ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
how-to-be-a-best-mother-in-law-tips

उत्तम सासू होण्यासाठी सोप्या टिप्स, होईल सगळीकडे प्रशंसा

प्रत्येक नवी नवरी जेव्हा सासरी प्रवेश करते तेव्हा घरातील सर्व सदस्यांनी तिचे मनापासून स्वागत केलेले असते. पण आपल्याकडे सासू आणि सुनेचे नाते आजही वेगळ्याच नजरेने पाहिले जाते. आपल्या कुटुंबात नवी नवरी येते तेव्हा सर्वप्रथम काळजी घ्यावी लागते ती घरातील सासूला अर्थात नवऱ्याच्या आईला. अरेंज मॅरेज असेल तर सासूचा स्वभाव माहीत नसतो तर लव्ह मॅरेजमध्ये स्वभाव माहीत असला तरीही काही ना काही कारणाने चढउतार नात्यांमध्ये होतच असतात. तुम्हाला जर सर्वात आधी पहल करायची असेल तर तुम्ही नक्कीच उत्तम सासू होण्याच्या मार्गावर आहात असं म्हणावं लागेल. आपल्या सुनेशी खटके उडायला नको असतील तर तुम्ही या टिप्स नक्की वापरा.  

अधिक वाचा – सासूमुळे घरात होत असतील वाद तर करा स्वतःला असे शांत, सोप्या टिप्स

नेहमी समान वागणूक द्या 

तुम्ही तुमच्या मुलासाठी जर एखादे गिफ्ट अथवा सामान आणणार असाल तर तुम्ही तुमच्या सुनेसाठीही नक्की एखादी वस्तू वा गिफ्ट घ्या. यामुळे सुनेला नक्कीच आपलेपणा जाणवेल आणि आपणही या कुटुंबाचा एक महत्त्वाचा भाग आहोत याबाबत तिला साशंकता वाटणार नाही. अशा स्थितीमध्ये भेदभाव तुम्ही चुकूनही करू नका. कारण तुमच्या घरात येणारी सून ही तुमच्या मुलाप्रमाणेच आहे. 

कोणा एकाची बाजू घेऊ नका 

प्रत्येक जोडप्यामध्ये भांडणे होतातच. पण त्यावेळी तुम्ही मुलगा अथवा सुनेची बाजू घेऊ नका. सहसा या भांडणांमध्ये तुम्ही कधीच पडू नका. कारण कोणाचीही बाजू घेणे हे तुमच्यासाठी योग्य नाही. तुम्ही जर मुलाची बाजू घेतली तर सुनेला एकटं पडल्यासारखं वाटेल. त्यामुळे तुम्ही नेहमी संतुलित राहणं अत्यंत गरजेचे आहे. 

ADVERTISEMENT

अधिक वाचा – नाती जपताना… येऊ शकतात या अडचणी

सतत कामामध्ये व्यत्यय आणू नका 

कोणत्याही सुनेला आपल्या सासूने आपुलकीने चौकशी करणे नक्कीच चांगले वाटते. ऑफिसमधून आल्यानंतर सासू म्हणून नक्कीच तुम्ही तिला आपुलकीने विचारा. पण प्रत्येक लहानसहान गोष्टीबाबत मात्र तिला विचारू नका. तिला हे नक्कीच आवडणार नाही. खोदून खोदून चौकशी करत आहोत असं तिला वाटू देऊ नका. तसंच ती तिच्या आयुष्यात नक्की काय करत आहे याबाबत सतत तिला टोचून बोलू नका. तिला तिचं आयुष्य तिच्या मनाप्रमाणे जगू द्या. तिच्यावर देखरेख ठेवत आहोत असे तिला अजिबातच वाटू देऊ नका. तसंच तिच्या आयुष्यातील मित्रमेैत्रिणींचीदेखील घरी आल्यानंतर विचारपूस केल्यास तिला नक्कीच बरे वाटेल. 

गॉसिपपासून राहा दूर 

अधिकवेळ आपल्या नातेवाईकांमध्ये सासू आपल्या सून अथवा जावयाबाबत चर्चा करताना दिसते. पण तिच्याबाबत कधीही तुम्ही नातेवाईकांकडे तक्रारी अथवा वाईटपणा बोलू नका. कारण तुमच्या सुनेला याबाबत कळले तर तुमच्या आणि तिच्या नात्यात नक्कीच वाईटपणा येऊ शकतो. तुम्हाला तिची एखादी गोष्ट आवडत नसेल तर तिचा मूड पाहून त्याप्रमाणे अगदी आईप्रमाणे तिला सांगायचा प्रयत्न करा. जेणेकरून तिला तिची चूक कळेल आणि तुमच्या नात्यात दुरावा येणार नाही.

अधिक वाचा – सासू- सुनेत दुरावा आणतात या गोष्टी

ADVERTISEMENT

तिच्यासंबंधित विशिष्ट गोष्टी आणि तारखा ठेवा लक्षात 

सून अथवा जावयासंबंधित महत्त्वपूर्ण तारखा अर्थात त्यांचा जन्मदिवस, ऑफिसच्या महत्त्वाच्या मीटिंग्ज, आवडते खाण्याचे पदार्थ या गोष्टी सहसा तुम्ही लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. जेणेकरून त्यांना अधिक आपलेपणा वाटेल आणि तुमचे नाते नक्कीच चांगले राहते आणि तुम्ही एक काळजीवाहू सासू नक्कीच होऊ शकता.  

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

09 Feb 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT