ADVERTISEMENT
home / निरोगी जीवन
टायफॉईडची पसरतेय साथ, अशी घ्या स्वतःची काळजी

टायफॉईडची पसरतेय साथ, अशी घ्या स्वतःची काळजी

वातावरणातील बदल, ऋतू बदल, दूषित पाणी, दूषित अन्न यामुळे साथीचे रोग परसत असतात. सध्या उन्हाळ्याला सुरूवात होत असताना टायफॉईडच्या  साथीची सुरूवात झालेली दिसून येत आहे. ज्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांमध्ये टायफॉईडच्या तापाची लक्षणं दिसून येत आहेत. टायफॉईडचा ताप सालमोनेला या विषाणूमुळे पसरतो. दूषित पाणी अथवा अन्नामुळे याची वाढ जोमाने होते. खाण्यापिण्याच्या घटकांमधून तो शरीरात जातो आणि रूग्णाला ताप येऊ लागतो. टायफॉईडचा ताप अंगावर काढणं धोकादायक ठरू शकतं. बऱ्याचजदा यात तीव्र ताप, उलटी, पोट दुखणे, अंगदुखी, डोकेदुखी आणि प्रचंड थकवा जाणवतो. काही रूग्णांना या तापात भुक लागण्याचं प्रमाण कमी होतं. डॉक्टर यावर उपचार करण्यासाठी सर्वात आधी रूग्णाला त्याच्या प्रतिकारशक्ती नुसार अॅंटि बायोटिकचा  डोस देतात. दोन ते तीन आठवडे तुम्हाला हा ताप उतरण्यासाठी औषधे घ्यावी लागतात. जर तुम्हाला अशी काही लक्षणं आढळली तर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या शिवाय त्यासोबतच या साथीच्या आजारापासून वाचण्यासाठी काही घरगुती उपचारही करा. 

टायफॉईड होऊ नये यासाठी अशी घ्या काळजी –

साथीचे रोग अथवा टायफॉईडसारखा ताप येऊ नये साठीच आधीच स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या.

घरात स्वच्छता राखा –

कोणताही रोग हा अस्वच्छतेमुळे परसत असतो. जरी साथीचा रोग बाहेरील वातावरणातून पसरत असला. तरी कोणत्याही आजारपणापासून वाचण्यासाठी आणि कुटुंबाची काळजी घेण्यासाठी घर नियमित स्वच्छ करणं गरजेचं आहे. कारण असं म्हणतात जिथे स्वच्छता असते तिथे आरोग्यसंपदा नांदते.

उघड्यावरील खाद्यपदार्थ खाणे टाळा –

कोरोना महामारीमुळे खरंतर उघड्यावरील खाद्यपदार्थ खाणे कमी झाले होते. मात्र लॉकडाऊननंतर पुन्हा रस्त्यावरचे विशेषतः उघड्यावरील अस्वच्छ पदार्थ खाण्याचे प्रमाण वाढले आहे. दूषित पाणी आणि दूषित अन्नातून थायरॉईडचे विषाणू पोसले जातात. यासाठीच उघड्यावरचे चायनिज, आयस्क्रिम अथवा तळलेले पदार्थ खाणे वेळीच टाळणे गरजेचं आहे.

ADVERTISEMENT

आठवड्यातून एकदा फ्रीज स्वच्छ करा –

घराच्या स्वच्छतेमध्ये सर्वात महत्त्वाचं आहे स्वयंपाकघर आणि फ्रीज स्वच्छ करणं. कारण अन्नपदार्थ आणि पाणी साठवून ठेवण्याचे हे घरातील महत्त्वाचे ठिकाण आहे. बरेच दिवस साठवून ठेवलेले द्रवपदार्थ, सरबत, अन्नपदार्थ खराब झाल्यामुळेही तुम्हाला टायफॉईड होऊ शकतो. यासाठीच या काळात फ्रीजमध्ये ठेवलेले शिळे पदार्थ आणि पाणी खाणे टाळा. त्यापेक्षा घरात तयार केलेले ताजे पदार्थ आणि पौष्टिक पदार्थ खा ज्यामुळे तुम्ही निरोगी राहाल. 

आईस्क्रिम आणि बर्फाचा गोळा खाणे टाळा-

उन्हाची काहिली जस जशी वाढत जाणार तस तशी आईस्क्रिम, बर्फाचा गोळा, कोल्ड्रिंक, थंड पेय पिण्याची इच्छा वाढत जाणार. जरी हे खरं असलं तरी शारीरिक आरोग्यासाठी या गोष्टी अती प्रमाणात मुळीच खाऊ नका. कारण आईस्क्रिम, बर्फाचा गोळा, कोल्ड्रिंकमध्ये टाकण्यात येणारा बर्फ कोणत्या पाण्यापासून तयार झालेला आहे हे तुम्हाला माहीत नाही. जर ते पाणी दूषित असेल तर थंडाव्यामुळे त्या बर्फात विषाणू पोसले जाऊ शकतात. यासाठीच या काळात असे पदार्थ न खाणेच सोयीचे ठरेल. 

घरातील पाण्याची तपासणी करून घ्या –

घरात पाण्याच्या टाकीत साठवलेले पाणी बरेच दिवस तसेच राहत असेल तर ते दूषित होण्याची शक्यता वाढते. यासाठी तुम्ही घरात पाणी साठवत असलेली भांडी, टाकी वेळच्या वेळी साफ करा. त्यासोबत मुख्य पाण्याच्या टाकीतील पाणी शुद्ध आहे का याची तपासणी करून घ्या. कारण  जर ते पाणी दूषित असेल तर टायफॉईड होण्याची शक्यता नक्कीच वाढू शकते. 

सतत हात स्वच्छ धुवा –

कोरोना विषाणूला नष्ट करण्यासाठी सध्या प्रत्येकाने स्वतःला सतत हात धुण्याची सवय लावूनच घेतलेली आहे. मात्र ही जीवनशैली अशीच कायम ठेवणं अतिशय गरजेचं आहे. कोरोनाचा धोका जरी कमी झाला असला तरी सतत इतर आजारांच्या साथी वातवरणानुसार डोकं वर काढत असतात. यासाठीच टायफॉईडचा धोका कमी करण्यासाठी वारंवार हात स्वच्छ धुण्याची स्वतःला सवय लावा. 

ADVERTISEMENT

फोटोसौजन्य – इन्साग्राम

अधिक वाचा – 

जाणून घ्या किचन साफसफाईची योग्य पद्धत

ताप आल्यावर घरगुती उपाय, सोपे आणि परिणामकारक उपाय (Home Remedies For Fever In Marathi)

ADVERTISEMENT

प्रतिकार शक्ती कमी आहे हे ओळखण्याची लक्षणे (Signs Of A Weak Immune System In Marathi)

15 Mar 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT