ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
रवा केक नेहमी होतो शिऱ्यासारखा मग तुम्ही करताय या चुका

रवा केक नेहमी होतो शिऱ्यासारखा मग तुम्ही करताय या चुका

अय्यंगार बेकरीचा रवा केक हा अनेकांच्या आवडीचा केक आहे. मस्त दाणेदार असा रवा केक अगदी कोणत्याही वेळी खाण्यासाठी परफेक्ट आहे. हलका- फुलका असा हा केक घरीही बनवता येतो. तोही कमीत कमी साहित्यात. आता इतकी सगळी तारीफ ऐकल्यानंतर अनेकांनी रवा केक बनवण्याचा घाट घरीही घातला असेल. काहींचा रवा केक नक्कीच चांगला असेल पण काहींच्या रवा केकचा शिरा होतो अशी तक्रारही आम्ही ऐकली आहे. आता तुमचा रवा केक नेमका चुकतो कुठे ते आज आपण जाणून घेऊया म्हणजे तुमचा रवा केक कधीच फसरणार नाही उलट तो नेहमीच परफेक्ट होईल.

चॉकलेट केक रेसिपी मराठीत, घरच्या घरी बनवा सोपे केक (Chocolate Cake Recipes In Marathi)

वजन कमी करण्यासाठी खा chia seeds च्या चविष्ट रेसिपी

रवा केक करताना टाळा या चुका

रवा केक करताना टाळा चुका

ADVERTISEMENT

Instagram

  • रवा केकसाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट असते तो म्हणजे रवा. तुम्ही कोणत्या क्वालिटीचा रवा निवडता हे ही फार महत्वाचे आहे.रवा केकसाठी तुम्ही नेहमी बारीक रवाच निवडायला हवा. जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर मग तुम्ही तो रवा मिक्सरमध्ये बारीक करुन घ्या. 
  • रवा केक चांगला लुसलुशीत होऊ द्यायचा असेल तर कोणत्याही केकप्रमाणे तुम्हाला सुरुवातीला सगळे कोरडे साहित्य एकत्र करायचे आहे. रवा, पिठी साखर, बेकिंग, सोडा, बेकिंग पावडर, अगदी किंचित मीठ असे सगळे एकत्र करायचे आहेत. 
  • आता वेळ आहे ती थोडेसे तेल घालण्याची रवा केक हा कोणत्याही अंड्याचा वापर न करता केला जातो. आता अंड्याच्या जागी तेल घालण्याचा ज्यावेळी सल्ला दिला जातो. तेलाचा वापर करताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे ती म्हणजे तुम्ही कोणत्याही वासाचे तेल केकसाठी चालत नाही. आपण घरात शेंगदाणा, मोहरी किंवा सनफ्लॉवर तेल वापरतो. या तेलांचा शिजवताना वास येतो. त्यामुळे वासाचे तेल अजिबात निवडू नका. अशा तेलाचा बनवलेला रवा केक खाण्याची अजिबात इच्छा होत नाही.
  •  केकचे बॅटर तयार करण्यासाठी दूधाचा वापर करणार आहोत.  रव्याहून ½  प्रमाणात तुम्हाला दूध घ्यायचे असते. दे दूध थंड असेल तर चांगले. दूध छान एकत्र करुन रवा फुलण्यासाठी किमान 30 मिनिटांसाठी ठेवायचा असतो. हा केक जरी झटपट होत असला तरी देखील तुम्हाला रवा छान दूधात फुलेपर्यंत ठेवायचा असतो. तिथे तुम्ही थोडे थांबायलाच हवे. 
  • रवा छान फुलला की, मग त्यात तुम्ही व्हॅनिला इसेन्स घाला.सगळे साहित्य एकत्र करा.
  •  जर तुम्हाला बेकिंग सोडा आणि पावडर तुम्हाला रवा फुलल्यानंतर घालायचा असेल तर तुम्ही असे केले तरी चालू शकेल. सगळ्यात शेवटी जर तुम्ही थोडेसे दही फेटून घातले तर तुमचा केक आणखी छान होतो.
  • आता जर तुम्ही केक ओव्हनमध्ये करणार असाल तर तुम्हाला फार मेहनत करावी लागणार नाही. कुकरमध्ये करणार असाल तर तुम्हाला थोडी काळजी घ्यावी लागेल कारण कुकर ओव्हनप्रमाणेच गरम करावा लागतो. त्याचे तापमान तुम्हाला पटकन कळत नाही. पण साधारण मोठ्या आचेवर 10 मिनिटं कुकर होण्यासाठी पुरेसा आहे. कुकरमध्ये हा केक शिजायला किमान 30 मिनिटं जातात. तुम्हाला साधारण 20 मिनिटांनी उघडून पाहणे अपेक्षित असते.  
  • मायक्रोव्हेवमध्ये केक करत असाल त्याचा मोड बदलून तुम्ही मायक्रो + कन्व्हेशन करुन घ्या. 15 मिनिटांसाठी प्रीहिट करुन घ्या. त्यानंतर साधारण 25 मिनिटांसाठी 210 डिग्रीवर केक बेक होऊ द्या. 
  • मायक्रोव्हेव थंड झाल्याशिवाय केक काढू नका. रवा केक हा नेहमी वरुन चॉकलेटी दिसतो. पण त्याचा रंग बदलला तरी देखील दूध, दही आणि साखरेमुळे तो छान ग्लॉसी आणि मॉईस्ट असतो. 

आता तुम्ही रवा केक करताना नक्की या टिप्सचा वापर करा. तुमचा रवा केक नक्कीच परफेक्ट होईल.

प्रसादाचा शिरा परफेक्ट तेव्हाच होतो जेव्हा…

28 Jul 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT