ADVERTISEMENT
home / आरोग्य
How-Menopause-Affects-Your-Joints-and-Bone-Density

मेनोपॉज तुमच्या जॉइंट्स आणि बोन डेन्सिटीवर कसा परिणाम करते

मेनोपॉज हा स्त्रीच्या आयुष्यातील असा काळ असतो जेव्हा मासिक पाळी थांबते. भारतात मेनोपॉजचे सरासरी वय पाश्चात्य देशांच्या तुलनेत कमी आहे. भारतात मेनोपॉजचे सरासरी वय पाश्चिमात्य देशांमधील 51 वर्षांच्या तुलनेत 46 वर्ष असे आहे. नैसर्गिक मेनोपॉज तेव्हा येतो जेव्हा ओव्हेरिस (अंडाशय) अंडी सोडत नाहीत आणि कोणतेही एस्ट्रोजेन तयार करत नाहीत. हॉर्मोन एस्ट्रोजेन हा मानवांमध्ये हाडांच्या आरोग्याचा मुख्य नियामक आहे. एस्ट्रोजेनची पातळी कमी झाल्यामुळे हाडांची डेन्सिटी दहा वर्षांत अंदाजे 10% ने कमी होते आणि हे काहीवेळा तुमच्या तिसव्या वर्षीच सुरू होते. याबाबत अधिक माहिती आम्ही घेतली डॉ. अनीसा कपाडिया, कंसल्टंट रह्युमेटोलॉजिस्ट, मसीना हॉस्पिटल, मुंबई यांच्याकडून.

अधिक वाचा –

काय होतो परिणाम 

ऑस्टियोपोरोसिस ही एक अशी स्थिती आहे जेव्हा हाडांची डेन्सिटी कमी होते आणि हाडे कमजोर होतात. या कमजोर अशा हाडांना अर्थात “सच्छिद्र हाडे” यांना फ्रॅक्चर होण्याची शक्यता असते. हे फ्रॅक्चर सामान्यत: हिप किंवा मणक्यामध्ये होतात. लवकर मेनोपॉज होणे आणि हाडांच्या डेन्सिटीच्या वेगवान नुकसानीसह एस्ट्रोजेनची निम्न पातळी दरम्यान थेट संबंध आहेत. ऑस्टियोपोरोसिस हा बऱ्याचदा सायलेंट रोग असतो कारण बहुतेक रुग्णांना कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत. दुर्दैवाने फ्रॅक्चर झाल्यावरच याचे निदान होते. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय अत्यंत महत्त्वाचे आहेत. ऑस्टिओपोरोसिसचा मजबूत कौटुंबिक इतिहास असलेल्या 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या स्त्रियांना अत्यंत धोका संभवतो. इतर वैद्यकीय परिस्थिती जसे की मधुमेह, संधिवात, आधीच असलेली स्ट्रोक किंवा हृदयाची स्थिती, आधी घेतलेले हॉर्मोनल उपचार, स्टिरॉइड औषधे हे सर्व ऑस्टिओपोरोसिसची शक्यता वाढवतात.

अधिक वाचा – मेनोपॉज ची लक्षणे, कारणे आणि घरगुती उपाय (Menopause Symptoms In Marathi)

ADVERTISEMENT

यासाठी काय आहे आवश्यक

ऑस्टियोपोरोसिस रोखण्यात किंवा विलंब करण्यात जीवनशैलीमध्ये बदल करणे आणि उपाय करणे खूप महत्वाची भूमिका बजावतात. 

  • हाडांची झीज रोखण्यासाठी नियमित व्यायाम हा महत्त्वाचा घटक आहे. एरोबिक व्यायाम तसेच वजन प्रशिक्षण महत्वाचे आहे. 
  • चालणे, धावणे, टेनिससारखे खेळ खेळणे हे सर्व चांगले वजन उचलण्याचे व्यायाम आहेत
  • कॅल्शियम समृद्ध आहार घेणे तितकेच महत्वाचे आहे. मेनोपॉज आल्यानंतर स्त्रियांना हाडांची ताकद टिकवून ठेवण्यासाठी दररोज 1200 मिलीग्राम एलिमेंटल कॅल्शियम घेणे आवश्यक आहे. लो फॅट दुग्धजन्य पदार्थ, हिरव्या भाज्या आणि ड्राय फ्रुट्स जसे की बदाम, अंजीर, राजगिरा, बिया आणि डाळ यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण चांगले असते
  • व्हिटॅमिन डीचे चांगले सेवनदेखील तितकेच महत्वाचे आहे जेणेकरून आहारातील कॅल्शियमचा उपयोग होऊ शकेल 
  • हाडांचे आरोग्य राखण्यासाठी अत्याधिक मद्यपान आणि धुम्रपान टाळणे आवश्यक आहे. आजकाल अगदी महिलांमध्येही धुम्रपान आणि दारूचे सेवन करण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र यामुळे तुमच्या हाडांवर आणि मेनोपॉजवर परिणाम होत असतो याची तुम्हाला माहिती असणेदेखील आवश्यक आहे

एपिलेप्सीची औषधे, कॅन्सरची औषधे आणि दीर्घकालीन स्टिरॉइड्स यासारख्या विशिष्ट औषधांवर असणा-यांनी जास्त काळजी घेणे आवश्यक आहे कारण त्यांना ऑस्टिओपोरोसिस होण्याची दाट शक्यता असते. ऑस्टियोपोरोसिसचे उपचार विविध आहेत. बिसफॉस्फोनेट्ससारख्या जुन्या औषधांपासून ते डेनोसुमॅब सारख्या नवीन औषधांपर्यंत रुग्णाच्या वैयक्तिक गरजेनुसार आता उपचारांचे भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. पण मेनोपॉज आणि तुमच्या सांधेदुखीचा नक्कीच संबंध आहे. त्यामुळे तुम्ही यावर आतापासूनच लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. 

अधिक वाचा – मेनोपॉजच्या दिवसात अशा प्रकारे घ्या त्वचेची काळजी

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
26 Oct 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT