूर हिने देखील शरीरातील फॅट नैसर्गिकरित्या कमी करण्यासाठी सूर्यनमस्कार केले. त्यामुळे तुम्हालाही काहीही जास्त मेहनत न घेता भारतीय पद्धतीनुसार अगदी हमखास शरीरावरील फॅट कमी करायचे असेल तर तुम्ही सूर्यनमस्कार करायला हवे. साधारण किती सूर्यनमस्कार आणि कोणत्यावेळी तुम्ही हे करायला हवे ते आपण जाणून घेऊया
एवढे सूर्यनमस्कार आहेत फायदेशीर
सूर्यनमस्कारमध्ये एकूण 12 स्टेप्सचा समावेश असतो. ज्यामध्ये तुमच्या संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. सूर्यनमस्कार सुरु करताना तुम्ही सुरुवातीला 5 सूर्यनमस्कारांपासून सुरुवात करा. त्यानंतर तुम्ही ते सेट वाढवले तरीदेखील चालू शकतात. खूप जणांना सूर्यनमस्कार करताना अनेक अडचणी येतात. कारण त्यामध्ये एकाचवेळी बरेच व्यायाम समाविष्ट असतात. त्यामुळे तुम्ही अगदी कमी पासून सुरु करुन ते वाढवत जा आणि त्यानंतर तुम्ही अगदी 100 सूर्यनमस्कार केले तरी देखील चालू शकतात. सूर्यनमस्कार केल्यानंतर साधारण एकावेळी 13 कॅलरीज बर्न होतात. जितके जास्त सूर्यनमस्कार तितक्या जास्त कॅलरिज बर्न होण्यास मदत मिळते. त्यामुळे तु्म्हाला किती कॅलरिज बर्न करायच्या आहेत त्यानुसार तुम्हाला सूर्यनमस्कार घालायचे आहे.
केस आणि उत्तम त्वचेसाठी आहारात समावेश करा या नैसर्गिक प्रोटीन्सचा
कोणत्या वेळी करावे सूर्यनमस्कार
वर्कआऊट हल्ली कोणीही कोणत्याही वेळी करतं पण सूर्यनमस्कार करण्याची एक वेळ असते. ती वेळ पाळली गेली की, त्याचे जास्तीत जास्त फायदे मिळण्यास आपल्याला मदत होते. त्यामुळे सूर्यनमस्कार कोणत्यावेळी करावे हे देखील आपल्याला माहीत असायला हवे. सूर्य उगवण्याच्या वेळी सूर्यनमस्कार केले तर ते जास्त फायद्याचे ठरते. याशिवाय तुम्ही संध्याकाळी सातच्या दरम्यान सूर्यनमस्कार केले तरी देखील चालू शकते. थोडासा व्यायाम किंवा वॉर्म अप करुन तुम्ही सूर्यनमस्कार करु शकता.
भारती सिंहचे ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण, 15 किलो वजन केलं कमी
सूर्यनमस्कार करण्याचे फायदे
सूर्यनमस्कार करण्याचे फायदे आहेत.ते कोणते ते देखील जाणून घेऊया
- पचनक्रिया सुरळीत करण्यास करते मदत.
- वजन कमी करण्यास करते मदत
- मासिक पाळीचा त्रास असणाऱ्यांच्या समस्या होतात दूर
- तणावमुक्त होण्यासही होते मदत
- त्वचा आणि केसांसाठीही सूर्यनमस्कार आहे फायद्याचा
आता शरीरावरील फॅट कमी करण्यासाठी नक्की करा सूर्यनमस्कार