ADVERTISEMENT
home / मेकअप
how to avoid smudging of dark lipstick In Marathi

डार्क लिपस्टिक पसरू नये यासाठी सोप्या टिप्स

लिपस्टिकच्या अनेक शेड प्रत्येकीच्या मेकअप किटमध्ये असतात. मात्र यातील डार्क शेड लावण्याची एक अनामिक भीती प्रत्येकीच्या मनात असते. याचं मुख्य कारण बऱ्याचदा डार्क रंगाच्या लिपस्टिक पसरतात आणि तुमचा चेहरा त्यामुळे खराब दिसू लागतो. यासाठीच आवड असूनही काही जणी डार्क लिपस्टिक वापरणं टाळतात. मात्र जर तुम्हाला डार्क रंगाच्या लिपस्टिकमध्ये आकर्षक दिसायचं असेल आणि ती पसरण्याची चिंता नको असेल तर या टिप्स करा फॉलो तसंच लिपस्टिक लावण्यापूर्वी जाणून घ्या त्याचे दुष्परिणाम (Side Effects Of Lipstick In Marathi)

डार्क रंगाची लिपस्टिक पसरू नये यासाठी टिप्स

लाल, ब्राऊन, जांबळा असे अनेक रंग डार्क शेडमध्ये मिळतात. अशा रंगाचा वापर केल्यामुळे तुमचा लुक बोल्ड आणि आकर्षक दिसतो. पण लिपस्टिकचे हे रंग पसरू नयेत यासाठी थोडी काळजी नक्कीच घ्यायला हवी.

ओठ लिपस्टिक लावण्यासाठी तयार करा

कोणतीही डार्क लिपस्टिक वापरण्यापूर्वी तुमच्या ओठांची योग्य ती निगा राखणं गरजेचं आहे. डार्क लिपस्टिक लावण्यापूर्वी ओठांवर बेस लावणं गरजेचं आहे. ज्यामुळे तुमची लिपस्टिक सेट होते आणि पसण्याची शक्यता कमी होते. यासाठी डार्क शेड वापरण्यापूर्वी ओठांवर सेटिंग पावडर, फाऊंडेशन अथवा प्रायमर अवश्य लावा.10 बेस्ट लिपग्लॉस ज्यामुळे तुमचे ओठ दिसतील अधिक सुंदर (Best Lip Gloss In Marathi)

ओठ मऊ आणि मुलायम करा

जर तुम्हाला ओठांवर गडद शेड वापरायच्या असतील तर त्यासाठी तुमचे ओठ नैसर्गिक पद्धतीने मऊ आणि मुलायम असायला हवे. यासाठी ओठांवर लिप कंडिशनर अथवा लिप बाम जरूर लावा.  जर तुम्ही मेकअप करताना लिप बाम लावलं तर जास्तीचं बाम आधी टीश्यू पेपरने काढून टाका. त्यानंतर ब्रशच्या मदतीने ओठांवर लिपस्टिक लावा. ज्यामुळे तुमची लिपस्टिक जास्त काळ टिकेल आणि पसरणार नाही. हिवाळ्यात ओठांच्या काळजीसाठी घरगुती उपाय | Lip Care Tips For Winter In Marathi

ADVERTISEMENT

लिपस्टिक ओठांवर योग्य पद्धतीने लावा

तुम्ही कशा पद्धतीने ओठांवर लिपस्टिक लावता यावर ती कधी खराब होणार हे ठरू शकतं. यासाठी जेव्हा ओठांवर एक किंवा त्यापेक्षा जास्त कोट लावणार असाल तर ते ओठांवर व्यवस्थित मर्ज करा. असं केल्यामुळे लिपस्टिक लवकर सेट होईल आणि खराब होणार नाही. लिपस्टिक लवकर खराब होऊ नये यासाठी त्यावर थोडी टाल्कम पावडर लावायला विसरू नका. टीश्यू पेपरने जास्तीची पावडर काढून टाका.

मॅट आणि लॉंग लास्टिंग लिपस्टिक निवडा

कितीही चांगल्या पद्धतीने लिपस्टिक लावली तरी तुमची लिपस्टिक लवकर खराब होत असेल तर जेव्हा तुम्हाला डार्क लिपस्टिक लावायची असेल तेव्हा योग्य लिपस्टिक निवडा. मॅट फिनिश असलेल्या अथवा लॉंग लास्टिंग लिपस्टिक ओठांवर जास्त काळ टिकतात. मात्र ते लावण्यापूर्वी ओठांची निगा राखा आणि काढताना योग्य मेकअर रिमूव्हरचा वापर करा. 

21 Jan 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT