ADVERTISEMENT
home / अॅस्ट्रो वर्ल्ड
घरी सकारात्मक उर्जा टिकवण्यासाठी

घरात सकारात्मक उर्जा टिकून राहण्यासाठी टाळा या गोष्टी

 घर आनंदी राहायचे असेल तर घरात सकारात्मक उर्जा टिकवून ठेवणे गरजेचे असते. घरात सकारात्मक उर्जा टिकून राहण्यासाठी आपण बऱ्याच गोष्टी करत असतो. वास्तुचे अनेक नियम फॉलो करण्याकडे अनेकांचा कल असतो.  पण प्रत्येकवेळी वास्तुचे नियम फॉलो करण्यापेक्षाही गरजेच्या असतात काही अगदी साध्या गोष्टी ज्या आपण फॉलो करणे. घरात  आल्यानंतर एखादयाला एकदम सकारात्मक वाटावे असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही काही साध्या गोष्टींचे पालन करायला हवे. त्यामुळे नक्कीच तुमच्या घरी सकारात्मक उर्जा टिकून राहील.

स्वच्छ लाईट्स

Instagram

खूप जणांच्या घरी गेल्यानंतर अंधार अंधार दिसतो. असा अंधार घरात नकारात्मक उर्जा आणतो. घरी स्वच्छ प्रकाश येण्यासाठी लाईट असायला हवा. घरात अंधारे कोपरे असतील किंवा कमी लाईट असतील तर तुम्ही घरात प्रकाश येईल इतका लाईट लावा. त्यातही लाईट हा पांढरा असायला हवा. पिवळ्या रंगाचे लाईट अजिबात चांगले दिसत नाहीत. असे लाईट्स अंधार आणि एक नकारात्मक उर्जा आणत असतात. त्यामुळे घरात स्वच्छ लाईट्स ठेवा.

झाडांची छाटणी

हल्ली सगळेच जण फ्लॅटमध्ये राहतात. त्यामुळे गार्डनिंगची आवड अनेक जण आपल्या खिडक्यांमधूनच पूर्ण करतात. घरापेक्षाही मोठा झाडांचा पसारा वाढवायला तुम्हाला आवडत असला तरी देखील तुम्ही झांडाचे खूप जंगल खिडकीमध्ये करु नका. झाडांची अशी झालेली वाढ घरात काहीही स्वच्छता नाही असे दाखवते. झाडांची आवड असणे आणि झाडांची झाटणी न करणे यामध्ये फरक आहे अशी झाटणी न केलेली झाडे नकारात्मकता वाढवतात. 

कोळ्याची जाळी

Instagram

घरातील अस्वच्छता ही जर तुम्हाला कोपऱ्या कोपऱ्यांमध्ये आलेल्या कोळ्यांच्या जाळ्यातून दिसते. जर तुमच्या घरातही कोळ्याची जाळी आली असतील. तर तुम्ही योग्य वेळी कोळ्यांची जाळी काढून टाका. घरातले कोपरे हे कायम स्वच्छ असायला हवेत. तर घर आनंदाने आणि माणसाने भरलेले राहते. घरात कोळ्यांचा त्रास वाढला असेल तर त्यावर सोपे उपाय करा.

ADVERTISEMENT

अडगळ करा कमी

जुन्या झालेल्या वस्तू, भांडी, कपडे असे खूप जणांना ठेवायला आवडते. एखादी तुटलेली वस्तुही पुन्हा कधीतरी कामी येईल असा विचार करुन आपण ठेवत असतो. ही अडगळ घरात नकारात्मक उर्जा आणते. नकारात्मक उर्जा घरातून काढून टाकायची असेल तर तुम्ही लगेचच घरातून अशा तुटलेल्या, मोडकळीस आणलेल्या आणि जुन्या गोष्टी काढून टाका. यामध्ये देवीदेवतांचे फोटो किंवा काचा असतील तर त्यांना आताच केराची टोपली दाखवा.

दरवाज्यामागे नको अडचण

लहान घर असेल तर अनेकदा खूप जण जास्तीची कपाटं करतात. पण असे असले तरी देखील  दरवाज्यामागे खूप जणांना कपडे, टॉवेल लावण्याची सवय असते. जर अशी अडगळ तुम्ही दरवाज्यामागे ठेवत असाल तर अडगळ आणि अडचण होते. ते कपडे कधीच काढले जात नाही. अंगावरुन काढलेले कपडे घामाने भरलेले असतात. त्यामुळे तुम्ही दरवाज्यामागे अशी अडचण अजिबात करु नका. 

घरात सकारात्मक उर्जा टिकून ठेवायची असेल तर या गोष्टी लक्षात ठेवा.

12 Oct 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT