मेकअपचा बेस म्हणजे फाऊंडेशन (Foundation). अनेक महिला याचा उपयोग करतात. बाजारामध्ये वेगवेगळे फाऊंडेशन उपलब्ध आहे. ज्यामध्ये पावडर फाऊंडेशनपासून ते लिक्विड फाऊंडेशनपर्यंत सगळ्याचा समावेश आहे. प्रत्येक महिला आपल्या स्किन टोननुसार फाऊंडेशनची निवड करते आणि वापरते. पण प्रत्येक फाऊंडेशनचा वापर करण्याची एक पद्धत असते, ज्यामुळे तुम्हाला फ्लॉलेस लुक (flawless look) मिळतो. तुम्ही पहिल्यांदाच फाऊंडेशन लावणार असाल अथवा तुम्हाला फाऊंडेशनबाबत जास्त माहिती नसेल तर तुम्ही लिक्विड फाऊंडेशनचा वापर करून नक्की पाहा. कारण लिक्विड फाऊंडेशन हे अन्य फाऊंडेशनच्या तुलनेत लावणे अधिक सोपे असते. तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही लाईट लिक्विड फाऊंडेशन (Liquid Foundation) निवडा. तुम्ही जर तेल शोषून घेणारे फाऊंडेशन निवडणार असाल तर हे केवळ तुमच्या त्वचेला मॅट लुक देत नाही तर तुमच्या चेहऱ्यावरील डिस्कलरेशन आणि डागदेखील झाकण्यास मदत करते. लिक्विड फाऊंडेशनचा योग्य लुक तुम्हाला तेव्हाच मिळतो जेव्हा तुम्हाला हे लावण्याची पद्धत माहीत असते. लिक्विड फाऊंडेशन चेहऱ्यावर कसे लावायचे याच्या काही सोप्या ट्रिक्स तुम्ही जाणून घ्या.
त्वचा तयार करण्यासाठी घ्या वेळ (give you skin more time)
हो हे खरं आहे की, लिक्विड फाऊंडेशनचा वापर करणे अत्यंत सोपे आणि अगदी जलद आहे. पण तुम्हाला जर याचा अत्यंत स्मूद लुक हवा असेल तर तुम्ही त्याआधी त्वचा तयार करून घेणे अत्यंत गरजेचे आहे. जेणेकरून तुम्हाला याचा चांगला परिणाम मिळेल. त्यासाठी तुम्ही सर्वात आधी आपली त्वचा स्वच्छ करून घ्या आणि मग त्यानंतर मॉईस्चराईजर अथवा त्यावर हायड्रेटिंग सीरम लावा. आता किमान दोन ते तीन मिनिट्स तुम्ही थांबा. त्यानंतर आपल्या चेहऱ्यावर प्राईमर लावा आणि फाऊंडेशन लावण्यापूर्वी प्राईमर साधारण एक अथवा दोन मिनिट्स सुकू द्या.
योग्य टूलचा करा वापर (use perfect tool)
तसं पाहायला गेलं तर फाऊंडेशन तुम्ही तुमच्या हाताच्या बोटांनी लाऊन, स्पंज आणि फाऊंडेशन ब्रशनेही व्यवस्थित लाऊ शकता. पण या तिन्ही गोष्टींमुळे तुम्हाला वेगवेगळा लुक मिळतो. लिक्विड फाऊंडेशन लावण्यासाठी योग्य टूल आहे ते म्हणजे फाऊंडेशन ब्रश. पण हा ब्रश सिंथेटिक फायबर फाऊंडेशन ब्रशच असावा याची खात्री करून घ्या. तुमच्या चेहऱ्यावरील कोणतीही लाईन अथवा डाग मागे न सोडता यामुळे व्यवस्थित बेस लागतो. जर तुम्ही स्पंज वापरत असाल तर हा स्पंज अत्यंत हलका आणि नरम आहे की नाही याचीही खात्री करून घ्या आणि सहसा बोटांनी फाऊंडेशन लावण्यापासून दूरच राहा.
अति फाऊंडेशन लागल्यास (more use of foundation)
असे बऱ्याचदा होते की, फाऊंडेशन लावताना अंदाज येत नाही आणि चेहऱ्यावर अतिरिक्त फाऊंडेशन लागते. अशावेळी अनेक महिला पुन्हा तोंड धुतात आणि पुन्हा मेकअप करण्यासाठी फाऊंडेशन लावण्यास सुरूवात करतात. पण असं करण्याची अजिबातच गरज नाही. तुम्ही केवळ अशावेळी स्टिपल ब्रशचा वापर करावा. तुमच्या त्वचेवर असणारे अतिरिक्त लिक्विड फाऊंडेशन ब्लेंड करण्यासाठी याचा उपयोग होतो आणि तुम्हाला हवा त्या प्रमाणात फाऊंडेशनचा बेस व्यवस्थित लागतो.
अधिक काळ टिकवा फाऊंडेशन (make foundation long lasting)
बऱ्याचदा घामामुळे फाऊंडेशनचे थर दिसून येतात आणि फाऊंडेशन चेहऱ्यावरून खाली उतरू लागते. अधिक दमटपणा आल्यास, लिक्विड फाऊंडेशन निघू लागते. पण असेल असेल तेव्हा तुम्ही लक्षात ठेवा की, फाऊंडेशन लावल्यानंतर एका टिश्यू अथवा ब्लोटिंग पेपरचा वापर करून चेहऱ्यावर हलकेसे प्रेस करा. असं केल्याने लिक्विड फाऊंडेशमधील अतिरिक्त तेल टिश्यू पेपरवर येईल आणि तुमच्या चेहऱ्यावर फाऊंडेशनचा थर व्यवस्थित बसेल.
लिक्विड फाऊंडेशनचा कसा उपयोग करायचा हे आम्ही तुम्हाला या लेखातून सांगितले आहे. तुम्हाला हा लेख आवडला असेल तर नक्की शेअर आणि लाईक करा.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक