ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
how-often-should-you-actually-wash-your-face-in-a-day-in-marathi

एका दिवसात किती वेळा चेहरा धुवावा, काय आहे तथ्य

उन्हाळ्याच्या दिवसात त्वचेची विशेष काळजी (Skin Care) घेण्याची गरज भासते. उन्हाळा आणि वाढत्या तापमानामुळे सतत घाम येत राहतो आणि त्वचाही तेलकट होते. उन्हाळ्याच्या दिवसात त्वचेसंबंधी समस्या हा अत्यंत कॉमन आहेत. या दिवसात सनबर्न, चेहऱ्यावर पुळ्या येणे, त्वचेवर संक्रमण इत्यादीचा धोका अधिक वाढतो. ज्यांची त्वचा पहिल्यांपासूनच तेलकट आहे आणि ज्यांना सतत मुरूमांचा त्रास होतो त्यांच्यासाठी तर उन्हाळा म्हणजे डोक्याला तापच होतो. या समस्यांपासून वाचण्यासाठी सतत काही तासाने चेहरा धुतला जातो आणि अशावेळी क्लिंन्झरचाही अनेकदा वापर होतो. पण यामुळे त्वचेचे अधिक नुकसान होते याची कोणालाच कल्पना नाही. यामुळे मुरूमांची समस्या अधिक प्रमाणात वाढीला लागते. त्यामुळे एका दिवसात साधारण किती वेळा चेहरा धुवायला हवा, हे जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे. पण यापूर्वी सारखा चेहरा धुतल्यास किती हानिकारक आहे ते आपण जाणून घेऊया. 

सतत चेहरा धुण्याचे काय होतात दुष्परिणाम

  • सतत चेहरा धुतल्याने तुमच्या चेहऱ्यावर वाढत्या वयाच्या खुणा लवकर दिसू लागतात. कोरड्या त्वचेमुळे त्वचा अधिक खेचली जाते. त्यामुळे सुरकुत्या दिसू लागतात 
  • डोळ्यांच्या खाली काळ्या वर्तुळांची समस्या होऊ शकते 
  • सतत चेहरा धुतल्याने त्वचेचा कोरडेपणा वाढतो, ज्यामुळे त्वचेची चमक निघून जाते 
  • तसंच चेहरा धुतल्याने मायक्रोफ्लोराची संख्या कमी होते आणि तुमच्या त्वचेवरील नैसर्गिक चमक निघून जाते 
  • तसंच फेसवॉशमध्ये अनेकदा केमिकल्स असल्याने त्वचेवर जळजळ आणि खाज येते 
  • त्वचेवरील मऊपणा निघून जातो, ज्यामुळे त्वचा अधिक कोरडी दिसू लागते. चेहरा सारखा धुतल्याने त्वचेवरील सीबम निघून जाते आणि त्वचा कोरडी आणि निस्तेज होते. त्यामुळे त्वचेवर पिंपल्स आणि संक्रमणाचा धोका अधिक वाढतो
  • सतत चेहरा धुतल्याने चेहऱ्यावरील पीएच स्तर बिघडतो. त्याशिवाय तुम्ही सतत चेहरा धुण्याची सवय कायम ठेवली तर तुमचा चेहरा लवकर म्हातारा दिसू लागतो

दिवसातून किती वेळा चेहरा धुवावा

तुमच्या चेहऱ्यावर जर मुरूमं असतील अथवा अगदी त्वचेवरही मुरूमांचा त्रास असेल तर तुम्ही दिवसातून 2-3 पेक्षा अधिक वेळा चेहरा धुणे योग्य नाही. याशिवाय चेहऱ्यावर जर ब्लॅकहेड्स अथवा व्हाईटहेड्स असतील अथवा तुमची त्वचा तेलकट असेल, तुम्ही सतत चेहऱ्यावर चिकट चिकट वाटून घेत असाल तर तुम्ही हेव्ही फेसवॉशचा वापर करू नका. याशिवाय तुम्ही त्वचा अधिक एक्सफोलिएट करू नका. कारण यामुळे त्वचेच्या सुरक्षात्मक कवचाचे नुकसान होते आणि त्यामुळे तुम्हाला चेहऱ्यावर संक्रमण, अलर्जी, रॅश अथवा आधीच्या तुलनेत अधिक प्रमाणात मुरूमांचा त्रास सहन करावा लागू शकतो. 

तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर जर अधिक घाण, घाम आणि तेलकट त्वचेचा त्रास होत असेल तर तुम्ही चेहरा फेसवॉशने धुण्याऐवजी क्लिंन्झरने स्वच्छ करा. तसंच तुम्ही थर्मल वॉटर मिस्टचाही उपयोग करून घेऊ शकता. दिवसभर घाम आल्यानंतर तुम्ही पुसून स्प्रे मारत राहा. ज्यामुळे तुम्हाला फ्रेश वाटेल. यामुळे घाम, तेल आणि त्यावर जमलेली धूळ निघून जाण्यास मदत होते आणि चेहरा कोरडा अथवा निस्तेज राहात नाही. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
01 Jun 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT