ADVERTISEMENT
home / आरोग्य
वजन कमी करण्यासाठी नेमकं किती पावले चालणं आहे गरजेचं

वजन कमी करण्यासाठी नेमकं किती पावले चालणं आहे गरजेचं

कोरोनाच्या काळात फिट राहायचं असेल तर नियमित व्यायाम करायला हवा. चालणे  हा व्यायाम करायला सोपा आणि सातत्याने करता येईल असा आहे. शिवाय आजच्या धकाधकीच्या काळात तुम्ही चालण्यासाठी नक्कीच काही वेळ काढू शकता. फिटनेस तज्ञ्जांच्या मते व्यायाम दिवसभरात कमीत कमी अर्धा तास आणि आठवड्यातून कमीत कमी पाच दिवस तरी करावा. मात्र चालणे हा असा व्यायाम आहे जो तुम्ही दररोज करू शकता. कोरोनामुळे तुम्हाला बाहेर पडणे शक्य नसेल तर तुम्ही घरातल्या घरातही चालण्याचा व्यायाम करू शकता. यासाठीच जाणून घ्या दररोज किती पावले चालावे. 

चालण्याचे फायदे

चालण्याचा व्यायाम करण्यासाठी तुम्हाला जीममध्ये जाण्याची अथवा साधनांची गरज नसते. लहानपणापासून आपण चालत असल्यामुळे तुम्हाला चालण्याचा सराव असतो. ज्यामुळे अचानक व्यायाम सुरू केल्यावर होणारा शारीरिक त्रासही चालण्याचा व्यायायात होत नाही. घरातल्या घरात, घराजवळील बागेत तुम्ही नक्कीच चालू शकता. चालण्याच्या व्यायामासाठी तुमचे पैसे आणि वेळही खर्च होत नाही. शिवाय चालणे हा एक उत्तम एरोबिक्स व्यायाम असल्यामुळे तुमच्या ह्रदयाच्या समस्या, अती वजन, मधुमेह, रक्तदाब, पोटाच्या समस्या, अपचन आपोआप कमी होतं. यासाठीच प्रत्येकाने दिवसभरात काही वेळ तरी चालण्याचा व्यायाम करायला हवा. चालण्याचा व्यायाम करण्याची सवय तुम्हाला लहानपणापासून असली तरी सध्याची बैठी जीवनशैली आणि गेले दीड वर्ष होत असलेला लॉकडाऊन यामुळे सर्वांचे चालण्याचे प्रमाण कमी झाले आहे. बाहेर जाताना गाडीने प्रवास केल्यामुळेही चालण्याचा  सराव कमी पडतो. यासाठीच चालण्यासाठी खास वेळ काढणं  गरजेचं आहे.

दिवसभरात किती चालावे

दिवसभरात किती चालावे हे प्रत्येक व्यक्ती, त्याला असणारा मोकळा वेळ, त्याची शारिरिक क्षमता, चालण्यासाठी असलेली जागा यावर अवलंबून आहे. मात्र काही लोक सांगतात की  निरोगी राहायचं असेल तर कमीत कमी दहा हजार पावलं चालावं. पण अचानक एवढा वेळ आणि इतकी पावलं चालणं तुम्हाला  नक्कीच जमणार नाही. यासाठी हळू हळू तुमच्या चालण्याची क्षमता वाढवा. दररोज तीस मिनीटे चालणे तुमच्या आरोग्यासाठी नक्कीच चांगले आहे. मात्र तुम्ही तुमच्या चालण्याचा सराव वाढवण्यासाठी पुढे एक तास चालण्याची वेळ वाढवू शकता. जे नियमित चालतात त्यांना ह्रदयाच्या समस्या कमी प्रमाणात होतात असे एका संशोधनात दिसून आले आहे. चालण्याचा वेग, किलोमीटर आणि दिवसभरात चाललेली पावले तुम्ही स्मार्ट वॉचच्या माध्यमातून मोजू शकता. आजकाल फिटनेसवर भर देण्यासाठी अनेक जण असे स्मार्ट वॉच वापरतात. ज्यामुळे तुम्ही दिवसभरात नेमकी किती  पावले चालला आहात याचा  तुम्हाला अचूक अंदाज मिळतो. चालण्याचा वेग किती असावा याबाबत देखील सुरुवातील सावध असायला हवे. पहिल्यांदा चालण्याचा सराव करताना तुम्ही मंद, मध्यम आणि वेगवान अशा टप्प्यामध्ये तो वाढवू शकता. मात्र सुरुवातीलाच जर तुम्ही वेगात चालू लागला तर लवकर थकाल आणि चालण्याचा सराव बंद कराल. यासाठी निजोजनबद्ध चालण्याचा व्यायामाचा सराव करा आणि चांगले बदल अनुभवा. 

ADVERTISEMENT

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा 

जाणून घ्या ‘वॉकिंग मेडिटेशन’ कसं करावं आणि त्याचे फायदे

सकाळी चालण्याचे अप्रतिम फायदे (Morning Walk Benefits In Marathi)

ADVERTISEMENT

गरोदरपणात चालण्याचे फायदे तुम्हाला माहीत आहेत का

29 Jun 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT